Dictionaries | References

वदणे

   
Script: Devanagari

वदणे     

क्रि.  कबूल करणे , बोलणे , सांगणे .

वदणे     

उ.क्रि.  
उघड करणे ; मनांतले , लपवून ठेवलेले बोलूं लागणे ; कबूल करणे .
प्रतिपादणे ; जाहीर करणे ; मोठ्याने बोलणे .
अक्रि . ( सामा . ) बोलणे ; सांगणे . आतां पाल्हाळ टाकोनि सत्वर । संतचरित्रे वदावी । [ सं . वद ] वदंता - स्त्री . बातमी ; बोलवा ; जनवार्ता . [ सं . वदंती ] वदंती - स्त्री .
भाषण ; बोलणे . हे ब्रह्मीची वदंती । तुज निवेदिली गा भूपती । - कथा ६ . १२ . ७४ .
वचन ; वाक्य . अव्यक्त वादमती । अव्यक्त ऐसी वंदती । - जा १४ . ६९ .
वार्ता ; बोलवा . मग कल्पादी पुढती । मीचि सृजी ऐसी वदंती । - ज्ञा ९ . १०५ .
उपदेश ; उच्चार . पै गुरुशिष्यांचिया एकांती । जे अक्षरा एकाची वदंती । - ज्ञा १० . १२६ .
वटवट ; बडबड . गाडींतून उतरल्यापासून आपलीच एकसारखी वदंती चालू आहे . आम्ही बोलावं केव्हा ? - भयंकरदिव्य . [ सं . ] ( वाप्र . ) वदतोव्याघातः - उघड विरोध ; स्पष्ट विसंगतता ; उघड असणार्‍या विरुद्धतेचे प्रतिपादन करणार्‍याविषयी योजतात . वदवणे , वदविणे - उक्रि . बोलविणे ; बोलावयास लावणे ; तोंडातून काढणे . ( वदणे प्रयोजक ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP