Dictionaries | References

स्नुषातकन्याय

   
Script: Devanagari

स्नुषातकन्याय     

एक स्त्री एका बाईच्या घरीं ताक मागावयास गेली असतां घरांत सून होती व सासु बाहेर गेली होती. सुनेनें ताक नाहीं म्हणून सांगितलें. तेव्हां ती स्त्री परत येत असतां वाटेंत सासू भेटली. तिनें विचारल्यावरुन झालेली गोष्ट तिला सांगितल्यावर ती म्हणाली सून कोण नाहीं म्हणून सांगणार ? चला आमच्या घरीं. त्याप्रमाणें ती स्त्री घरीं आल्यावर सासूनें पाहिलें तो घरांत ताक नव्हतें. तेव्हां तिनें पुन्हां नाहीं म्हणूनच सांगितलें आणि वर म्हणते कीं, नसलें म्हणून काय झालें, सून कोण सांगणार नाहीं म्हणून ! घराची मालकीण मी आहें. मी नाहीं म्हणून सांगेन पाहिजे तर, पण सुनेस काय अधिकार ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP