|
न. मीठ , क्षार . - पु . क्षाररस . - वि . खारट ; खारे ; क्षारयुक्त . [ सं . ] सामाशब्द - नस्त्री . खोलगट , सखल स्थल ( जमिनीतील इ० ); बतखल . ( सामा . ) खोल , आंत गेलेला भांग ; खळगा . जसे - पायाची - मानेची - हाताची - लवण . ०जल न. ( काव्य . ) ( खारे पाणी ) समुद्र . लवणजलविषे करुन । सर्व हा पसरला लंबायमान । [ सं . ] वळण ; वांकण ( रस्त्याचे , नदीचे इ० ). ०त्रय न. सेंधेलोण , पादेलोण , बिडलोण ही तीन लवणे ; त्रिलवण . - योर १ . १७६ . [ सं . ] ०पंचक न. संचळ ( पादेलोण ), सैंधव , बिडलोण , औद्भिद ( जमिनीमध्ये उकरुन निघालेल्या खार्या पाण्यापासून सूर्यकिरणांच्या किंवा अग्नीच्या साहाय्याने झालेले मीठ ) व समुद्राच्या पाण्यापासून झालेले मीठ . - योर १ . १७६ . [ सं . ] ( व . ) लहानसा ओढा ; नाला . उतार ; उतरती जागा . ०शाक ख पुस्त्री . खारावलेली फळे , भाज्या ; लोणचे [ सं . ] लीनता ; लवणे . [ लवणे ] म्ह० लवण तेथे जीवन . ०सागर पु. खारा समुद्र . कां लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरी । - ज्ञा १५ . ३१८ . [ सं . ] ०भंजन न. ( उप . ) पूज्यतेचे व नम्रतेचे मोठे आडंबर करणे ; लवून नमस्कार करुन पूज्यतादर्शक शब्दांनी संबोधणे , बोलणे . ( क्रि० करणे ). पंडित भेटती समत्सर । लवण भंजन अतिनम्र । - एभा १० . १७३ . अत्यंत नम्रता , आदर ; आर्जव . [ लवणे + भजणे ] लवणा - वि . ( व . ) ओणवा . लवणा पड . लवणी - स्त्री . वांकलेल्या शरीराच्या अवयवाच्या खालील लवण लवण ; खळगी . बांक ; वक्रता ; कमान ( रस्त्याची इ० ); लवणांतील आंत गेलेला भाग . [ लवणे ] लवणे - अक्रि . वांकणे . लवलेले - वि . वाकलेले ; नमलेले . भारेलवे प्रतिपदी भू , शेष धरुं शके न लवलीला । - मोभीष्म ४ . ४० . वांकणे ; दबणे ; दबकणे . तळपणे ( वीज ). स्फुरणे ( डोळा ). कलणे ( मन , मनोवृत्ति ); वाहणे ( मनदेवता - पिंगळी ) ह्या अर्थी मन , मनदेवता , मनपिंगळी इ० शब्द कर्तृस्थानी योजतात . ( व . ) उडणे ; उडी मारणे . भिंतीवरुन लवला . लीन , नम्र होणे . ' गुरुचरणी त्यजुनि खेद लवतीस । - मोवन ४ . ७१ . [ सं . लीन ; नमन ; अप . नवन ; हिं . नौना , पं . नौणा ] लवन - पु . पाणी वाहून जाण्याचा पाट ; लवण अर्थ ३ , ४ पहा .
|