Dictionaries | References

वेल्हाळ

   
Script: Devanagari
See also:  वेल्हाळा , वेल्हाळी

वेल्हाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term of endearment for a husband or other beloved man. 2 f A wife, mistress, or other beloved woman. 3 In reproof. A gadabout, gossiping female. 4 as a Dear, darling, tenderly loved or delighted in;--as a person, countenance, feature, member &c.
Poetical embellishment or enlargement: also idle amplification or exaggeration. v लाव, मांड, कर. Also Enlargement, augmentation, or increase in general. Ex. दाऊ वेल्हाळ देसी नवी जैसी साहित्यातें चोजवी ॥ अमृतासी चुकी ठेवी गोडीसेपणें ॥.

वेल्हाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A wife or other beloved woman.
 m  (In poetry.) A husband or other beloved man and a wife, or a mistress a Dear.

वेल्हाळ     

 पु. नवरा किंवा इतर प्रियकर यासंबंधी लाडिकपणें म्हणतात . - स्त्री . १ बायको किंवा इतर प्रियपात्र यासंबंधी योजतात . वदत वेल्हाळ गौरवर्णी । - ह ९ . १८ . २ . ( निंदार्थी ) नगरभवानी ; विलासिनी . - वि . १ लाडका ; प्रिय . पंच वर्षाचा चिलया बाळ । बत्तीस लक्षणी वेल्हाळ । - शिली ( नवनीत पृ २३४ ). २ सुंदर . डोळस आंगें वेल्हाळ । - दाव ६४ . ३ नाजुक . कंठांतून पिक दिसे वेल्हाळ । - अफला ५४ [ देप्रा . वेल्लाहल ] वेल्हाळा , वेल्हाळी - स्त्री . १ पत्नी , रक्षा , प्रीतिप्रात्र इ० स लावतात . की वेल्हाळा विद्युलता । सेजें आलिया । - शिशु ७५१ . २ सुंदरी ; प्रिय स्त्री ; वेल्हाळ . देखोनि हांसिन्नला वनमाळी । भिऊं नको वो वेल्हाळी । - एरूस्व ८ . ५६ . - र १२ .
 पु. १ काव्यात्मक मंडण , विस्तार . २ अतिशयोक्ति ; तिखटमीठ . ( क्रि० लावणें ; मांडणें ; करणें ). ३ ( सामा . ) वाढ ; विस्तार . दाउ वेल्हाळ देसी नवी । जैसी साहित्यातें चोजवी । . - स्त्री . गप्पिष्ट स्त्री . - वि . फोफावलेलें ; विस्तारलेलें . जैसी अंकुरेसी सरळ । वेली दिसे वेल्हाळ । - अमृ ७ . ४३ . [ वल्ली ; प्रा . वेल्ला ]
०पणा  पु. विस्तार . देती वैराग्यशाखा कवळिया । वेल्हाळपणे । - ज्ञा १५ . १९० . वेल्हाळया , वेल्हाळी - वि . अतिशयोक्ति करणें , रंगवून सांगणें , यांची खोड असलेला - ली .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP