|
वि. ( गो . ) अर्धे जळलेले . वळणुचे - क्रि . ( गो . ) अर्धेमुर्धे जळणे . [ सं . ज्वलन - वळणे ] स्त्री. ( व . ) वळचण पहा . न. आकारभेदाचे प्रकार ( अक्षर , चित्र , शरीर , अवयव इ० चे प्रत्येकी ); तर्हा ; मोड . गोंदूनानाच्या अक्षराचे वळण बिवलकरी दिसते . वागण्याची रीत , पद्धति , व्यवहार . कल , प्रवृत्ति ; झोंक ( अंतःकरण , मन इ० चा ). शिक्षण ; शिस्त ; व्यवस्था . बाळकास वळणांत ठेवावे . देणे , घेणे , जाणे , येणे इ० व्यवहार व त्यामुळे येणारा संबंध ; दळणवळण . सरकारांत वळण बांधावे , मग फिर्याद करावी . वक्रता ; सरळपणा नसणे ; वांक , ( नदी , रस्ता , काठी इ० चा ). डोंगराचे वांकण नद्यादिकांचे पाणी विवक्षितजागी न्यावयासाठी बांधतात ते धरण ; बांध ; माती दगड वगैरेचा वळ . उदधीचे वळण फुटे । - उषा ९९ . २३ . वशिला ; वजन . ( क्रि० बांधणे ). चिंतोपंतांनी रामशेटजीकडे वळण बांधून नोकरी मिळविली . वेढा ; वळसा . दुर्मोच्य काळपाशासम याच्या होय वळण वळयाचे । - मोवन ६ . २० . [ सं . वलन ] म्ह० वळणाचे पाणी वळनानेच जाईल . पाण्याआधी वळण बांधावे . ( वाप्र . ) वळण बांधणे - ( ल . ) मैत्री संपादन करणे ; संधान बांधणे . वळणावर जाणे - अनुसरणे ; प्रमाणे चालणे , वागणे . हा अगदी बापाच्या वळणावर गेला . सामाशब्द - ०डळण दळण न . दळणवळण पहा . ०दार वि. चांगला आकार , वळण असलेले ; नीटनेटके . एकसारखे , व्यवस्थित , शुद्ध ( लेखन ). घटींव घोंतीव यांपासून हे निराळे आहे . ०शुद्ध सूद वि . प्रमाणशीर ; वळणदार . ती कामाच्या सोईकरितां अथवा वळसूदपणाकरितां सुधारण्यांत आली . - इंमू ३५२ . वळणी स्त्री . वळणे , वळण पहा . वळणी , वळणीस आणणे येणे वठणीस आणणे - येणे पहा . तव विक्रमाविणे पळभरिहि न येतींच खळ बळे वळणी । - मोनामरसायन . वळणे उक्रि . दिशा बदलणे ; फिरविणे . राखणे ; सांभाळणे ( गुरे , मेंढ्या इ० ). चला वळूं गाई । बैसो जेऊं एके ठायी । - तुगा २०० . बनविणे ; घडविणे ( पिळून , इतर क्रिया करुन ). संस्कृत इक्षुदंडरस अपार । त्याची प्राकृत हे वळिली साखर । - ह १९ . २२२ . अंकित करणे ; वश करणे . मातल्या कामभद्रजाती । विवेकांकुशे वळावा । - मुआदि १६ . ११ . वळवून , परतवून नेणे , आणणे . जन कथिति धेनु कुरुनी वळिल्या येऊनि उत्तरशेला । - मोविराट ६ . ६३ . वळल्या हातीवरल्या ढाला । - ऐपो २१ . वळता करणे , घेणे . - अक्रि . घटले जाणे ; चांगले तयार होणे ( अक्षर ). वळणदार होणे ; योग्य रुप घेणे . ( चित्र , प्रतिमा इ० नी ). वांकणे ; कलणे ; दिशा , रुप , आकार इ० बदलणे . - ज्ञा ११ . ४८७ . मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल . आकाशी मेघ करी गर्जना । वळला पर्जन्य सभोंवता । शरीरावय वायूने आंत ओढला जाणे , त्याला वेदना होणे ; पेटका येणे ; वांव येणे . अनुकूल , वश होणे ; कबूल होणे . वळला न ईश्वरासहि तो दुष्ट वळेल काय इतरांला । - मोउद्योग १० . ७१ . प्रसन्न होणे . म्हणे सोसिका नृपा ! वळलो । - मोअश्व १ . ३५ . फिरणे ; विशिष्ट दिशेने जाणे . [ सं . वलन ] वळता देणे - परत देणे , करणे ( पैसा , उसनी वस्तु ). वळती - स्त्री . रानामध्ये गेलेली गुरे परत वळवून आणण्याचा व्यापार . गुरे वळून आणण्याची पाळी ( गुराखी पोरे खेळत असतां ज्यावर डाव येतो त्याने गुरे वळावी असा संकेत ). वांसुरे चारितां गोविंदा । वळत्या न देसी तूं कदा । - ह ३६ . ५६ ; - तुगा १७० . एकदम , एकाएकी आगमन , फेरी . ( क्रि० येणे ). दूध उघडे टाकूं नको मांजराची जर कोण्हीकडून वळती आली तर खाऊन जाईल . उलट चाल , जाण्याचा रोंख , वळण ; फेरी . गुरे गांवाकडे येत होती आतां वळती रानाकडे चालली . ( जुगार ) विशिष्ट दान पडले असतां घेण्यासाठी मांडलेले द्रव्य . छपराचा सुरवातीचा , तळचा भाग . ( क्रि० बांधणे ). हल्ला चाल . ( क्रि० करणे ). मौजे मजकुरावरि डफळेची फौज येऊन वळती केली ते समयी युद्ध जाहले . - वाडशाछ १०७ . वळतीस येणे - वळणीस , वठणीस येणे . त्यांनी धनीण बहु दक्ष असे म्हणावे । घेवोनि धाक हृदयी वळतीस यावे । - अर्वाचीन ३८२ . वळते करणे - वजा करणे . वळवणी - स्त्री . एक हत्यार ; पकड . वळविणे - उक्रि . ( वळणे प्रयोजक ). आकार देणे ; घडविणे . फिरविणे ; कलते करणे ( केंस इ० ). गिरविणे ; घटवणे ; वळण देणे ( कित्ता , खरडा , हस्तव्यवसाय इ० ला ). तयार करणे ( पिळून , विणून ). वळाण - न - न . ( प्र . ) वळण पहा . वळित , वळीत - स्त्री . सुरकुती . लपौनि चोर खांचेचा वोहळी । वळीतपळिताचे ताडवन घाली । - भाए ५२१ . वळती ; परत फिरणे . ( क्रि० धरणे ). आतां मोडूनि ठेली दुर्गे । कां वळित धरिले खगे । - ज्ञा १३ . ५८३ . वळती पहा . मेलेले माणूस भूत होऊन घरी परत येणे . वळींव - वि . वळलेले ; पीळ दिलेले ; विणलेले . घट्ट पिळलेले , वळलेले ; पिळदार . भक्कम ; चांगले मजबूत ; घटलेले ( शरीर इ० ) वळीव गवरी - स्त्री . गोळा बनविलेले शेण ; गोल गवरी ; थापा - थापटी नव्हे .
|