Dictionaries | References

संसर

   
Script: Devanagari

संसर     

 पु. १ संचार ; गमन ; येजा ; वापर . २ पसारा ; संगति . ३ चूक ; च्युति ; प्रमाद . तैसे दुर्भेद्य जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय तेथ संसरेवीण जाय । बुध्दि तयाची । - ज्ञा ६ . ४५९ . [ सं . सम् ‍ + सृ ] संसरण - न . १ गमन ; जाणें ; पुढें सरणें ; संचार . २ जन्म , स्थिति , लय वगैरे ; जगांतील अस्तित्व ; आयुष्यांतील व्यापार . ३ आत्म्याचें आगमन बहिर्गमन ; जीवाचा फेरा ; जन्ममरणाचा फेरा . तरी जिवाचें संसरण । कां न चुकिजे । संसरणें - अक्रि . १ जगणें व मरणें ; जन्म , स्थिति , लय यांतून जाणें ; संसारचक्रांतून जाणें ; भ्रमणें . २ सांवरणें ; आटोपणें . म्हणोनि असो हें यापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी । तेणें संसरले निकरी । आपु विश्व । - ज्ञा ७ . १३५ . ३ सरसावणें ; उद्युक्त होणें ; प्रवृत्त होणें . वागोरे सांवरावया गोविंदा । संसरलिया । - ज्ञा ११ . २९६ . [ सं . सम् ‍ + सृ = सरणें ] संसरा , संसारा - पु . १ स्थिति ; उद्भव ; प्रादुर्भाव . मोक्षाचा संसारा । उणा नोहे । - ज्ञा १४ . २८४ . श्रीरामा आणि दिनकरा । वेगळिकेचा संसरा । क्षीरसागरा आणि क्षीरा । जेणे रीती । - स्वादि १ . २ . ९० . २ पसारा ; विस्तार . कैसा वासनेचा संसरा । देहा हों नेदी उजगरा । - ज्ञा ५ . ५४ . नामरूपाचा संसारा । होय जयातें । - ज्ञा १५ . ७६ . ३ लाभ ; संगति ; जोड . कां स्नेहा , सूत्रा , वैश्वानरा । जालियाहि संसारा । - ज्ञा १७ . ३५१ . बोधाचा हा संसारा । जाला जो आमुतें । - ज्ञा १८ . १७५८ . संसरिसु - क्रिवि . एकदम ; तात्काळ . कीं अग्नी घातला पोतासु । ऐसें नव्हे संसरिसु । वेंच झाला । - अमृ ७ . १७७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP