Dictionaries | References

लगे

   
Script: Devanagari

लगे

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A word of encouragement or excitement; at it! to it! bravo!

लगे

   उद्गा . एखाद्यास उत्तेजन देणे , चेतविणे , या कामी योजावयाचा शब्द . धन्य ! वाहवा ! भले ! [ लागणे ]
 क्रि.वि.  लागलीच ; लगोलग पहा . [ लागणे ]
०ढोल  स्त्री. चटपट व चलाखी ( कामाची ). ( क्रि० लागणे ). - क्रिवि . ( कोल्हाटी , भोरपी , गारुडी इ० कांनी ढोलके वाजवून जलद व पुनः पुनः उच्चारलेला उद्गार ) झपाट्याने ; चलाखीने ; चटपटीने व जोराने ( चालू काम , एखादी क्रिया , चळवळ ). ( क्रि० लावणे ; चालणे ; करणे ) लगेधूम पहा . [ हिं . लगीडहूल ]
०तगे   - क्रिवि . घाईने व अर्धवट ; कसे तरी . पाऊस डोईवर आला तेव्हां लगेतगेकरुन एकदांचे घर शेकारुन घेतले .
करुन   - क्रिवि . घाईने व अर्धवट ; कसे तरी . पाऊस डोईवर आला तेव्हां लगेतगेकरुन एकदांचे घर शेकारुन घेतले .
०तार   क्रिवि . ( व . ) एकसारखा ; मध्ये खळ न पडतां . लगोतर बारा वर्षे नोकरी केली . [ हिं . लगातार ]
०धूम   क्रिवि . झपाट्याने ; चटपटीने ; जलदीने ; झटक्यांत ; क्षणांत . ( क्रि० पळणे ; धावणे ; जाणे ; येणे ). हा शब्द भोरपी इ० लोक चमत्कार दाखवितांना योजितात व लगेढगे या अर्थीच पण थोड्या फरकाने हा येतो .
०लगे  स्त्री. घाई ; गर्दी ; उतावळी . अशी लगेलगे केली तर काम बिघडेल , सावकाश करा . - क्रिवि . घाईने ; गडबडीने ; उतावळीने . तुमचे बलावणे आले तेव्हां लगेलगे जेवलो आणि तसाच आलो .
०हात   क्रिवि .
   त्याच वेगाने ; त्याच दमांत ; त्याच कामाबरोबर . तुम्ही बाजारांत जातांच आहां तसेच लगेहात पुढे जाऊन त्या गृहस्थास बोलावून आणा .
   दुसरी एखादी गोष्ट करीत असतां ; त्याचवेळी ; एकसमयावच्छेदेकरुन .
   ( सामा . ) लागलीच ; पाठीमागून ; ताबडतोब . एका शब्दावरुन निराळ्या शब्दाचे वाचक असे शब्द लगेहात हावे तितके करतात . - नि १८६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP