Dictionaries | References

हिलगड

   
Script: Devanagari

हिलगड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v घाल, ठेव, & पड, हो. Ex. तुमचे आमचे देण्याघेण्याची हि0 ठेवूं नका. 2 Obstructed state more generally, hitching: also an obstruction or a hinderance, a hitch.

हिलगड     

 स्त्री. १ ( देणेंघेणें इ० व्यवहारांतील ) भानगड ; लचांड . ( क्रि० घालणें ; ठेवणें ; पडणें ; होणें ). तुमचे आमचे देण्याघेण्याची हिलगड ठेवू नका . २ अडथळा ; गुंताडा ; गुंतागुंत . [ हिलगणें - लोंबणें ] हिलगडणें - उक्रि . लोंबकळत ठेवणें , भिजत घोंगडे ठेवणें ; शेवटपर्यत पुरे न करणें ( काम , फिर्याद इ० ); एकादे काम सिद्धीस न जाऊं देता अडथळून पाडणें . आमच्या लग्नाचें काम त्यानें हिलगडले . - अक्रि . निकाल न लावतां अनिश्चितपणें लोंबत रहाणें . हिलगडा , हिलगण , हिलंगवण - पुस्त्री . हिलगड . हिलगणें , हिलगावणें , हिलगाविणें - उक्रि . हिलगडणें ; ढिलें बांधणें ; लोंबत ठेवणें ; सरासरी जुडणें ; टांचणें ( कागदाच्या गडडया इ० ) अडकविणे - उक्रि . १ लोंबकळत पडणें ; लोंबत राहणें . २ गुंतणे ; अडकणे . ३ एखादया कामांता गुरफुटून जाणें . मी दिवसभर हिलगलो . [ हिं हिलगामा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP