|
न. देश ; राज्य ; मंडल ; प्रांत . धार्मिक , सामाजिक व राजकीय आपलेपणा भरलेला लोकसमुदाय ; एका दिलाची व एकाच मनोभावनेने प्रेरित झालेली देशांतील जनता . जमलेला समुदाय ; पुष्कळ मंडळी ; मेळा ; वृंद . साकरेच्या भोंवती पहा कसे मुंग्यांचे राष्ट्र जमले आहे . ( ना . ) प्रस्थ ; कारभार ; वैभव . [ सं . ] सामाशब्द - ०गीत न. स्वदेश , स्वभाषा , स्वविक्रम , स्वधर्म किंवा संस्कृति यांचे निदर्शक गीत . ०ध्वज पु. सर्व राष्ट्रास मान्य अशा वर्ण व चिन्हांकित निशाण . राष्ट्रीय झेंडा , निशाण . ०संघ पु. सर्व देशांतील एकजुटीची संस्था ; जगांतील राष्ट्रांमध्ये समेटाचे कार्य करणारी संस्था ; ( इं . ) लीग ऑफ नेशन्स . राष्ट्रसंघाच्या बैठकीत हिंदी प्रतिनिधीचे नेतृत्व बिकानेरच्या महाराजाकडे आले . - के १७ . ६ . ३० . [ सं . ] ०सभा स्त्री. सर्व भरतखंडाचे राजकारण करणारी एक सभा ; कांग्रेस . राजकीय हक्क संपादण्यासाठी आमच्या लोकांनी अलीकडे जी राष्ट्रसभा स्थापिली आहे . - आगर ३ . ६७ . [ सं . ] राःष्ट्राण , राष्टण न . झुंड ; जमाव ( दंग्यांतील ); अस्ताव्यस्त मेळा . मोठा पसारा ( अवाढव्य कामाचा , सामानाचा ); मोठा राडा ( जेवणावळीनंतर अन्नाचा ); अडगळीचा विखरडा ( कामानंतर जिन्नसांचा , हत्यारांचा ). ( क्रि० घालणे ; पडणे ). [ सं . राष्ट्र ] राष्ट्रिय , राष्टीय - वि . राज्यासंबंधी ; राष्ट्रासंबंधी ; प्रांतासंबंधी ; राष्ट्रच्या हिताचे . [ सं . राष्ट्र ] राष्ट्रीय अस्तित्व - न . स्वतंत्र वृत्तीचे जीवन ; स्वतःचे राष्ट्र स्वतः चालविण्याची पात्रता . हिंदुस्तानच्या लोकांनी राष्ट्रीय अस्तित्व कधींच संपादूं नये ... - टि ३ . २ . राष्ट्रीयत्व - न . स्वधर्म , स्वभाषा , स्वदेश व पूर्वज यांच्याविषयी आदर , अभिमान . स्वधर्म , स्वभाषा , स्वदेशाभिमान , पूर्वेतिहासस्मरण ही राष्ट्रीयपणाची लक्षणे होत . - टि २ . २३७ . [ सं . ] राष्ट्रीय शाळा - स्त्री राष्ट्रीय शिक्षण देनारी इभ्रत व संपत्ति वाड्शून त्याची इतरांवर छाप बसेल असे बनविण्यासारखे शिक्षण . राष्ट्रीय सभा - स्त्री . जनतेच्या प्रतिनिधींची राजकारणविषयक सभा ; काँग्रेस ; राष्ट्रसभापहा . [ सं . ]
|