Dictionaries | References

लठ्ठ

   
Script: Devanagari
See also:  लठ्ठया , लठ्ठा , लठ्ठू

लठ्ठ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : मोटें

लठ्ठ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

लठ्ठ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Enormously large, stout.
 m  A club, cudgel.
  Stout, fat.

लठ्ठ     

वि.  गलेलठ्ठ , गुबगुबीत , जाडया , तगडा . तुंदिल , फोपसा , लठ्ठंभारती , लठ्ठेश्वर .

लठ्ठ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जाड, जाड

लठ्ठ     

 पु. 
सोटा ; सोडगा ; जाड काठी .
ओबड - धोबड जळणाचे लाकूड ; ओंडके . - वि .
विलक्षण मोठा ; भक्कम ; जाड ; धसाडा ( मनुष्य , अवयव , दागिना , दोर , दोरी इ० ).
स्थूल ; फोपशा . [ हिं . ] सामाशब्द -
०निरंजन   लठ्ठभारती लठ्ठंभारती - पु . ( मूळ गोसाव्या संबंधी रुढ . ) शरीराने धष्टपुष्ट , दांडगा मनुष्य . ( विशेषतः निरक्षर व आडाणी ). - वि .
धष्टपुष्ट .
बेफिकीर .
दांडगा .
मूर्ख . लठ्ठा - पु . ( व . ) मोठा ; सोडगा ; लठ्ठा , लठ्ठू , लठ्ठ्या - वि . अजस्त्र ; अमर्याद मोठा ; भक्कम ; जाड ; भसाडा ( मनुष्य , पशु , वस्त्र , भांडे , जिन्नस ). लठ्ठ पहा . लठ्ठाई - स्त्री . दांडगाई ; जनावराप्रमाणे धुडगूस ; लढाई ; लठ्ठामिश्र , लठ्ठाश्रम , लठ्ठूबगाड्या , लठ्ठेश्वर - पु . लठ्ठनिरंजन पहा . लठ्ठामिश्रई - स्त्री .
उर्मटपणाचे वर्तन ; दांडगाई .
लठ्ठालठ्ठी . [ मिश्र = मैथिली ब्राह्मणाची पदवी ] लठ्ठालठ्ठी - स्त्री . सोटे , दांडकी इ० कांनी परस्परांमध्ये चालणारी मारामारी ; ( सामा . ) भांडण ; हमरीतुमरी . आम्हां लोकांत एकी तरी इतकी यत्किंचित लाभ होण्याचा सुमार दिसूं लागला न लागला तो लठ्ठालठ्ठी सुरु व्हावयाची ! - के . लठ्ठाश्रम - मी - पु . ढोंगी , दांभिक , धटिंगण असा जोगी . लोठाश्रम पहा . लठ्ठश्रमाच्या लागून पायी । विघ्न आणिले राज्यांत । - नव १८ . ३५ . [ लठ्ठ + आश्रमी ] लठ्ठेश्वर - लठ्ठनिरंजन पहा . लठ्ठ्या - पु . ( बायकी )
दांडगा , स्वैर , मोकाट माणूस . लठ्ठा पहा .
एखाद्या स्त्रीने ठेवलेला माणूस ; जार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP