Dictionaries | References

लाग

   
Script: Devanagari

लाग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी भेजी, पाई या देखी गई सूचना, जानकारी आदि का समयानुसार अभिलेख   Ex. लाग देखने पर पता चलेगा कि अभी तक कितने शब्द देखे गए हैं ।
ONTOLOGY:
संज्ञापन (Communication)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लॉग
Wordnet:
asmকার্যবৃত্তান্ত
benলগ
gujલાગ
kasلاگ
kokसुचोवणी तकटो
malലോഗ്
mniꯂꯣꯒ
oriଲଗ୍
panਲਾਗ
urdلاگ

लाग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : नखरो

लाग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
lāga f P After-sproutings of corn. A commoner word is पडसाळ.
of any effort or project. Ex. माझी पंचायत लागीं लागली.

लाग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Congruous relation; consistency. 
blow . A crop. An effort. An aim. A shoal.  Season (पेरणीचा लाग). Lay means and measures towards the attainment of  लाग साधला Object is gained.  A piece of woman's चोळी under the arm.

लाग     

 पु. 
 पु. १ संधि ; वेळ ; संभव ; शक्यता . पाऊस पडण्याचा लाग दिसतो . आंबे पिकायचे लागास आले म्हणजे काढावे . झाडी जेव्हां तोडली तेव्हां किल्ल्याजवळ जायास लाग झाला . २ मनांतील संधान उमेदीची दिशा ; प्रयत्न ; नेम ; खटाटोप ; खटपट ( क्रि० करणें ). चाकरीसाठी बहुत लाग केले परंतु एकही चालला नाही . तुझा अश्व धरुनिया याग । हंसध्वज करी सांग । परी सोडवावयाचा तुझा लाग । येथें कांही न चाले। जै १९३१ . राजदूत पावले लागा। - मुआदि २५ . ६ . ३ ध्येय , विषय ; हेतु ; उद्देश ; मनुष्य ज्याचा पाटलाग करतो ती वस्तु ( क्रि० धरणें ; बांधणें ). उदा० लाग साधला = हेतु साधला ; कार्य यशस्वी झालें . याच्या उलट लाग फसाला , एक लाग आला आहे . = कांहीं तरी मिळण्याचा संभव आहे किंवा प्रयत्नास जागा आहे . तो लागावर चालला . हा लाग योजून जातो इ० ४ एखाद्यावर ओढवलेलें संकट ; दुर्दैवाचा प्रसंग ; हल्ला ; घाला . आजपावेतोम दोन तीन लाग निभावले , आतां हा लाग कठीण . जीववरचा लाग . ५ हल्ला ; झपाटा ; तडाखा . सांडी सांडी भीमकीचा संग । अबद्ध बाधिजसी निलाग । आला कोपिष्टांचा लाग । पडेल पांग दुजयाचा। - एउरस्व ८ . २३ . ६ पीक , बहार , झाड , शेत इ० पासून फळें , धान्य इ० रुप प्राप्ति . इरसाल झाडास लाग कमी असतो . ७ फळें आणि बहर येण्याची वेळ ; योग्य काल ; हंगाम ; फलादी रुप उत्पन्न करण्याची वृक्षादींची स्थिति . नारळ , माड लावळ्यापासून दहाव्या वर्षी लागास येतो . ८ दांडा ; जहाज किनार्‍यास येऊन लागतें ती जागा ; जहाज होडी इ० चा तळ जेथें जमिनीस लागतो ती जागा . ९ चोळीला कांखेंत ठुशीखालीं द्यावयाचा जोड , तुकडा . १० पकड ; कैंची ; तिढा ; टेकण ; आश्रय ; आधार ; जागा ; पाया ; धर ( जड वस्तु वर ठेवण्याकरितां ). ह्या खांबाला हा घोंडा लाग म्हणून पुरे . ११ पदार्थाचा मादक गुण ; तंबाखू इ० पदार्थाचा अंमली गुण . सुपारी खाल्ली असतां ती कांहींना लागते तेव्हांचा मदांश . १२ जनावराला एखाद्या ठिकाणीं होणारा रोग . तोंडलाग , पायलाग . १३ मारा ; स्पर्श ; पोंच ; पल्ला ( बंदूक , तोफ इ०चा ). बंदुकीचा तोफेचा - तिराचा - गोळीचा - कमानीचा - लाग १४ शिकार ; लूट ; प्राप्ति ; लग्गा . आम्ही तिघेजण संकेताप्रमाणें लाग लागेल तर पहावा म्हणून शहरांत जाण्यास निघालों . - विवि ८ . ११ . २०३ . १५ पत्ता ; शोध ; तपास ; पाठलाग . लाग प्रसेनतनुचा लावी हरिचाहि मग महाभाग। - मोकृष्ण ८३ . १११ . - ऐपो १५९ . १६ विशिष्ट गात्र , इंद्रिय इ० ची विकृति १७ स्थिति ; अवस्था . निरितामागें बैसला वाघु । अथवा पुढें आला स्वर्ग भोगु । त्यासि नाहीं रागविरागु तैसा कठिण लागु । नाशासि मूळ स्त्रीसंगू। - एभा ८ . ६९ . १९ आवड ; प्रीति . तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानी आम्हासि लागु । आणि तुजही अनुरागु । अथि येथ। - ज्ञा १३ . ६४४ . २० अधिकार . एअथ इंद्रियाचा पांगु जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया । - ज्ञा ५ . ६६ . २१ ( कों .) गवताच्या उत्पन्नकरितां राखून ठेविलेली डोंगराळ जमीन . लागाची कुपण धरण्याची वेळ झाली . २२ सामर्थ्य ; मगदूर . २३ सोय . कडावरुनि पाहिला लाग। - दावि २१८ . २४ रीघ ; वाट , २५ युक्ति . हा बाहेर निघोन येई असा लागेच ना लाग तो। ०र ५७ . २६ मिलाफ . तुम्हा उभएता लाग लागोम हे ना । सेवितां मी। ०ऋ८१ . २७ ( व .) पशुपक्ष्याअदिकांचें मैथुन ; कावळा , सर्प इ०ची सुरतक्रीडा . कावळ्यांचा लाग पाहिला . २८ ( जरकाम ) तारेची दिशा बरोबर लावणारा , रुळ , २९ ( लोहारकाम ) मोठा अवजड हातोडा . रेवीट ( रिव्हेट ) फुलवितांना एका बाजूनें ठोकतात व दुसर्‍या बाजूस याचा जोर लावतात . ३० ( चांभारी ) अपुर्‍या सागळीस लागलेला तुकडा . ३१ ( संगीत ) एका स्वरावर थांबून मग दुसर्‍या स्वरावर उडी घेणें . (- स्त्री .) उदॆए ; उड्डाण ( क्रि०मारणें )- क्रिवि . एकामागून एक ; लागोपाठ ( लागलगट , लागट या अर्थी ). [ संलग् ‌ - लग्न ; प्रा . लग्न ] ( वाप्र .) ०करणें - हल्ला चढविणें सर्वेंचि पिप्लिका करिती लाग । देखोनि माजला कीर्तनरंग। - दावि २६९ . ०चालविणें - ठरलेल्ल्या क्रमानें किंवा सरणींने चालू करणे . ( कांही काम योजना , बेत ). ०दवडणें - संधि घालविणें ; लाभ दवडणें . ०दवडणें - एखाद्या गोष्टीच्या सिद्धीसाठी आपल्या योजना चालू करणें , मागें लावण . ०लावणें०१ ( प्राप्तीसाठी ) संधान बांधणें ; कांही वशिला खर्च करणें ; हरएक प्रकारें उपाय , युक्ति योजून काम जुळेलसें करणें . २ माग काढणें ; पाठलाग करणें . मागोनि लाग लावित नृपबळ येउनि। ०मोआदि १५ . ६३ ( एखादें काम ) लागाला येणें - लागीं लागणें - लागावर येणें - मिळणें जुळणें - एखादें काम सुरळीतपणें सुरु होणें किंवा चालू लागणें , सिद्धीच्या मार्गावर असणें . पंथाला लागणें . माझी पंचायत लागीं लागली . लागास येणें - रंगारुपास , फलद्रुप होण्याच्या बेतांत येणें . सामाशब्द - ०पाठ - पु . स्त्री . १ लगबग . त्वरा ; घाई . करा करा लागपाठ। धरा पंढरीची वाट । - तुगा २५६४ . २ लागलेंच अनुसरण ; पाठलाग ; पाठपुरावा . ( क्रि० पुरवणें ; पुरणें ; लागणें ). ०पाळती -- स्त्री . पाठीस लागण्याची किर्या . किमर्थ अर्थी माझियें पृष्ठीं। लागपाळती केली त्वां - नव१३ . १३८ . ०बग०पु . संबंध . पाईक तो जाणे या इक्रीचा भाव । लगबग ठाव चोरवाट । - तुगा ३७५ . ०बंदी - वि . जीस लाग लावले आहेत अशी , चांगल्या प्रकारची ( चोळी ). नका सोडू तरी गांठ चोळी फाडाल लागबंदीची। - होला ९७ ०भोग - पु . १ संबंध ; लागाबांधा . निष्ठुरा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचाचि । - तुगा १२१७ . २ पाठलाग . ०माग - पु . लागभाग ; उपाय . पराक्रमाचा लागमाग । क्षात्रकर्म किं कपटांग। - ज्ञानप्रदीप २८१ ०लाब्या - वि . युक्त्या , बेत वगैरे योजून काम साधणारा ; संधान बांधण्यात शल . ०वण - स्त्री . पाठलाग . साध्य साधूति अंजन । करी लागवण स्त्रियांसी । - एभा १० . ५७७ .
०वेग   क्रिवि . घाई ; त्वरा ; लगबग .
संधि ; वेळ ; संभव ; शक्यता . पाऊस पडण्याचा लाग दिसतो . आंबे पिकायचे लागास आले म्हणजे काढावे . झाडी जेव्हां तोडली तेव्हां किल्ल्याजवळ जायास लाग झाला .
मनांतील संधान ; उमेदीची दिशा ; प्रयत्न ; नेम ; खटाटोप ; खटपट . ( क्रि० करणे ). चाकरीसाठी बहुत लाग केले परंतु एकही चालला नाही . तुझा अश्व धरुनिया याग । हंसध्वज करी सांग । परी सोडवावयाचा तुझा लाग । येथे कांही न चाले । - जै १९ . ३१ . राजदूत पावले लागा । - मुआदि २५ . ६ .
०वेग  स्त्री. अतिशय त्वरा ; घाई ; गडबड . आतां लागवेग करा । ज्याचे धरा ठाके ते । - तुगा १९३९ . - पु .
प्रतीक्षा ; वाट . पाटलाचा लागवेग । किती म्हणून पहावा । - दा ९ . ६ . ४२ .
ध्येय ; विषय ; हेतु ; उद्देश ; मनुष्य ज्याचा पाठलाग करतो ती वस्तु . ( क्रि० धरणे ; बांधणे ). उदा० लाग साधला = हेतु साधला ; कार्य यशस्वी झाले . याच्या उलट लाग फसला , एक लाग आला आहे . = कांही तरी मिळण्याचा संभव आहे किंवा प्रयत्नास जागा आहे . तो लागावर चालला . हा लाग योजून जातो इ०
संबंध ; लागाबांधा . नरदेहाचेनि लागेवेगे । एक लागे भक्तिसंगे । - दा १ . १० . २ .
एखाद्यावर ओढवलेले संकट ; दुर्दैवाचा प्रसंग ; हल्ला ; घाला . आजपावेतो दोन तीन लाग निभावले , आतां हा लाग कठिण . जीवावरचा लाग .
०वेग   गी गे क्रिवि . त्वरित ; ताबडतोब ; लगबगीने . शत्रु निर्दाळी लागवेगी । यश त्रिजगती न समाये । - भारा १२ . ३२ . महत्कृत्य सांडूनि मागे । देवास ये लागवेगे । - दा २ . ७ . ३४ . लागाची चोळी स्त्री . नऊ तुकड्यांची चोळी . याच्या उलट अखंड चोळी . लागावेगा पु . लागवेग ; लागाबांधा . न कळे कव्हणा लागावेगा । - उषा १२४ . लागचा वि . ( गो . ) लगतचा ; जवळचा .
हल्ला ; झपाटा ; तडाखा . सांडी सांडी भीमकीचा संग । अबद्ध बाधिजसी निलाग । आला कोपिष्टांचा लाग । पडेल पांग दुजयाचा । - एरुस्व ८ . २३ .
पीक , बहार , झाड , शेत इ० पासून फळे , धान्य इ० रुप प्राप्ति . इरसाल झाडास लाग कमी असतो .
फळे आणि बहर येण्याची वेळ ; योग्य काल ; हंगाम ; फलादि रुप उत्पन्न करण्याची वृक्षादींची स्थिति . नारळ , माड लावल्यापासून दहाव्या वर्षी लागास येतो .
दांडा ; जहाज किनार्‍यास येऊन लागते ती जागा ; जहाज होडी इ० चा तळ जेथे जमिनीस लागतो ती जागा ;
चोळीला काखेंत ठुशीखाली द्यावयाचा जोड , तुकडा .
पकड ; कैची ; तिढा ; टेकण ; आश्रय ; आधार ; जागा ; पाया ; धर ( जड वस्तु वर ठेवण्याकरितां ). ह्या खांबाला हा धोंडा लाग म्हणून पुरे .
पदार्थाचा मादक गुण ; तंबाखू इ० पदार्थांचा अंमली गुण . सुपारी खाल्ली असतां ती काहींना लागते तेव्हांचा मदांश .
जनावराला एखाद्या ठिकाणी होणारा रोग . तोंडलाग , पायलाग .
मारा ; स्पर्श ; पोंच ; पल्ला ( बंदूक , तोफ इ० चा ). बंदुकीचा - तोफेचा - तिराचा - गोळीचा - कमानीचा - लाग .
शिकार ; लूट ; प्राप्ति ; लग्गा . आम्ही तिघेजण संकेताप्रमाणे लाग लागेल तर पहावा म्हणून शहरांत जाण्यास निघालो . - विवि . ८ . ११ . २०३ .
पत्ता ; शोध ; तपास ; पाठलाग . लाग प्रसेनतनुचा लावी हरिचाही मग महाभाग । - मोकृष्ण ८३ . १११ . - ऐपो १५९ . १६ . विशिष्ट गात्र , इंद्रिय इ० ची विकृति .
. स्थिति ; अवस्था . निद्रितामागे बैसला वाघु । अथवा पुढे स्वर्ग भोगु । त्यासि नाही रागविरागु । तैसा लागु ज्ञात्याचा । - एभा ७ . १२४ .
संबंध . या प्रपंचाचा कठिण लागु । नाशासि मूळ स्त्रीसंगू । - एभा ८ . ६९ .
आवड ; प्रीति . तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानी आम्हासि लागु । आणि तुजही अनुरागु । आथि येथ । - ज्ञा १३ . ६४४ .
अधिकार . एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासिच आथि लागु । परिसावया । - ज्ञा ५ . ६६ .
( कों . ) गवताच्या उत्पन्नाकरितां राखून ठेविलेली डोंगराळ जमीन . लागाची कृपण धरण्याची वेळ झाली .
सामर्थ ; मगदूर .
सोय . कडावरुनि पाहिला लाग । -- दावि २१८ .
रीघ ; वाट .
युक्ति . हा बाहेर निघोन येइल असा लागेच ना लाग तो । - र ५७ .
मिलाफ . तुम्हा उभएता लाग लागो हे ना । सेवितां मी । - ऋ ८१ .
( व . ) पशुपक्ष्यादिकांचे मैथुन ; कावळा , सर्प इ० ची सुरतक्रीडा . कावळ्यांचा लाग पाहिला .
( जरकाम ) तारेची दिशा बरोबर लावणारा , रुळ .
( लोहारकाम ) मोठा अवजड हातोडा . रेवीट ( रीव्हेट ) फुलवितांना एका बाजूने ठोकतात व दुसर्‍या बाजूस याचा जोर लावतात .
( चांभारी ) अपुर्‍या सगळीस लागलेला तुकडा .
( संगीत ) एका स्वरावर थांबून मग दुसर्‍या स्वरावर उडी घेणे . ( - स्त्री . ) उडी ; उड्डाण ( क्रि० मारणे . ) - क्रिवि . एकामागून एक ; लागोपाठ ( लागलट , लागट या अर्थी ). [ सं . लग - लग्न ; प्रा . लग्ग ] ( वाप्र . )
०करणे   हल्ला चढविणे . सवेचि पिप्लिका करिती लाग । देखोनि माजला कीर्तनरंग । - दावि २६९ .
०चालविणे   ठरलेल्या क्रमाने किंवा सरणीने चालू करणे . ( कांही काम योजना , बेत ).
०दवडणे   संधि घालविणे ; लाभ दवडणे .
०दवडणे   एखाद्या गोष्टीच्या सिद्धिसाठी आपल्या योजना चालू करणे , मागे लावणे .
०लावणे   
( प्राप्तीसाठी ) संधान बांधणे ; कांही वशिला खर्च करणे ; हरएक प्रकारे उपाय , युक्ति योजून काम जुळेलसे करणे .
माग काढणे ; पाठलाग करणे . मागोनि लाग नृपबळ येउनि । - मोआदि १५ . ६३ . ( एखादे काम ) लागाला येणे - लागी लागणे - लागावर येणे - मिळणे , जुळणे - एखादे काम सुरळीतपणे सुरु होणे किंवा चालू लागणे , सिद्धीच्या मार्गावर असणे . पंथाला लागणे . माझी पंचायत लागी लागली . लागास येणे - रंगरुपास , फलद्रूप होण्याच्या बेतांत येणे . सामाशब्द -
०पाठ  पु. स्त्री .
लगबग ; त्वरा ; घाई . करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट । - तुगा २५६४ .
लागलेच अनुसरण ; पाठलाग ; पाठपुरावा . ( क्रि० पुरवणे ; पुरणे ; लागणे ). पाळती - स्त्री . पाठीस लागण्याची क्रिया . किमर्थ अर्थी माझिये पृष्ठी । लागपाळती केली त्वां । - नव १३ . १३८ .
०बग  पु. संबंध . पाईक तो जाणे या इक्रीचा भाव । लागबग ठाव चोरवाट । - तुगा ३७५ .
०बंदी वि.  जीस लाग लावले आहेत अशी , चांगल्या प्रकारची ( चोळी ). नका सोडूं तरी गांठ चोळी फाडाल लागबंदीची । - होला ९७ .
०भाग  पु. 
संबंध ; लागाबांधा . निष्ठुरा उत्तरी न धरावा राग । आहे लागभाग ठायींचाचि । - तुगा १२१७ .
पाठलाग .
०माग  पु. लागभाग ; उपाय . पराक्रमाचा लागमाग । क्षात्रकर्म किं कपटांग । - ज्ञानप्रदीप २८१ .
०लाब्या वि.  युक्त्या , बेत वगैरे योजून काम साधणारा ; संधान बांधण्यांत शल .
०वण  स्त्री. असाध्य साधूति अंजन । करी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP