Dictionaries | References र राब Script: Devanagari Meaning Related Words राब हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun पकाकर गाढ़ा किया हुआ गन्ने का रस Ex. किसान राब और रोटी खा रहा है । ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लबी शीरा सीराWordnet:asmগুড় bdगुर benরাব gujરાબ kanಕಾಕಂಬಿ kasراب kokकाकय malശർക്കരപ്പാവ് marराब mniꯆꯨꯍꯤ nepगुड oriଆଖୁସିରା panਸ਼ੀਰਾ tamவெல்லபாகு telబెల్లంపాకం urdشیرا राब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 rāba f Juice of the sugarcane boiled to a thick consistency, molasses or jagree. 2 Sugared water boiled and thickened with flour. A beverage for the sick. 3 C Ground burned in preparation for the seed: also the crop raised on ground so prepared: also loppings, leaves, grass, rubbish used in burning the ground. 4 Sediment of oil or of clarified butter.. v घाल, पड. राब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Sediment of oil or of ghee. m Frequency of coming and going. राब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun उसाचा काकवीपेक्षा दाट रस Ex. गरमगरम राब मला आवडते ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগুড় bdगुर benরাব gujરાબ hinराब kanಕಾಕಂಬಿ kasراب kokकाकय malശർക്കരപ്പാവ് mniꯆꯨꯍꯤ nepगुड oriଆଖୁସିରା panਸ਼ੀਰਾ tamவெல்லபாகு telబెల్లంపాకం urdشیرا राब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ काकवीपेक्षां दाट असा उसाच्या रसाचा रांधा . २ दुखणेकर्यास पिण्यास द्यावयाचें पेय . पीठ घालून दाट केलेलें आणि कढविलेलें साखर घातलेलें पाणी . ३ ( कों . ) रोपाकरिता भाजलेली जमीन . ४ अशा रीतीनें तयार केलेल्या जमिनीवर केलेलें रोप . ५ जमीन भाजण्याकरितां लागणारें गवत , पानें , केरकचरा , टहाळ इ० . ६ तेला - तुपाचा गाळ , बेरी . [ देप्रा , रव्बा ; हिं . राब । ( वाप्र . ) पु. १ रीत . २ स्वभाव . ३ वारंवार जाणें येणें ; एखादें कृत्य पुन्हां पुन्हां करणें ; अभ्यास ; वापर ( क्रि० घालणें ; पाडणें ). आताशीं घरांत मनुष्यें थोडीं म्हणून पुढला दरवाजा बंद करून मागील दरबाजानेंच राब घातला आहे . ४ आटोकाट मेहनत ; श्रम . कुकर्माचा करवी । राबु जरी । - ज्ञा १३ . ३० . ५ धुमाकूळ . हा ठायवरी लोभु । करी स्वैरत्वाचा राबु । - ज्ञा १४ . २३० . ६ कुटुंबांतील माणसांची वर्दळ ; विस्तार ; पसारा . तुमचा राब मोठा . तुम्हाला एवढें घर पुरणार नाहीं . [ राबणें ]०करणें ( जुन्नरी ) जमीन भाजण्यासाठीं पान - पाचोळा वगैरे शेतांत पसरणें . त्यानें भातासाठीं राब केला आहे .०लावणें सवय लावणें .०जाळणें ( जुन्नरी ) शेतजमीनीवर पान - पाचोळा पसरून जाळून जमीन भाजणें .०बरडळणें भाजलेली जमीन नांगरून दांताळयानें ढेकळें फोडून सारखी करणें . राबड - स्त्री . चिडबिड ; रेंदा ; चिखल ; गाळ ; खळमळ ; रेबड . [ राब ] राबडी - स्त्री . रबडी पहा . बासुंदीचा एक प्रकार ; साखर व मसाला घालून आटवून दाट केलेलें दूध . २ पातळ गूळ ; पातळ चिखल [ राब ] राबणी - स्त्री . टहाळ , शेण , गवत , बारीक माती घालून रोपटा तयार करणें व भाजणें ; भाजावळ ; दाढ . राबणें - सक्रि . जमीन नांगरणें , लागवडीस आणणें . आम्ही वर्षास दहा बिघे शेत घरीं राबतो . राबरी - स्त्री . घट्ट न झालेला , पातळ गूळ . राबाचें पाणी - न . उपयोग केलेलें पाणी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP