Dictionaries | References

राहणे

   
Script: Devanagari

राहणे     

क्रि.  नांदणे , मुक्काम करणे , वस्ती करणे , वास करणे ;
क्रि.  उरणे , बाकी असणे , शिल्लक राहणे , हाती असणे ;
क्रि.  मावणे , समावेश होणे , सामावणे ;
क्रि.  टिकणे , जशाचा तसा राहणे , सुस्थितीत राहणे .

राहणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एखाद्या ठिकाणी वास करणे   Ex. माझे वडील गावी राहतात.
HYPERNYMY:
थांबणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
असणे
Wordnet:
asmবাস কৰা
benথাকা
gujરહેવું
hinरहना
kanವಾಸಮಾಡು
kokरावप
malതാമസിക്കുക
nepबस्नु
oriରହିବା
panਰਹਿਣਾ
tamவசித்தல்
telనివసించు
urdرہنا , سکونت پذیرہونا , رہائش کرنا , بود و باش اختیار کرنا
verb  दुखणे नाहीसे होणे   Ex. हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.
SYNONYM:
थांबणे बंद होणे
verb  एकाच ठिकाणी थांबून राहणे   Ex. आता तुझे वडील कुठे राहिले?
HYPERNYMY:
थांबणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
bdथाबथा
hinजमना
kanಕೂತಿರು
kasڈٔٹِتھ , جٔمِتھ , بِٕہِتھ
kokघट जावप
malസ്ഥിരതാമസമാവുക
nepबस्नु
oriଲାଖିବା
panਬੈਠਣਾ
tamதங்கு
telతిష్టవేయి
urdجمنا , بیٹھنا , رہ جانا
verb  पूर्ण किंमत न मिळणे वा वसूल न होणे   Ex. हजार रुपयातले शंभर रुपये राहिले.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
बाकी असणे शिल्लक असणे
Wordnet:
benবকেয়া থাকা
kanತುಂಡಾಗು
kasنۄقصان گَژُھن
malനഷ്ടമാവുക
nepकम्‍नु
verb  एखादी क्रिया केल्यानंतरदेखील काही मागे उरणे   Ex. चांगले घासून धुतल्यावरही हा डाग तसाच राहिला.
HYPERNYMY:
उरणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
kasروزُن
malബാക്കിവരുക
mniꯂꯩꯍꯣꯕ
sanशिष्य
telఉండు
urdرہنا , رکنا , بچنا , رہ جانا
verb  कुणाच्या घरी जास्त काळ राहणे   Ex. दिनू महिनाभर आजीकडेच राहिला आहे
HYPERNYMY:
उतरणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
मुक्काम करणे वस्ती करणे
Wordnet:
benথাকা
gujવસવું
kasروزُن , رِِہٲیش کَرٕنۍ , ڈیرِ دِیُن
kokवसप
malതാവളമടിക്കുക
oriରହିବା
panਬਸਨਾ
tamதங்கியிரு
urdبسنا , اقامت کرنا , ڈیراڈالنا
verb  एखाद्या विशिष्ट अवस्थेत राहणे   Ex. येथे वातावरण नेहमी एकसारखेच राहते.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
asmথকা
kasروزُن , آسُن
malആകുക
sanवृत्
urdرہنا
verb  वंचित होणे   Ex. संतोषचे आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन राहून गेले.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
राहून जाणे
Wordnet:
benবাদ রয়ে যাওয়া
kanವಂಚಿತನಾಗು
kasروزُن
malകഴിയാതെ വരിക
mniꯌꯥꯎꯍꯧꯗꯕ
nepनपाउनु
oriବଞ୍ଚିତ ହେବା
tamஏங்கு
telఉండిపోవు
verb  देवाणघेवाण इत्यादीमध्ये एखाद्यावर एखादी रक्कम बाकी निघणे   Ex. तुझे आताचे काही राहिले असतील तर सांग मी आता चुकते करतो.
HYPERNYMY:
राहणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
बाकी राहणे शेष राहणे
Wordnet:
kanಸಾಲ ಉಳಿ
kasباقی روزُن , باقی
malചുകത്തുക
See : उरणे, मावणे, सुटणे, टिकणे, थांबणे, पडणे, उतरणे

राहणे     

अ.क्रि.  
नांदणे ; वास करणे ; असणे ; मुक्काम करणे . आम्ही सांप्रत काशीत राहतो .
एका स्थितीत टिकणे . एका बोटावर काठी कशी राहील .
मावणे ; समाविष्ट होणे ( भांड्यात पदार्थ ). या दौतीत अच्छेर शाई राहील .
मागे पडणे ; सध्यां टाकले जाणे ; न संपतां पडून राहणे ; तात्पुरते बंद पडणे ( काम इ० ). वाड्याचे काम अर्धे झाले अर्धे राहिले . यंदा त्याचे लग्न होणार होते पण राहिले .
उरणे , शिल्लक असणे ; हातांत , खिशांत शिल्लक , बाकी म्हणून असणे .
मागे घेणे ; थांबणे . त्वां शिवी दिलीस तर तो तोंडांत मारल्याशिवाय राहणार नाही .
शिथिल होणे ; असमर्थ होणे ( अवयव , इंद्रिये ); मोडावणे ; खचणे ( सामर्थ्य , दम )
ठेवला जाणे ; पदरच्या माणसाप्रमाणे , चाकराप्रमाणे असणे ; कामावर , दिमतीस असणे . तूं एका महिन्याचा चाकर . मी कालपासून राहिलो .
( आयाचा शेवटी असणार्‍या धातुसाधितां बरोबर ह्या क्रियापदाचा प्रयोग असतां ) मागे फिरणे , थांबणे . असा अर्थ होतो . हा मारायाचा - खायाचा - बसायाचा - जायाचा - राहिला .
( तिरस्कारार्थी ) असूं देणे ; बाजूस सारणे ; दुर्लक्ष करणे . होउनि तृप्त नृपाते भीष्म म्हणे काय ती सुद्धा ? राहो । - मोभीष्म १२ . १२ . [ सं . रह = थांबणे ] साधितशब्द - राहतक - न .
राहतेपण .
( ल . ) राहण्याची क्रिया . यालागि जोते पुसे जातक । कोणी कोणी राहतक पुसेना । - भारा बाल ९ . ४१ . राहराहो - क्रिवि . पुनःपुनः ; वारंवार . राहराहो शोध घ्यावा । परांतरांचा । - दा १५ . १ . ४ . [ राहून राहून ] राहवणे , राहविणे - सक्रि . राहवून , ठेऊन घेणे . कैकेयी चालली रायासरसी । राहवितां तिसी न राहे । - भारा बाल १ . ८२ . राहवलेपण , राहावलेपण , राहिवलेपण - न . रंगेलपण . कां सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु । - ज्ञा १८ . ४२४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP