|
पु. १ नाण्यावरील छाप , चिन्ह , मुद्रा ; ठसा . बादशहाची चाल अशी आहे कीं ... शिक्क्यांत नांव भरावयाचें तें - वाडसनदा २३ . २ राजघराण्यांतील राजकर्त्याचा छाप ; राजमुद्रा ; सरकारी मुद्रा , मोहोर . ३ शिक्क्याचा ठसा , उठाव . ४ कापडावरील , फळावरील , शरीरावरील , खूण चिन्ह , डाग , छाप . ५ अंगावर ( देवी इ० ) टोंचलेल्याची खूण , व्रण . ६ नांवाचा , अक्षरांचा छाप ; सील . शिक्का , मोहोर - पु . ( व . ) बायकांच्या बोटांत घालण्याची आंगठी . [ फा . शिक्का ] पु. एखाद्या दस्तऐवजावर सही करणें व साक्ष घालणें . ( क्रि० करणें ; घालणें ; पडणें ; होणें ). सईसूद - वि . कायदेशीरपणा येण्यासाठीं ज्यावर सही , साक्ष इ० घातलीं गेलीं आहेत असा ( रोखा खत , दस्तऐवज ).
|