Dictionaries | References व व्याख्य Script: Devanagari Meaning Related Words व्याख्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. व्याख्या पहा . जेणे जीवेश्वराचें ऐक्य । तया पदत्रयाची व्याख्या । - विउ १ . ७ व्याख्या - स्त्री . १ विवेचन ; स्पष्टीकरण ; अर्थ . २ टीका ; भाष्य ; अर्थाची फोड , छाननी . ३ सविस्तर वर्णन ; लक्षणे , गुणधर्म , प्रयोजन इ० चे निरूपण . ४ ( गणित ) संज्ञार्थ ; निरुक्ति . ५ ( व्यापक ) गुप्त गोष्टीचा बोभाडा ; परिस्फोट ( दोष , गुह्य इ० चा ). ७ हेटाळणी ; औपरोधिक वर्णन ; टिंगल . [ सं . ] व्याख्या करणें - एक गोष्ट इतर सर्वाहून कोणत्या बाबतीत भिन्न आहे हे निश्चितपणे सांगणे .०गम्य वि. टीकेची , विवरणाची जरुरी असलेले . व्याख्यात - वि . १ व्याख्या झाली आहे असा ; फोड केलेला . २ बोललेला ; म्हटलेला . व्याख्याता - पु . १ व्याख्या करणारा ; टीकाकार . २ वक्ता ; व्याख्यान देणारा . व्याख्यान - न . १ ग्रंथ , वाक्य , श्लोक इ० ची फोड करणें ; अर्थविवेचन . २ ( सामा . ) विवरण ; प्रवचन . एवं प्रकारें करून । केले मंगळाशुभाचे व्याख्यान । - रास १ . २९८ . ३ जाहीरभाषण , विषयप्रतिपादन ; कीर्तन . ते व्याख्यानी निवाले सज्जन । - दावि २६८ ; तो कोणत्याहि विषयावर व्याख्यान सुरेख करीत असे . - नि ३२१ . ४ ( ल . ) सबबी ; आड मुद्दे ; अळंटळं . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP