Dictionaries | References

येरे माझ्या मागल्या, कांदे वांगी रांधल्या

   
Script: Devanagari

येरे माझ्या मागल्या, कांदे वांगी रांधल्या     

एक कुणब्याची बाई दोन दगड मांडून स्वयंपाक करीत होती. तिनें प्रथमतः कांदे व वांगीं यांची भाजी शिजत लाविली नंतर ती भाकरीचें पीठ मळूं लागली. तेव्हां तिनें आपल्या मनांत विचार केला कीं, भाजी तर झालीच. आतां पांच भाकरी भाजल्या म्हणजे स्वयंपाक तयार होईल व आपल्याला लवकर जेवावयास मिळेल. असा विचार ती करीत आहे तोंच चुलीचा दगड घसरुन भाजीचें पातेलें विस्तवांत पालथें पडलें तें पाहून त्या बाईनें वरील शब्द म्हटले. तेव्हांपासून ही वरील म्हण प्रचारांत आली असावी. -शाब २.२१३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP