|
न. ब्रह्म ; चैतन्य . शुद्ध अहंकार अळुमाळ । उठतां शुध्दासि करी शबळ । - एभा १३ . ४३२ . - धावि . १ निर्मल ; पापरहित ; दोषरहित ; पवित्र ; स्वच्छ ; निष्पाप . २ शोधित ; संस्कारादिकानी पवित्र , निर्मल केलेला ; पावन केलेला . ३ निर्दोष ; बिनचूक ; चोख ; बरोबर ; अव्यंग . ( व्यक्ति , लेखन , भाषण , वर्तन , क्रिया वगैरे ). ४ एकाकी ; साधा ; विशेषणरहित . कांदा भक्षूं नये असा एक निषेध केला असला म्हणजे शुध्दाचा निषेध सर्व जातीवर जाईल . ५ केवळ ; फक्त ; नुसतां ; निवळ . त्याची फ्रान्सच्या रणांगणावर शुध्द लांडगेतोड चालली होती - अस्पृ २ . ६ शुक्ल ; पांढरे ; चांदण्याचा ( पक्ष ). ७ चांगला ; शुभ ; ( कुयोगादि ) दोषरहित ; पवित्र ( दिवस , तिथि ). ८ योग्य ; न्याय्य ; बरोबर ; संमत ; की नृपशुध्द युध्द हा करितो । - मोकर्ण १३ . १७ . याअर्थी अनेक समासांत हा शब्द येतो . उदा० आकारशुध्द , आचारशुध्द ९ अव्यंग ; निरोगी ; सुदृढ ; धडधाकट . १० साक्षात् ; मूर्तिमंत . सुमने तीच्या रतीच जी शुध्द । - कर्म २ . [ सं . शुध् = स्वच्छ करणे ] स्त्री. शुद्धि ; अपभ्रंश . शुद्धि पहा . ०अपूर्णांक पु. ( गणित ) साधा अपूर्णांक . ०बुद्ध स्त्री. शुद्धि व बुद्धि ; ज्ञान ; स्पष्ट जाणीव . - वि . १ ( ल . ) शुद्ध स्फटिक पहा . निरक्षर ; निर्बुद्ध ; ढ . २ खलास ; निकाल ; शून्यवत् . घृत नवनीत दधिदुग्ध । खाऊन केले शुद्धबुद्ध । - ह ६ . ११७ . ०कल्याण पु. एक राग . या रागांत ष् डज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , तीव्र मध्यम , पंचम , तीव्र धैवत व तीव्र ऋषभ निषाद हे स्वर लागतात . आरोहांत मध्यम , निषाद वर्ज्य , अवरोह संपूर्ण . जाति औडुव - संपूर्ण . गानसमय रात्रीचा पहिला प्रहर . याचे भेद - कामोदकल्याण , जयकल्याण , भूपाळी कल्याण , यमन कल्याण , श्याम कल्याण , सवानी कल्याण , हमीर कल्याण , हेमक कल्याण इ० ०जाति स्त्री. ( संगीत ) शुध्द स्वरांवरून तयार झालेली जाति . या सात आहेत - षाड्जी , आर्षभी , गांधारी , मध्यमा , पंचमी , धैवती व नैषादी . ०तान स्त्री. ( संगीत ) सप्तस्वरांच्या क्रमांत बदल न करतां घेतली जाणारी तान . ०प्रीति स्त्री. निर्व्याज प्रेम ; अहेतुक प्रेम . याहून भिन्न भय प्रीति . काम्यप्रीति इत्यादी . ०भोजन न. निरामिष , निर्मास भोजन . ०मति वि. सरळ मनाचा ; आंतबाहेर नसलेला ; निष्कपट . ०मल्लार पु. ( संगीत ) एक राग . या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत हे स्वर लागतात . जाति औडुव औडुव . वादी मध्यम , संवादी षड्ज , गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर . याचे प्रकार पुढें दिल्याप्रमाणें आहेत - गौडमल्लार , नटमल्लार , मीरामल्लार , रामदासीमल्लार , मियामल्ल्लार , मेघमल्लार , सूरदासीमल्लार , चर्ज्यूमल्लार , देसमल्लार , रूपमंजरीमल्लार वगैरे . ०मार्ग पु. सनातनधर्म ; परंपरागत धर्म ; परंपरागत मार्ग ; पवित्र , सत्य , ऋजु मार्ग . विरक्तें शुध्द मार्ग सांगावा । - दा २ . ९ . ३७ . ०मुखी वि. पांढर्या कपाळाचा ; गंध न लावलेला . ०राग पु. ( संगीत ) जो राग आपल्या नियमबध्द स्वरांनी रंजक होतो तो . ०लेखन न. व्याकरण नियमांनुसार जे लिहिलेले असतें , लिहावयाचे असतें ते . ०वृत्ति स्त्री. १ योग्य , अधिकारानुरूप व्यवसाय , धंदा , ब्राह्मणाचाधंदा - भिक्षाटन . २ निष्कपट , निष्पाप , सरळ स्वभाव , वर्तन . - वि . निष्कपट ; सरळ ; निष्पाप . ०शब्दयोगी न. ( व्या . ) ज्या शब्दयोगी अव्यवयांस शब्दांस जोडल्याशिवाय स्वतःचा अर्थ नसतो व जी जोडताना शब्दांचे सामान्यरूप होत नाही ती . उदा० च , हि . अव्यय न. ( व्या . ) ज्या शब्दयोगी अव्यवयांस शब्दांस जोडल्याशिवाय स्वतःचा अर्थ नसतो व जी जोडताना शब्दांचे सामान्यरूप होत नाही ती . उदा० च , हि . ०शैव पु. गुरव . - केसरी १।९।३६ . ब्राह्मण पु. गुरव . - केसरी १।९।३६ . ०सत्व पु. रजोगुण अथवा तमोगुण यांच्या प्रभावानें मिश्र न झालेला सत्त्वगुण . आपले आतीचे अंजन । शुध्द सत्त्वाचे पत्र जाण । - एरुस्व ३ . १ . ०समाचार पु. १ कुशलवृत्त ; सुवार्ता ; खुशालीची बातमी . २ शुद्धि ; भान ; मन ठिकाणावर असणें ०सामंत पु. ( संगीत ) एक राग . या रागांत षड्ज , कोमलऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत हे स्वर लागतात . आरोहांत गांधार , निषाद वर्ज्य , अवरोहांत निषाद वर्ज्य . जाति औडवषाडव . वादी षड्ज , संवादी मध्यम . गानसमय दिवसाचा पहिला प्रहर . ०सारंग पु. ( संगीत ) एक राग . यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल मध्यम , तीव्र मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति षाडव षाडव . वादी ऋषभ , संवादी पंचम . गानसमय माध्यान्ह . या रागाचे प्रकारः - बडहंस , मियारंग , लंकादहन , बिंद्राबनी , मधुमाद , सावंतसारंग इत्यादि ०स्फटिक पु. १ ( शब्दशः ) निवळ , स्वच्छ , पांढरा स्फटिक . २ ( ल . ) निरक्षर , निष्कांचन , अक्षरशत्रु , ढ , कफल्लक इसमास म्हणतात ; तसेच वस्त्रहीन , अर्थहीन , सर्वस्वी नागवलेला अशा गृहस्थाहि म्हणतात . ०स्वर पु. ( संगीत ) जुन्या मताप्रमाणे बावीस श्रुतीपैकी ४ , ७ , ९ , १३ , १७ , २० , २२ , या श्रुतीस ठेवलेली नांवे . नव्या मताप्रमाणे १ , ५ , ८ , १० , १४ , १८ , २१ या श्रुतीची नांवे . दोन्ही पद्धतींत सा , रे , ग , म , प , ध , नि हीच नांवे आहेत . ०स्वरूप न. ब्रह्म . ०ज्ञान न. ब्रह्मज्ञान ; अपरोक्षज्ञान . शुद्धद्वैती - पु . एक संप्रदाय . मायाविरहीत म्हणजे शुद्ध जीव व परब्रह्म ही एकच आहेत अस्र मत . - गीर १७ .
|