Dictionaries | References श शिकणें Script: Devanagari See also: शिंकणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शिकणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To learn: also to study. To sneeze. Rate this meaning Thank you! 👍 शिकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Learn; study. v i Sneeze. शिंकरणें v i Blow the nose. Rate this meaning Thank you! 👍 शिकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. १ विद्या - कला - शास्त्र यासंबंधीं धडे घेणें ; विद्या मिळविणें . २ अभ्यास करणें . [ सं . शिक्ष् . प्रा . पं . सिखाणा . सिं . सिखणु . हिं . सीखना . गु . शिखवुं . बं . शिखिवा . फ्रें . जि . सिक ] म्ह० शिकविलेली बुध्दि आणि बांधलेली शिदोरी फार वेळ पुरत नाहीं , शिकणाऊ - वि . १ शिकणारा ; शिकाऊ ; विद्यार्थी ; अभ्यासक ; नवशिक्या ; उमेदवार . लिहिणें पुष्कळ पडलें आहे , कोणी शिकणाऊ कारकून असेल तर लिहावयास आणून बसवा , म्हणजे दोघांचींहि कामें होतील . २ उपजत नव्हे परंतु अभ्यासानें संपादन केलेलें ; गुरूपासून शिकून साध्य केलेलें ( गाणें , बोलणें इ० ). शिकवण , शिकवणी - स्त्री . १ शिकविण्याची पध्दत ; रीत . २ वाईट अर्थानें सुचविणें ; फूस देणें ; प्रवृत्त करणें . ( क्रि० लावणें , देणें ). ३ उपदेश ; शिक्षण ; बोध देणें ; शिकविणें . ४ शिक्षणाचें वेतन . पुष्कळ वर्षे त्याचा चरितार्थ शिकवणीवर चालला होता । - नि . ६१४ . [ शिकविणें ] शिकवाशिकव - स्त्री . दोन्हीं पक्षांना चिथावणी देऊन त्यांच्यामधील कलह चेतविणें ; फूस देऊन भांडण वाढविणें . [ शिकविणें द्वि . ] शिकविणें - क्रि . १ शिक्षण देणें ; आध्यापिणें . २ उपदेश , बोध करणें ; पटविणें . ३ ( वाईट अर्थानें ) उत्तेजन देणें व मनांत भरविणें ; चेतविणें ; प्रवृत्त करणें . [ शिकणें ] शिकाऊ - वि . शिकणाऊ पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP