|
स्त्री. तंबाखूची एक जात . कृष्णा आणि गोदावरी या नद्यांमधील भागांतील तंबाखूस म्हणतात . - कृषि ४१९ . [ सं . ] स्त्री. रावणाची राजधानी . सिंहलद्वीप ; सीलोन बेट . राक्षस ; वानर , झाडे इ० कांच्या दारुच्या केलेल्या आकृती ; दारुची झाडे . ( विनोदाने , निंदेने ) लहान पोरगी . ( व . ) केस पिंजारलेली , कुंकू नीट नसलेली गयाळी मुलगी . जारिणी , स्वैरिणी स्त्री . [ सं . ] म्ह० ( व . ) लंकेत जन्मले तितके राक्षसच = वाईट कुळांत चांगली माणसे जन्मणे शक्य नाही , याअर्थी . लंकेत , लंकेस सोन्याच्या विटा = लंकेत पुष्कळ सोने असले तरी त्याचा आपणास काय उपयोग ? ( मिळकतीप्रमाणे खर्चहि जास्त या अर्थानेहि वापरतात ). ( वाप्र . ) ०लुटणे अवाढव्य संपत्ति मिळणे . ०होणे ( गो . ) सौंदर्यवान , सालंकृत होणे . सामाशब्द - ०दहनसारंग पु. ( संगीत ) एक राग . यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल निषाद हे स्वर लागतात . धैवत स्वर वर्ज्य . जाति षाडव - षाडव . वादी ऋषभ . संवादी पंचम . गानसमय मध्यान्ह . [ सं . ] ०लूट स्त्री. अगणित संपत्ति मिळविणे ; लंका लुटणे पहा . लंकेची पार्वती स्त्री . ( लंकेला जाऊनहि गोसाविणीच्या वेषांत असणारी शिवपत्नी , पार्वती ) जिच्या अंगावर एकहि दागिना नाही अशी उंच व रोडकी स्त्री . ( सामा . ) अलंकाररहित सवाष्ण स्त्री . ज्यावर खोगीर , जीन वगैरे कांही नाही असा रोडका घोडा . लंकेश्वर - पु . लंकाधिपति रावण . अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणे करविजे लंकेश्वरा । - ज्ञा ११ . २३ . [ लंका + ईश्वर ] लंकोदय - पु . तारे , ग्रह , राशी यांचा सीलोनांतील उदयकाल . यास चरसंस्कार करुन वाटेल त्या ठिकाणचे त्या त्या खगोलांचे उदयकाल काढतां येतात . कारण या शहरावरुन पहिले याम्योत्तरवृत्त जाते असे मानतात . हे उज्जयिनीच्या याम्योत्तरवृत्तावर आहे . मेषाचा लंकोदय चार घटका अडतीस पळे .
|