Dictionaries | References व विडा उचलणें Script: Devanagari Meaning Related Words विडा उचलणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पूर्वी एखादी महत्वाची कामगिरी कोणास सांगावयाची झाली म्हणजे राजा दराबारांत विडा मांडून तो कोणासहि उचलण्यास आव्हान देत असे व जो मनुष्य तो विडा उचलील त्यानें ती कामगिरी पतकरली असें समजण्यांत येत असे. यावरुन प्रतिज्ञा करणेंएखादी गोष्ट करण्याचें अंगावर घेणें. ‘ त्यांनीं ज्याच्या रक्तानें नाहाण्याबद्दल विडा उचललेला आहे ते कोण ? ’ -उषःकाल. ‘ विडा पैजेचा उचलूं नको. ’ -अफला. ‘ अमका म्हणतो आजपासून चहा सोडला, तमक्यानं विडासुद्धां खायचा नाहीं असाच विडा उचलला. ’ -एकच प्याला. ‘ कल्पनेच्या बाहेर नाश फजीति झाल्यावांचून राघोबाला पेशवाई देण्याचा विडा उचललेले इंग्रज, पेशव्यांच्या बरोबर तहकरण्यास तयार झाले नाहींत. ’ -V.S. २.१७८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP