Dictionaries | References

सिध्द

   
Script: Devanagari

सिध्द     

 पु. १ ईश्वरप्रेरित ग्रंथकार , लेखक . उदा० व्यास . २ भूत - भविष्य - वर्तमानांचें ज्ञान असलेला ; द्रष्टा ; साधु . ३ अणिमादि सिध्दी प्राप्त झालेला ; योगी . ४ मुक्त पुरुष . - दा ५ . १० . १० . ५ एक उपदेवांचा वर्ग व त्यांतील व्यक्ति . येर सुरसिध्द किन्नर । - ज्ञा ११ . ५० . ६ . ६ ( ज्यो . ) एकविसावा योग . [ सं . ] - वि . १ संपविलेलें ; पुरें केलेलें . २ स्थापित केलेलें ; सत्य म्हणून दाखवून दिलेलें ; पुराव्यानें खरें केलेलें ; प्रस्थापित . ३ निकाल केलेलें ; तोडलेलें ( भांडण , खटला ) ४ बनविलेला ; तयार केलेला ; रचलेला ( नियम , घटना , कायदा ). ५ पकविलेलें ; शिजविलेलें . ( अन्न ). जैसी सिध्दसाध्य भोजनीं । तृप्ती एकी । - ज्ञा ३ . ३८ . ६ घेण्याजोगें ; तयार केलेलें ( घोटून , द्रव्यें मिसळून - औषध ). ७ तयार ठेवलेला , असलेला ( कामास योजावयाचा माणूस , जनावर इ० ); मुद्दाम खोळंबलेला , वाट पहात असलेला ; राखून ठेवलेला ; सज्ज ; तयार . ८ कुशल ; निष्णात . ९ शाबूत ; धडधाकट जंव हें सकळ सिध्द आहे । हात चालावया पाय । - तुगा ७२९ . १० प्रत्यक्ष ; मूर्तिमंत जरी प्रकटे सिध्द सरस्वती । तरी मुका आथी भारती । - ज्ञा १ . ७८ . ११ अकृत्रिम ; सहज असणारा . नित्यसिध्द परमशुध्द माझें स्वरुप शुध्द जाणती । - एभा ११ . ११२७ . १२ पूर्णावस्था प्राप्त झालेले . वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि कां सिध्दवत । - ज्ञा ३ . ४५ . १३ ( व्या . ) गुणधर्मयुक्त ; मूर्त . याच्या उलट साधित = अमूर्त . १४ ( भाषा . ) मूळ ; अव्युत्पन्न ( शब्द ). याच्या उलट साधित शब्द . ( समासांत ) ( सिध्द शब्द उत्तरपदीं असतांना )- अनुभव - उपाधि - ओषधी - क्रिया - न्याय - लोक - व्याकरण - स्वभाव - सिध्द . ऊन प्रत्ययांत धातुसाधितांपुढें नेहेमीं हा शब्द येतो . उदा० करून - भोगुन - शिकून सिध्द . ( वाप्र . ) सर्वसिध्द आणि चुलीस पोतेरें - तयारी होण्याच्या फार आधीं तयारी झाल्याचें सांगणाराबद्दल वापरतात .
०तत्त्व  न. ब्रह्म .
०ता  स्त्री. तयारी ; सर्व सिध्द असणें .
०पादुका   स्त्रीअव . ज्या पायांत घातल्यानें वाटेल तिकडे जाण्याची शक्ति प्राप्त होते अशा पादुका . करवीर क्षेत्रीं दत्तात्रयें सिध्दपादुका । - सप्र ३ . २० .
०पुरुष  पु. १ अणिमादि सिध्दी प्राप्त झालेला ; योगी ; मांत्रिक . २ ब्रह्मस्वरूपीं विलीन झालेला .
०प्रज्ञा  स्त्री. पूर्वजन्मांतली या जन्मीं मिळणारी बुध्दि . तिये सिध्दप्रज्ञेचेनि लाभे । मनचि सारस्वतातें दुभे । - ज्ञा ६ . ४५४ .
०मौळी वि.  श्रेष्ठ सिध्द पुरुष . जयजयाजी सिध्दमौळी । - गुच २० . २ . [ सिध्द + मौलि ]
०योग  पु. बाळहिरडे आणि जिरें यांचें चूर्ण . हें अतिसारांत तांदुळाच्या धुवणांतून घेतात . - योर १ . ४१५ .
०रस  पु. १ अमृत . कुंकुमाचें भरींव । सिध्दरसाचें वोतींव । - ज्ञा ६ . २५५ . २ पारा .
०लाडू  पु. संकष्टी चतुर्थीस कणकेच्या उकडीचे केलेले लाडू ; मुटकुळीं . - ह ८ . १६ .
०वट  पु. कामना पूर्ण करणारा वड . त्या सिध्दवटा सावित्री संपूर्ण । सीता देखून नवस करी ।
०वत्   क्रिवि . सिध्द झाल्याप्रमाणें ; गृहीत धरून . एका विषयाचा वाद पडल्यास इतर विषय सिध्दवत् ‍ घ्यावे लागतात . - वि . ( शाप . ) गृहीत ; खरें मानून चाललेलें . सिध्दवत् ‍ पदें . ( इं . ) पॉस्चुलेट्‍स . [ सं . ]
‍   क्रिवि . सिध्द झाल्याप्रमाणें ; गृहीत धरून . एका विषयाचा वाद पडल्यास इतर विषय सिध्दवत् ‍ घ्यावे लागतात . - वि . ( शाप . ) गृहीत ; खरें मानून चाललेलें . सिध्दवत् ‍ पदें . ( इं . ) पॉस्चुलेट्‍स . [ सं . ]
०साधक  पु. अव . एकाच कपटकारस्थानांतील मंडळी . आपलें ऐक्य बाहेर समजूं न देतां , संगनमतानें दुसर्‍याला फसविण्यासाठी एकमेकांचा पुरस्कार करणारे ( एकानें सिध्द पुरुष बनावयाचें व दुसर्‍यानें त्याचें स्तोम माजवावयाचें ) [ सिध्द + साधक ]
०साधन  न. १ सिध्दीचे अद्‍भुत चमत्कार दाखविणें ; जादू ; किमया . २ सिध असलेली वस्तु पुन्हां सिध्द करण्यास लागणें . तर्कशास्त्रांत हा एक दोष मानला जातो . तूं चोर आहेस असें चोरालाच म्हटलें असतां सिध्दसाधन दोष होतो .
०स्थाली  स्त्री. पाहिजे तें अन्न पाहिजे तेव्हां विपुल निघावें अशी ( कोणी सिध्द पुरुषानें दिलेली ) थाळी , पात्र . सिध्दणें - क्रि . १ सिध्द करणें . तुलदाइयां बैलां सिध्दंवै । - पाटणशिलालेख शके ११२८ . २ सिध्दीस जाणें मोक्षमूल कृपाजीवन । जेणें सिध्दे । - ज्ञाप्र ६१ . सिध्दाई - स्त्री . १ चमत्कार ; सिध्दसाधन . २ दैवी शक्ति प्राप्त होणें . सिध्दि पहा . सिध्दानुवाद - पु . सिध्द गोष्टीचें वर्णन तरी सिध्दानुवाद लाहों । आवडी करुं । - अमृ १० . १२ . [ सिध्द + अनुवाद ] सिध्दान्न - न . शिजणें , इ० संस्कारानें सिध्द झालेलें अन्न ; तयार , खाण्यालायक अन्न [ सिध्द + अन्न ] सिध्दार्थ - वि . १ ज्याचा उद्देश , मनोरथ सिध्दीस गेला आहे असा . २ गौतमबुध्द [ सिध्द + अर्थ ] सिध्दार्थी - पु . त्रेपन्नावा संवत्सर . सिध्दावस्था - स्त्री . जीवन्मुक्तावस्था ; ब्राह्मीस्थिति . - गीर ३६७ . [ सिध्द + अवस्था ] सिध्दाश्रम - पु . १ सिध्दावस्थेस पोंचलेल्या मुनीचा आश्रम . जावें सिध्दाश्रमातें । - रावि ७ . १० . २ हिमालयांतील नरनारायणाश्रम . सिध्दाश्रमासि पावे विश्व जया सिध्द सादना गाते । - मो उद्योग ८ . २७ . [ सिध्द + आश्रम ] सिध्दासन - न . योगासनाचा एक प्रकार . कामवासना नाहींशी करण्याला याचा उपयोग होतो . - संयोग ३२३ . [ सिध्द + आसन ] सिध्दि - स्त्री . १ दैवी शक्ति ; अणिमा इ० अष्टमहासिध्दी . देखें विषय हे तैसे । पावती सिध्दि चेनि मिषें । - ज्ञा २ . ३१३ . २ आश्चर्यकारक , अपूर्व सामर्थ्य , कौशल्य ३ तपश्चर्येचें किंवा देवता भक्तीचें फल . ४ परिपूर्णता ; समाप्ति ; संपादन ; उद्दिष्ट साध्य होणें . तें मनोरथ संगें नव्हे । एर्‍हवीं सिध्दि गेलेंचि आहे । - ज्ञा १३ . १३३ . ५ पुराव्यानें स्थापना , संस्थिति ; प्रस्थापित होणें ( मुद्दा , बाजू , आरोप इ० ). शाबिती . अंतःकरणही अनादि । प्रवाहरूपें त्याची सिध्दी । - एभा १३ . २४५ . ६ निर्णय ; निकाल ; तडजोड ( भांडण , खटलें इ० ची ). ७ घटना ; बनावणी ; मांडणी ( कायदा , नियम , इ० ची ). ८ सिध्दता ; तयारी ; ( अन्न , औषध इ० ची ) ९ सज्ज असणें ( बदली किंवा इतर काम करण्यास माणूस , जनावर इ० ). १० कौशल्य ; नैपुण्य ; वाकबकारी ( योगसामर्थ्य , किमया इ० त ). ११ मुक्ति ; ब्रह्मस्थिति ; निर्वाण . तैसें न होणें निपजे । तें नैष्कर्म्य सिध्द जाणिजे । सर्व सिध्दींत सहजें । परम हेंचि । - ज्ञा १८ . ९८० . १२ यश ; विजय , उत्कर्ष . १३ सामग्री ; साहित्य . घरीं त्याच्या आहे सर्व सिध्दी । - रामदासी २ . ११८ . १२ . [ सं . ] सिध्दीस आणणें , सिध्दीस नेणेंस - पुरें करणें ; तडीस नेणें ; यशस्वी रीतीनें पुरेम होणें , तडीस जाणें .
०स्थान  न. मूळ ठिकाण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP