Dictionaries | References

सरणें

   
Script: Devanagari

सरणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

सरणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   Move on; slide. Be consumed.

सरणें

 अ.क्रि.  १ हलणें ; चळणें ; पुढें मागें होणें ; बाजूला होणें ; चालणें ; जाणें ; दूर होणें ; निघणें ; माघार घेणें ; हटणें ; जागा सोडून देणें . तंव भीमकी वदे आवेशीं । सर तूं हीं एकी धापसी । - शिशु २२१ . ग्रासुं सरली उदधि जळें । - उषा ९७३७ . म्ह० सर घोडया पाणी खोल . २ सरकणें ; घसरणें ; निसरणें ; चळणें . वाट सरणें . पाय सरणें . ३ संपणें ; खलास होणें ; खर्च होणें ; कमी होणें ; नाहीसें होणें . कृपाचि सरली असेंहि न घडे जगन्नायकीं । - केका ४ . हारपलें दावूनि जैसा । मागु सरे वीरविलासा । - ज्ञा १५ . ५८६ . ४ चालणें ; पुरें पडणें ; प्रगति होणें ; चालू राहणें . तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । - ज्ञा ९ . ३८० . पैक्यावांचून कोणाचें सरत नाहीं . शेजीवांचून सरेना आणि घडीभर पडेना . ५ शोभणें ; योग्य दिसणें ; साजेलसें असणें . कीं एकुहि न सरे तया माजीं । - भाए ६३० . हे कुडे न सरती बोल । साचाच्या गांवीं । - अमृ ६ . २१ . ६ सरसावणें ; उद्युक्त होणें . न म्हणों सरली सीता । - विउ ७ . ६६ . ७ कार्यभाग होणें , चालणें , पटणें , मान्य होणें . सांगें वातवर्ष आततु थरे । ऐसें अभ्रच्छायाचि जरीसरे । तरी त्रिमाळिकें धवळारे । करावीं कां । - ज्ञा ५ . ११४ . [ सं . सृ - सरणें ] ठाव सरणें - मरणें ; आटोपणें . ऐशा दोघांचा सरला ठावो - उषा १६०३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP