Dictionaries | References व विघड Script: Devanagari Meaning Related Words विघड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v पाड, पड. विघड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( श . व ल . ) भाग , अवयव यांची फूट ; भेद ; पृथक्करण . त्यापासून उत्पन्न होणारी भिन्नता ; अव्यवस्था ; बिघाड . ( यंत्रे , अनेकावयवी रचना , संस्था , पक्ष , इ० कांमध्यें ). परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं । - ज्ञा ८ . २५७ . २ वियोग ; वियुक्तता ; बेकी . ( स्त्री . पुरुष , मित्र इ० कांची ). ( क्रि० पाडणें ; पडणें ). विकविला जीव डोंबा घरीं । पाडिला विघड नळदमयंतीमधी । - तुगा ४१३८ . ३ विकलता ; विरूपता . कळां वोहट चढु । परि चंद्रि नाहीं विघडु । - भाए २९४ . [ सं . विघट ] विघडणें - न . ( महानु . ) बिघाड ; भांडण . भणती शंभूसी विघडणें । एणेंची केलें । - शिशु १३० . विघडणें - उक्रि . १ नाश करणें ; फोडून तुकडे करणें . २ बिघाड ; करणें ; खराब करणें ; नासणें . प्रचितीविण औषध घेणें । तरी मग घडचि विघडणें । - दा १० . ८ . ६ . ३ ताटातूट , वियोग करणें . मंजुळ वदनीं बचनागाची कांडी । शेवटीं विघडी जीव प्राण । - तुगा ३००१ . ४ सोडणें ; टाकणें ; दूर करणें ; विमुख करणें . स्त्री कारणें विघडिलीं । सकळहीं जिवलगें । - दा ३ . २ . ५० - अक्रि . १ नाहीसें होणें ; नाश पावणें . तेवीं गुरुकृपा उजियेडें । ज्याचें लिंगदेह विघडे । - एभा ११ . २५२ . २ तुटणें ; भंगणें . जंव जंव भक्तीचें पुट चढे । तंव तंव अविद्या बंध विघडे । - एभा १४ . ३४० ; - ज्ञा ९ . १७० . ३ ताटातूट होणें ; अंतर पडणें ; वियोग होणें . वत्स विघडलियां धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा । - ज्ञागा २२१ . ४ विलयास जाणें ; गळणें ; मोडणें ( निश्चय , पण , इ० ). घडिघडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । - राम करुणाष्टक . [ सं . विघट ] विघडविणें - सक्रि . शिथिल करणें . नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । - ज्ञा ६ . २१९ . विघडाविघड - स्त्री . १ मोडून तोडून टाकणें ; नाश करणें ; मोडतोड . परि व्हावया तेथें विघडाविघड । - दावि २४९ . २ बिघडविणें ; खराब करणें . ३ बिघडवलेली , खराब केलेली स्थिति . [ विघडणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP