|
पु. १ संताप ; क्षोभ . ( क्रि० जाणें ). आपणपें लोपे वारा । विकोपीं जाय । - ज्ञा १५ . २५३ . २ अनर्थ ; वाईट परिणाम ( क्रि० होणें ). गव्हर्नरांच्या धमकावणीचा आम्ही निषेध करतों . या पुढें तेथें ( बारडोलीस ) कांहीं विकोप झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर आहे . [ सं . वि + कुप् = कोपणें ] विकोपास , विकोप्यास , विखोप्यास जाणें - १ अतिशय राग होणें राग भडकणें . २ कुपथ्यानें , विरुध्दोपचारानें जास्त बिघडणें ( रोग , गांठ , जखम , क्षत ). ३ चिरडीवर जाणें ( वाद , तंटा ). ४ फाजील , बेसुमार होणें ( किंमत , मोल ). ५ अतिशय वर चढणें ; शिखरास पोंचणें . ६ नष्ट होणें ; नाश पावणें ( मैत्री , प्रीति ). ७ बिघडणें ; नासणें ( मसलत , बेत , उपाय , गोष्ट ). ( कोणी हा शब्द विख = विष पासून व्युत्पन्न झाला असें समजून तदनुरूप अर्थ करतात . )
|