Dictionaries | References र रुप Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रुप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. बाह्य स्वरुप ; देखावा . आकार ; आकृति ; दृश्य पदार्थ . चेहरा ; तोंडवळा ; मुद्रा ; मुखवटा . ( न्यायशास्त्र ) डोळ्यांनी दिसणारे पदार्थाचे रंग आणि आकार हे धर्म ; नेत्र ह्या इंद्रियाचा विषय . नमुना ; विशेष मासला ; ठराविक ठेवण ; विशिष्ट घडण ; अवस्था ; स्थिति . सौंदर्य ; शोभा ; तेज ; पाणी ; भूषण ; शोभादायक गुण ; बांधेसूदपणा . हे काम असे की मनुष्याने जीव देऊन केले तरी रुप यायचे नाही . मूळ धर्म ; स्वभाव ; गुणधर्म ; मूळ अवस्था . ( व्याकरण ) नामाचे अगर धातूचे प्रत्यय इ० लावून सिद्ध झालेले स्वरुप , स्थिति . ( व्याकरण ) कोणताहि धातु विधि अगर निषेध या अर्थी चालविला असतां त्याचे होणारे रुपांतर . रुपे दोन आहेत - करणरुप व अकरणरुप . तादात्म्य ; प्रतिबिंब ; सोंग ; सारखेपणा ; वेष . उदा० पितृरुप ; पिशाचरुप ; वायुरुप ; अलंकाररुप . इ० ( गणित ) एक ह्या संख्येची संज्ञा ; बीजगणितांत व्यक्त संख्या . एक परिमाण दुसर्या परिमाणांत नेले असतां होणारा बदल . उदा० अडीच रुपयांचे आण्यांचे रुप चाळीस आणे . ( वैद्यक ) निदानाचा दुसरा प्रकार . एखाद्या कामाचा श्रेयस्कर किंवा प्रशंसनीय परिणाम ; चीज ; फलद्रूपता . कृतघ्नाची नोकरी करण्याचे रुप होत नाही . - पु . चंगकांचनी गंजिफांतील सातवा रंग . [ सं . ] ( वाप्र . )०करणे सांगणे ; निरुपण करणे ; वर्णन करणे . जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणे । श्रीगुरुसामर्थ्या रुप करुं म्हणे । - ज्ञा १० . १४ .०पालटणे आकार बदलणे ; निराळी आकृति घेणे ; वेश बदलणे ; चेहरा बदलणे .०होणे एखाद्या कामाचा सुपरिणाम होणे ; चीज होणे ; श्रेय मिळणे ; फलदायी होणे . जीव देऊन काम करुं द्या पण त्या कामाचे रुप व्हावयाचे नाही . रुपास येणे आकार येणे , उत्पन्न होणे ; नांवारुपास येणे ; चांगल्या स्थितीप्रत येणे ; चांगले गुण येऊं लागणे . कां इक्षुदंड गाळितां साचार । तयासि सायास लागती फार । सेवटी रुपास येतां साखर । चवी खाणार जाणती । सामाशब्द -०कार न. मूर्ति ; प्रतिमा ; प्रतीक . - ख्रिपु .०बेरुप न. चांगले किंवा वाईट रुप . [ सं . रुप + विरुप ]०रंग पु. बाह्य देखावा ; सामान्य स्वरुप ; आकृति आणि रंग . रंगरुप पहा . रुपरंग चातुर्यकला पाहुनि झालो खुशी ।०रत्नपरीक्षा स्त्री. नाणी आणि रत्ने यांची परीक्षा ; चौसष्टकलांपैकी ही एक कला आहे .०रेखा षा स्त्री . बाह्य देखावा ; बाह्य मर्यादा . घाट ; आंगलट ; घटना ; बांधा . आराखडा ; कच्चा नकाशा .०लावण्य न. आकाराचे किंवा बांध्याचे सौंदर्य ; आकार , चेहरा व ठेवण यांचा मोहकपणा ; देखणेपणा . बांधेसूदपणा .०लिपी स्त्री. सारणी ; सूत्र . - साठे , रासायनिक परिभाषा ( इं . ) फॉर्म्युला .०वती स्त्री. सुंदर स्त्री ; देखणी स्त्री . [ सं . ]०वान वि. सुंदर ; देखणा ; चांगल्या बांध्याचा . रुप असलेला ; आकृति असलेला ; आकारयुक्त . [ सं . ]०विकार पु. एका रुपातूंन दुसर्या रुपांत जाणे ; रुपांतर ; अवस्थांतर . उदा० बेडूक मूळचा जलविहारी . परंतु स्थलविहारी होऊन हवेचे श्वासोच्छवसन करुं लागला . या रुपांतरास रुपविकार म्हणतात . - प्राणिमो ७६ . रुपांतर न . अन्य रुप ; दुसरे स्वरुप ; नवे स्वरुप . फरक ; बदल [ रुप + अंतर ] रुपाभिमान - पु . सौंदर्याचा अभिमान ; देखणेपणाबद्दलचा गर्व . [ रुप + अभिमान ] रुपावलि - ळी - स्त्री . नामे किंवा क्रियापदे यांची प्रत्यय लावल्यानंतर होणारी रुपे दिलेले पुस्तक . [ रुप + आवली ] रुपडे - न . ( काव्य ) सुंदर रुप ; गोजिरवाणे रुप ; रुप ; मूर्ति ; मोहक मुख . सांवळे रुपडे चोरटे चित्ताचे । उभे पंढरीचे विटेवरी । - तुगा २६३० . मुखवटा ; मुखटोप ; बुरखा . रुपस - न . स्वरुप ; सौंदर्य . - वि . ( काव्य ) चांगल्या आकाराचा ; सुंदर ; रुपवान ; नीट नेटका ; सुरेख ; शोभिवंत ; देखणा . कुष्टी उपहासे रुपसा । - मुसभा १५ . २७५ . रुपी - वि . रुप घेतलेला ; त्यासारखा ; एखाद्याची आकृति धारण केलेला . समासांत पिशाचरुपी , देवरुपी , दैत्यरुपी . रुपिणी - स्त्री . रुप घेतलेली . प्रणवरुपिणी मूळप्रकृति । Rate this meaning Thank you! 👍 रुप A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | रुप m. m.v.l. for रूप, xviii, 3, 40.">[AV. xviii, 3, 40.] Related Words रुप रुप करणें रुप होणें रुप दाविलें उंटानें, गाढवानें गाईलें गाणें रुप पालटणें रुप राजाचें, नांदणूक कैकाडयाची रुप रोवें, भाग खावें रुप राजाचें आणि करणें खाजदाराचें नवर्याचें पाहिलें रुप, विसरला तहानभूक तूप पिऊन (लागलीच) आरशांत रुप पाहाणें रात्रीं खाती तूप, सकाळीं पाहाति रुप माझ्या कामास नांव ना रुप, बोडकीच्या डोक्यास तेल ना तूप पुसून चोळून रुप व मारुन मुटकून प्रेम (येत नाहीं) morph feature properties indeterminate form form of equal strength gaseous form urbanism weighed form solid form ultimate form bilinear form l forms metacyclic form echelon form morpheme nonsense form normal form detatched coefficient form precipitated form form utility quadratic form canonical form accrately agreed to in principle get up u shaped wave shape saw tooth wave form reduced form reduction of fraction reduction to common denominator reduction to lowest term residually round sum remittance on a mandatory basis oogamous form appearance of coin specified in writing unambiguously inflationary by way of amendment lime boring form lime depositing form dumbbell form in the usual course involution form jordan form of a matrix nematoparenchymatous form oblique form collectively responsible in particular as a last resort tax in kind physiologic form forms of capital funded assistance आमची आमचें finalise the draft incorrectly stated on the cuff as an elective subject रुपेस्त पंच तन्मात्रा पंच सूक्ष्मभूतें synopsis statement to find out specifically in theory it may be read as .... legally recoverable potentially viable potentially viable units cis-form co-extensive liability commitments in principle compulsorily retired admitted in evidence advertise selectively advertise the posts locally aid receipts वान मारणें schematic lending referred to as en masse final write off in advance in any form income in kind in prescribed form and manner Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP