Dictionaries | References

विधुळणी

   
Script: Devanagari

विधुळणी     

 स्त्री. धूळधाण ; विध्वंस ; नाश . विधुळणीस पडणें , विधुळणीस मिळणें , विधुळणीस होणें , विधुळणीस पाडणें , विधुळणीस मिळवणें , विधुळणीस मिळवून टाकणें - धूळधाण करणें ; विध्वंस करणें ; नाश करणें ; नायनाट करणें . [ सं . विधूलन ] विधुळणें - उक्रि . धुळीस मिळणें , मिळवणें ; उधळणें ; नाश करणें , होणें . आहाळी ते पूजा विधुळे । - ज्ञा १७ . ७ . तेथ गुंळीचा गाडा विधूळणें । - ऋ १२० . ब्रह्मज्ञान विधुळिते । - विउ . ७ . ७५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP