Dictionaries | References

शासणें

   
Script: Devanagari

शासणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To punish, chastise, castigate.

शासणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   (Poetry.) Punish, chastise.

शासणें     

क्रि.  १ शासन , दंड , शिक्षा करणें . २ अधिकार चालविणें ; व्यवस्था पाहणें . [ सं . शासन ] शासक - वि . १ शासन करणारा ; दंड करणारा . २ राज्य चालविणारा , हांकणारा ; राज्यकर्ता . ३ व्यवस्था पहाणारा अधिकारी . [ सं . ] शासन - न . १ शिक्षा ; दंड ; सजा . २ राज्यकारभार ; सत्ता चालविणें . ३ हुकूम ; आज्ञा . आले शरण तुज ... ... शासनांत राहुनी । - मोगदा ८ . १७ . ४ आज्ञापत्र ; निर्णयपत्र . ५ राजाज्ञा ; सनद ; शासनपत्र . उदा० अशोकाचीं शिलाशासनें . ६ सत्ता ; अंमल ; कारकीर्द . [ सं . ]
०पत्र  न. अधिकारपत्र ; सनद ; हुकूम ( कागद , ताम्रपट , शिला वगैरेवर लिहिलेलें ). [ सं . ]
०पध्दति  स्त्री. राज्यव्यवस्था ; राज्यपध्दति ; राजनीति ; कायदेकानू . [ सं . ]
०शास्त्र  न. राजकीय व्यवहारांचा विचार करणारें शास्त्र ; राजनीतिशास्त्र . ( इं . ) पॉलिटिक्स . [ सं . ] शासनीय - वि . १ शिक्षा करण्याजोगें , योग्य ; दंडय ( प्रजा , सेवक , इ० ). २ अधिकार , सत्ता चालविण्याजोगें , लायक . [ सं . ] शासित - वि . १ सजा दिलेलें ; शिक्षा केलेलें . २ अधिकार , अंमल , सत्ता गाजविलेलें ; हुकमत , आज्ञा केलेलें ; आज्ञापित . [ सं . ] शास्ता - पु . १ दंड , शिक्षा करणारा ; शासक ; शासन करणारा ( न्यायाधीश , गुरु , इ० ). २ अधिकार , अंमल चालविणारा ; अधिपति ; राज्यकर्ता . [ सं . शास् ‍ ] शास्ति - स्त्री . ( महानु . ) शासन ; शिक्षा ; दंड . शास्त पहा . लागलिऐं तरी शास्ति कतीं । - शिशु १९४ . [ सं . ] शास्तृत्व - न . १ चुकीच्या मार्गावरून सरळ मार्गावर आणणें ; शिक्षा , सजा करणें . २ सत्ता ; अधिकार ; अंमल . [ सं . ] शास्य - वि . १ शासन करण्यास , शिक्षा करण्यास युक्त , योग्य , शक्य , जरूर ; सरळ मार्गावर आणण्यास योग्य , जोगतें , सारखें , जरूर . २ अधिकार , हुकमत , आज्ञा करण्याजोगें , युक्त , सारखें , जरूर , शक्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP