दश आयुधें (अ) (
[देवीचीं])
- १ खड्ग,
- २ बाण,
- ३ गदा,
- ४ शूल,
- ५ शंख,
- ६ चक्र,
- ७ भुशुंडी,
- ८ परिघ,
- ९ कार्मुक आणि
- १० रुधिरपात्र. ([सप्तशती १-१]);
(आ) (शंकराचीं)
- १ खड्ग
- २ त्रिशूल,
- ३ परशु,
- ४ शंख,
- ५ डमरू,
- ६ नागपाश,
- ७ अक्षमाला,
- ८ धनुप्य, (पिनाक),
- ९ शर आणि
- १० पाशुपत
(
[क. क.])
दशेंद्रियें व त्यांच्या देवता (पंच कर्मेंद्रियें) - १ हात - इंद्र, २ पाय - त्रिविक्रम, ३ वाणी - अग्नि, ४ उपस्थ - प्रज्ञापति व ५ गुद - यम (मृत्यु)
(पंच ज्ञानेद्रियें) - १ कान - दिशा, २ त्वचा - वायु, ३ डोळे - सूर्य, ४ जिव्हा - वरूण, आणि ५ नाक - अश्चिनीकुमार (सर्ववेदान्तसिद्धान्तसार - संग्रह)
दश कला अग्नीच्या १ धूम्रा, २ नीलवर्णा, ३ कपिला, ४ विस्फुलिङिगनी, ५ ज्वाला, ६ हैमवती, ७ कव्यवाहिनी ८ हव्यवाहिनी, ९ रौद्री व १० संकर्षिणी.
अशा वैश्वानराच्या दहा कला आहेत.
"रौद्री संकर्षिणी चैव वैश्वानरकला दश"(
[ज्ञानार्णवतंत्रम्])
दश कामदशा १ अभिलाषा, २ चिंता, ३ स्मृति, ४ गुणकीर्तन, ५ दद्वेश, ६ प्रलाप, ७ उन्माद, ८ व्याधि, ९ जडता व १० मरण,
अभिलाषोऽथ चिंता स्यात्स्मृतिश्च गुणकीर्तनम् ।
उद्वेगोऽथ प्रलापः स्यादुन्मादो व्याधिरेव च ॥
जडता मरणं चैव दशमं जायते धरुवम् (श्रृंगार तिलक)
दशग्रंथ (अ) - १ संहिता, २ पद, ३ क्रम, ४ ब्राह्मण, ५ व्याकरण, ६ शिक्षा, ७ कल्प, ८ ज्योतिष, ९ छंद व १० निरुक्त ;
(आ) १ संहिता, २ ब्राह्मण, ३ आरण्यक, ४ शिक्षा, ५ कल्प, ६ व्याकरण, ७ निघंटु, ८ निरुक्त, ९ छंद व १० ज्योतिष.
या वेद व त्यांचीं उपांगें असलेल्या दहा ग्रंथांस दशग्रंथ म्हणतात.
छन्दस्तु नवमः प्रोक्तो ज्योतिषो दशमः स्मृतः।
प्रोक्ता एते दशग्रंथाःअ व्याडिनैव महर्षिणा ॥ (
[सु.])
दशदशा (जीवाच्या) १ गर्मवास, २ जन्म, ३ बाल्य, ४ कौमार, ५ पौगण्ड, ६ यौवन, ७ स्थावीर्य, ८ जरा, ९ प्राणरोध आणि १० नाश.
दशदिशा व त्यांच्या देवता १ पूर्व - इंद्र, २ पश्चिम - वरुण, ३ उत्तर - कुवेर, ४ दक्षिण - यम, ५ ईशान्य - ईश, ६ नैऋत्य - निऋति, ७ वायव्य - वायु, ८ आग्नेय - अग्नि, ९ ऊर्ध्व - ब्रह्मा व १० अधोदिशा - शेषनाग.
दशदानें १ गाय, २ भूमि, ३ तीळ, ४ सुवर्ण, ५ तूप, ६ वस्त्र, ७ धान्य, ८ गूल, ९ लवण व १० गृह. हीं दशदानें होत.
दशांगें (वृक्षांचीं) १ मूळ, २ साल, ३ पान, ४ फूल, ५ फळ, ६ बोखी, ७ चीक, ८ नार, ९ कांटे व १० देठ पानांचा किंवा फुलांचा.
दशांगघूप (अ) १ कोष्ठ, २ गूल, ३ लाख, ४ हरीतकी, ५ राळ, ६ जटामांसी, ७ शिलारस, ८ साखर, ९ मोथ व १० गुग्गुळ ;
(आ) १ नखला, २ वाळा, ३ चंदन, ४ ऊद, ५ विशेष, ६ आगरु, ७ तूप, ८ कापूर, ९ मध आणि १० गुलाबाचीं फुलें, या दहा सुगंधी द्र्व्यांच्या मिश्रणानें तयार होणारा धूप. (
[दुर्बोध श. को.]);
(इ) १ कृष्णागरु, २ चंदन, ३ गुग्गुळ, ४ श्वेतागरु, ५ लाख, ६ बेलफळ, ७ तूप, ८ मध, ९ सर्जरस आणि १० कापूर, हीं दहा धूपाचीं साधनें होत.
' साधनानि दशांगानि धूपश्च चतुरानन। (वी. प्र.)
दश नाडया (अ) १ इडा, २ पिंगला, ३ सुषुम्ना, ४ गांधारी, ५ हस्तिजिह्ला, ६ पूषा, ७ यशस्विनी, ८ अलम्बुषा, ९ कुहू व १० शंखिनी.
(आ) १ इडा, २ पिंगला, ३ सुषुम्ना, ४ गांधारी, ५ जीवनी, ६ दशतुंडी, ७ दीक्षा, ८ बाणदशा, ९ शंखिनी व १० सौक्षिणी (
[म. वा. को.])
मानव शरिरांत एकंदर बहात्तर सह्स्त्र नाडया असून त्यांत प्राणवहा अशा प्रधान बहात्तर नाडया आहेत, त्यांत या दशनाडया मुख्य होत.
'चक्रवत्संस्थिता होताः प्रधाना दश नाडयः' (
[अग्नि. २१४-३])
दश नामें पुल्लिंगी प्रतीकात्मक (संस्कृत)-
रामो हरिःकरी भूभृत्। भानुःकर्ता च चंच्रमाः।
तस्थिवान् भगवान् आत्मा। दशैते पुंसि नायकाः ॥
स्त्रीलिंगी प्रतीकात्मक (संस्कृत)-
रमा रुचिर्नदी धेनुर्वाग्धीः सरित् अनन्तरम्।
क्षुत् प्रावृट् च शरद चैव दशैताः स्त्रीषु नायकाः ॥
नपुंसकलिंगी प्रतीकात्मक (संस्कृत)-
ज्ञानं दधिः पयो वर्म धनुर्वारि जगत् तथा।
मधु नाम मनोहारि दशैतानि नपूंसके ॥
दशनाम संन्यासी १ गिरी, २ पुरी, ३ पर्वत, ४ सागर, ५ बन, ६ तीर्थ, ७ भारती, ८ सरस्वती, ९ अरण्य आणि १० आश्रम. (
[दर्शनप्रकाश])
दश पारमिता (बुद्धीची परिपूर्णता) १ दान, २ शील, ३ नैष्कर्म्य, ४ प्रज्ञा, ५ वीर्य, ६ क्षांति, ७ सत्य, ८ अधिष्ठान, ९ मैत्री व १० उपेक्षा.
या दहा पारमिता म्हणजे गुणांची पूर्णता किंवा पराकाष्ठा बुद्ध धर्मांत मानिल्या आहेत. (बुद्धधर्म)
दशधर्म १ क्षमा, २ मार्दव, ३ आर्जव, ४ सत्य, ५ शौच, ६ संयम, ७ तप, ८ त्याग, ९ आकिंचन्य व १० ब्रह्मचर्य. ही दहा धर्माचीं अंगें होत. (जैन धर्म)
दशभक्ति १ सिद्धभक्ति, २ श्रुतभक्ति, ३ चारित्र्यभक्ति, ४ योगी भक्ति, ५ आचार्य, ६ निर्वाण, ७ पंचपरमेष्ठी, ८ तीर्थंकरभक्ति. ९ नंदीश्वरभक्ति, १० शांतिभक्ति,
असे दहा प्रकार जैन धर्मांत मानले आहेत. (दशभक्ति)
दश महादनें १ सुवर्ण, २ अश्व, ३ तीळ, ४ हत्ती, ५ दासी, ६ रथ, ७ भूमि, ८ घर, ९ कन्या आणि १० कपिला धेनू.
या दहा वस्तूंपैकीं कोणत्याहि वस्तूचें दान तें महादान म्हणून मानलें जातें.
कनकाश्चतिला नागदासीरथमहीगृहाः।
कन्या च कपिला धेनुर्महादानानि वै दश ॥ (
[अग्नि २०९-२४])
दश महाविद्या १ काली, २ तारा, ३ षोडशी, ४ भुवनेश्चरी, ५ मैरवी, ६ छिन्नमस्ता, ७ धूमवती, ८ बगला, ९ मातंगी आणि १० कमला.
या दहा महाविद्या म्हणून शक्ति उपासनेंत सांगितल्या आहेत. (
[कल्याण शक्ति अंक])
दश मुळें (अ) १ शालिपणीं (रानगांजा), २ पुष्टिपणीं, ३ रिंगणी, ४ डोरली, ५ गोखरू, ६ बिल्व, ७ ऐरण (टाहाकळा), ८ टेंटू, ९ पहाडमूळ व १० शिवणमूळ ;
(आ) १ बेल, २ टाकळा, ३ टेटू, ४ शिवण, ५ पाडळ, ६ सालवण, ७ गोखरू, ८ पिठवण, ९ डोरली व १० रिंगण.
या दहा वनस्पतींचीं मुळें यांचा आर्य वैद्यकांत उपयोग करतात.
दशामृत १ दहीं, २ दूध, ३ मध, ४ तूप, ५ साखर, ६ सुंठ, ७ जिरे, ८ सेंदेलोण, ९ वेलदोडे व १० मिरे.
या पदार्थांच्या मिश्रणास दशामृत म्हणतात. अशी दशामृत पूजा वीरशैवांस विहित आहे. (सि. पु.)
दशमान पद्धति एक परिमाण पद्धति. हींत परिमाणें दसपटीनें चढत किंवा उतरत जातात. हीं आतां भारतांत नव्यानें रूढ करण्यांत आली आहेत.
प्राचीन काळीं देखील एकम् दहम , शतम् अशी दसपटीनें संक्या मापली जात असे.
दश रूपकें (द्दश्य काव्य प्रकार) १ नाटक, २ प्रकरण, ३ भाण, ४ व्यायोग, ५ समवकार, ६ डिम, ७ ईहामृग, ८ अंक, ९ वीथि आणि १० प्रहसन, असे नाटयाचे संस्कृत वाङ्मयांतले दहा प्रकार. (
[भ. ना. १८-२-३])
दश लक्षणें खर्या ज्ञानाचीं १ अक्रोध, २ वैराग्य, ३ ईद्रियनिग्रह, ४ क्षमा, ५ दया, ६ शांति, ७ लोकप्रेम, ८ औदार्य, ९ एखाद्याचें भय निवारण व १० दुःख परिहार करणें.
अक्रोध - वैराग्य - जितेंद्रियत्वं। क्षमा - दया - शांति - जनप्रियत्वं।
निलोंभदाने भयशोकहानिः। ज्ञानस्य चिह्लं दश लक्षणानि च ॥ (
[योग तत्त्वमृत])
दशलक्षणें भागवत पुराणाचीं १ सर्ग - संसार, २ विसर्ग - संहार, ३ स्थान - वैकुंठ, ४ पोषण - भगवद्भजन, ५ ऊति - कर्मानुसार होणारी वासना, ६ मन्वन्तरें - चौदा मनूंची व्यवस्थिति, ७ ईशानुकथन - दशावतारचरित, ८ निरोध - एकाग्रता, ९ मुक्ति - ज्ञानयोग, १० आश्रय - सर्व प्रकाशक परमात्मा.
सर्व पुराणें पंचलक्षणात्मक ; पण भागवत पुराण दशलक्षणात्मक आहे. दशलक्षणांनी तें महापुराण व पांच लक्षणांनीं युक्त तें उपपुराण - अशी सर्वसाधारणपणें व्यवस्था आहे. (
[भाग. १२-७])
सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण। ऊति मन्वन्तरें ईशानुकथन।
निरोध मुक्ति आश्रयपूर्ण। एवं द्श लक्षण भागवत ॥ (
[चतुःश्लोकी भागवत])
दशवायु १ प्राण, २ अपान, ३ व्यान, ४ उदान, ५ समान, हे पिंडीचे व ६ नाग, ७ कूर्म, ८ कृकळ, ९ देवदत्त आणि १० धनंजय. हे ब्रह्मांडीचे. (
[दासबोध])
दशविघ्नें (योगाला) १ आळस, २ व्याधिपीडा, ३ प्रमाद, ४ संशय, ५ अनवस्थितचित्त, ६ अश्रद्धा, ७ भ्रान्तिदर्शन, ८ दुःख, ९ दौर्मनस्य (इच्छा सफाल न झाल्यामुळें मन क्षुब्ध होणें) आणि १० अयोग्य विषयासंबंधानें लोलुपता. (
[लिंग. ९-४])
दशोपनिषदें १ ईश, २ केन, ३ कठ, ४ प्रश्न, ५ मुण्ड, ६ माण्डुक्य, ७ तैत्तिरीय, ८ ऐतरेय, ९ छांदोग्य आणि १० बृहादारण्यक.
दशावतार व त्यांच्या जयंत्या १ मस्त्य - चैत्र शु. ३ प्राह्लीं,
२ कूर्म - वैशाख शु, १५ सायंकाळीं,
३ वराह - भाद्रपद शु. ३ प्राह्लीं,
४ नृसिंह - वैशाख शु. १४ सायंकाळीं,
५ वामन - भाद्रपद शु. १२ मघ्याह्लीं,
६ परशुराम - वैशाख शु. ३ सायंकाळीं,
७ राम - चैत्र शु. ९ मघ्याह्लीं,
८ कृष्ण - श्रावण व. ८ मघ्यरात्रीं,
९ बौद्ध - आश्चिन शु. १० सायंकाळीं.
१० कल्की - श्रावण शु. ६ सायंकाळीं.
(
[धर्मसिंधु]) (
[म. भा. शांति. अ. ३३९])
दशविध द्विदल धाग्यें १ चणक, २ मसूर, ३ मूग, ४ उडीद, ५ लाख, ६ वाटाणे, ७ तूर, ८ वाल, ९ चवळी व १० कुळीथ.
दशविध नाद २ चिनचिनी नाद, २ शिंगी नाद, ३ तंती नाद, ४ ताळ नाद, ५ सुस्वर नाद, ६ गर्जना नाद, ७ शंख नाद, ८ घोष नाद, ९ भेरी नाद, १० मेघ नाद.
असे दहा प्रकारचे नाद साधकांस कोटी जप पूर्ण झाल्यावर ऐकूं येतात व नादाचा अनुभव येतो असें योगशास्त्रांत सांगितले आहे. ' दशमो मेघनाद ; (
[हंसोपनिषत्])
दशविध रंग १ हिरवा, २ तांबडा, ३ निळा, ४ काळा, ५ अत्यंत लाल, ६ शेंदरी, ७ पिंगट, ८ करडा, ९ पारवा आणि १० मोराच्या गळ्याखालील रंगासारखा मेचक (
[म. भा. शांति. अ. २८४])
दशविध वक्तृत्व १ परिभावित, २ सत्य, ३ मधुर, ४ सार्थक, ५ परिस्फुट, ६ परिमित, ७ मनोहर, ८ चित्र, ९ प्रसन्न, १० भावानुगत. असे वक्तृत्वाचे दहा प्रकार. (
[वस्तुरत्नकोश])
दशविधशौच (शुद्धि) १ भावशौच, २ स्नानशौच, ३ जलशौच, ४ मृत्तिका - शौच, ५ श्मश्रुशौच, ६ संस्कारशौच, ७ पवित्र वाक्य, ८ प्राणिदया शौच, ९ अर्थशौच व १० आचारशौच. (
[वस्तुरत्नकोश])
दाशराज्ञ युद्ध ऋवेदकालीन एक फार मोठी ऐतिहासिक घटना. एका बाजूला राजा सुदास व त्याचे विरुद्ध, १ कवि चायमान, २ राजा तुर्वश, ३ वैकर्ण राजे, ४ शिम्यु, ५ देवक, ६ शंबर, ७ भेद, ८ पक्थ, ९ श्रुत व १० कवष,
या दहा बलाढय राजांमधील घनघोर युद्ध. हे दहा राजे अथवा त्यांचे संघ त्यांचें पौरोहित्य विश्वमित्राकडे होतें. सुदास राजाचें पौरोहित्य वसिष्ठाकडे होतें, वसिष्ठानें संघटना करून सुदास राजाला दहा संघाविरुद्ध जय मिळवून दिला. हे युद्ध परुष्णी आणि यमुना या नद्यांमधील प्रदेशांत झालें अशी कथा आहे. (
[ऋग्वेद दर्शन]) (दाशराज्ञ युद्ध)
दहा अंगें (यमाचीं) १ अहिंसा, २ सत्य, ३ अस्तेय, ४ ब्रह्मचर्य, ५ क्षमा, ६ धृति, ७ दया, ८ आर्जव, ९ मिताहार व १० शौच.
दहा अंगें (नियमांचीं) १ तप, २ संतोष, ३ आस्तिक्य, ४ दान, ५ ईशपूजन, ६ सिद्धांत - वाक्य, ७ ह्री (लज्जा) ८ मति, ९ जप व १० व्रत.
दहा अवतार (शिवदेवतेचे) १ महाकाल, २ तार, ३ बालभुवनेश, ४ षोडशश्री विद्येश, ५ भैरव, ६ छिन्नमस्तक, ७ धूमवान ८ बगलामुख, ९ मातङग आणि १० कमल (
[शिव. पु. शतरुद्र अ. १७])
दहा अवस्था (कामविकाराच्या) १ द्दष्टाद्दष्ट, २ चित्त अस्वस्थ होणें, ३ निश्चय, ४ निद्रानाश, ५ कृश होणें, ६ लक्ष न लागणें, ७ निर्लज्जता, ८ उन्माद, ९ मूर्च्छा, १० मरण, (रतिरहस्य)
दहा अवस्था (ग्रहांच्या) १ दीप्त, २ स्वस्थ, ३ मुदित, ४ शांत, ५ शक्त, ६ पीडित, ७ दीन, ८ खल, ९ विकल आणि १० भीत, (
[सुलभ ज्योतिष])
दहा अपराध नामजपासंबंधीं १ संतांची निंदा, २ असत् मागीं मनुष्यापुढें नामगुणांचें कीर्तन, ३ दैवतामध्यें भेदबुद्धि, ४ वेदांवर अश्रद्धा, ५ शास्त्रावर अविश्वास, ६ गुरुवचनावर अश्रद्धा, ७ परमेश्वर नाममहिमा याला अर्थवाद समजण्याचा भ्रम, ८ नुसत्या नामानें पापक्षालन होतें असें समजून पाप करीत राहणें, ९ नामानेंच पुण्यलाभ होतो म्हणून आश्रमविहित कर्म न करणें आणि १० परमेश्वर नामस्मरण हें इतर यज्ञ, तप, व्रत आदि शुभकर्मांबरोबर समजणें. (
[पद्मपुराण])
दहा आद्य आचार्य शकुन शास्त्राचे १ श्रीशंकर, २ अत्रि, ३ गर्ग, ४ गुरु, ५ शुक्र, ६ वसिष्ठ, ७ व्यास, ८ कौत्स, अ ९ भृगु आणि १० गौतम (वसंतराज शाकुन)
दहा आत्म्याचीं विधेयें (साक्षात् बोधक) विशेषणें १ सत् , २ चित्, ३ आनंद, ४ ब्रह्म, ५ स्वयंप्रकाश ; ६ कूटस्थ, ७ साक्षी, ८ द्र्ष्टा, ९ उपद्र्ष्टा व १० एक (तत्त्व - निज - विवेक)
दहा आत्म्याचीं निषेध्यें (प्रपंचाचे निषेध द्वाराबोधक) विशेषणें १ अनंत, २ अखंड, ३ असंग, ४ अद्वितीय, ५ अजन्मा, ६ निर्विकार, ७ निराकार, ८ अव्यय, ९ अव्यक्त आणि १० अक्षर (तत्त्व - निज - विवेक)
दश आद्य आचार्य संन्यास मार्गाचे १ गौडपादाचार्य, २ गोविंद पादाचार्य, ३ विवरणाचार्य, ४ शंकरचार्य, ५ विश्वरूपाचार्य, ६ पृथ्वीधराचार्य ७ सहजाचार्य, ८ हस्तामलक, ९ पद्मपादाचार्य व १० तोटकाचार्य.
"संन्यासामाजीं हें अतिवर्य, हे परम सूर्य ज्ञानाचे"(हस्तामलक)
दहा आरोग्याचीं सूत्रें १ स्वच्छता, २ मोकळी हवा व सूर्यप्रकाश. ३ व्यायाम, ४ आहार, ५ विश्रांति, ६ ताठ बसणें, ७ नियमित आहार - विहार, ८ पाणी, ९ वस्त्र आणि १० मनःप्रवृत्ति. (Health. may, 1951)
दहा आज्ञा (बायबलमधील) १ रविवार हा विश्रांतीचा दिवस, २ परद्रव्याचा लोभ धरूं नको, ३ परस्त्रीचा लोभ धरूं नको, ४ व्यमिचार करूं नको, ५ हिंसा करूं नको, ६ चोरी, करूं नको, ७ खोटी साक्ष देऊं नको, ८ मातापितरांची आज्ञा पाळ, ९ मूर्तिपूजा करूं नकोअ व १० ईश्वराचें नांव व्यर्थ घेऊं नको. या आज्ञा खिस्ती धर्मग्रंथांत (जुना करारं) सांगितलेल्या आहेत. (जुना करार Exodus अ. २०).
दहा ईश्वर प्राप्तीच्या वैदिक विद्या १ उद्नीथविद्या, २ संवर्गविद्या, ३ मधुविद्या, ४ पंचाग्निविद्या, ५ उपकोसल - आत्मविद्या, ६ शांडिल्यविद्या ७ दहरविद्या, ८ भूमविद्या, ९ दीर्घायुष्यविद्या, १० मंथविद्या (
[रामगीता])
दहा ईश्वरविषयक बुद्धिगम्य कल्पना अथवा गुण १ पुरुषोत्तम,
२ विश्वाचें अंतर्यामीसूत्र,
३ वैश्वानर - जीवात्मा किंवा परमात्मा,
४ शाश्चत, चिन्मय विश्वांतील सूर्य,
५ मायी - अपूर्वशक्ति "मम माया दुरत्यया" (
[भ. गी. ७-१४])
६ विश्वांतील रस,
७ तज्जलान् किंवा जगाचे प्रभव - प्रलय - स्थिति,
८ अतिष्ठान - सर्वातीत पुरुष,
९ परम ज्ञेय व
१० परमाश्रर्य.
चिंतनाला योग्य असे हे दहा गुण. (
[भ. गी. सा. दर्शन])
दहा उपाय (उपजीविकेचे) १ विद्या (वेदव्यतिरिक्त), २ शिल्प, ३ रोजगार, ४ नौकरी, ५ गोरक्षण, ६ व्यापार, ७ शेती, ८ अंतःकरणाची विविध वृत्ति, ९ भिक्षेवर निर्वाह आणि १० व्याजबट्टा.
विद्या शिल्पं भृतिः सेवा गोरक्ष्यं विपणिः कृषिः।
धृतिं भैक्ष्यं कुसीदं च दश जीवनहेतव्वः ॥ (
[मनुअ १०-११६])
दहा कुलें विवाहास वर्ज्य १ क्रियाहीन, २ पुरुषरहित, ३ वेदरहित, ४ रोमश, ५ अर्शस (मूळव्याधि रोग असलेले) ६ क्षयरोगयुक्त, ७ आमयनी (
[अग्निमांद्य]), ८ अपस्मार, ९ श्वेतकुष्ठयुक्त व १० कुष्ठयुक्त. (
[मनु. ३-७])
दहा खेळ बुद्धिबळाचे १ शह, २ मात, ३ प्यादी, ४ हुचमल्ली, ५ कोंडमात, ६ मारेमात - फकीरी, ७ काटशह, ८ अविरतशह, ९ ठाणबंधमात व १० द्विगुणशह. (
[दु. श. को.])
दहा गुण (काव्याचे) १ श्लेष, २ प्रसाद, ३ समता, ४ समाधि, ५ माधुर्य, ६ ओज, ७ सौकुमार्य, ८ अर्थव्यक्त, ९ उदारता, व १० कांति.
औदार्यं समता कांतिरर्थव्यक्तिः प्रसन्नता।
समाधिः श्लेष ओजोऽथ माधुर्यं सुकुमारता ॥ (
[भ. ना.])
दहा गुण (गायनाचे) १ सुरक्त - बाद्यें स्वरांत मिळवून अ घेणें,
२ पूर्ण - उच्चार उत्ताम तर्हेनें करणें,
३ अलंकृत - आवाज यथायोग्य लावणें,
४ प्रसन्न - निःशंक होऊन गंभीर आवाजानें गाणें,
५ व्यक्त - उच्चार अर्थानुरूप व स्वष्ट करणें,
६ विकृष्ट - आलापांचे स्वर स्पष्ट रीतीनें लावणें,
७ श्लक्ष्णलयीमध्यें स्वरांचा विप्रस्तार करवून दाखविणें,
८ सम - तालवद्ध गाणें,
९ सुकुमारमृदुस्वर येतील तेथें मृदु उच्चार करणें आणि
१० मधुर - गाणें, मधुर गाऊन दाखविणें,
'दशैते स्युर्गणा गीते।' (
[संगीत रत्नाकर])
दहा गुण गोदुग्धाचे १ गोड, २ थंड, ३ मऊ, ४ स्निग्ध, ५ दाट, ६ श्लक्ष्ण (खरखरीत नव्हे तें) ७ बुळबुळीत, ८ जड, ९ मंद आणि १० निर्दोष (
[चरक - सूत्र - २७-२२१])
दहा गुण परमात्म्याचे १ सर्वाहून मोठा, २ प्रकाशवान् ३ दिव्यत्व, ४ ऐश्वर्य वाढविणारा, ५ संसारसमुद्राच्या अत्यंत सखोल भागांतहि असणारा ६ सत्यस्वरूप, ७ चिरयुवा, ८ सेवा करण्यास योग्य, ९ हिंसारहित शब्दांची प्रेरणा करणारा आणि १० अनंतसुखांना देत राहिला आहे. (
[अथर्व - अनु. मराठी])
दहा गुण सात्विक अन्नाचे १ आयुष्य, २ सत्त्व वाढविणारे, ३ बल, ४ आरोग्य, ५ सुख, ६ प्रीति वाढविणारे, ७ रसयुक्त, ८ स्निग्ध, ९ शरीरांत स्थिर रूपानें फार वेळ राहणारे आणि १० मनाला आनंद देणारे (
[भ. गी. १७-८])
दहा गुण स्नानाचे (अ) १ रूप, २ तेज, ३ बल, ४ शुचिता, ५ दीर्घायुष्य, ६ आरोग्य, ७ पवित्रता, ८ दुःअखप्रनाश, ९ तप व १० बुद्धि. (
[दक्षस्मृति]);
(आ) १ बल, २ रूप, ३ शुद्धध्वनि, ४ वर्णांचा स्पष्ट उच्चार, ५ मृदुपणा, ६ सुगंध, ७ स्वच्छता, ८ संपत्ति, ९ लावण्य व १० उस्कृष्ट स्त्रिया,
हे दहा गुण स्नानशील्ल पुरुषाचा आश्रय करतात. (
[म. मा. उद्योग. ३७. ३३])
दहा गोष्टी अन्नावर अवलंबून १ वर्ण, २ कांति, ३ सुस्वरता, ४ आयुष्य, ५ प्रतिभा, ६ सुख, ७ संतोष, ८ पुष्टि, ९ शरीरबल व १० बुद्धि. असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे.
तुष्टिपुष्टि बलं मेधा सर्वं अन्ने प्रतिष्ठितम् (
[आयुर्वेद])
दहा गोष्टी वर्ज्य (व्यवहारांत) १ चाकर - गर्विष्ठ, २ मुलगा - अति लाडका, ३ शत्रु - वर्म जाणणारा, ४ भाऊ - बाईलबुद्धीचा, ५ जामात - हट्टी व वेडा, ६ वक्ता - मित्रा अथवा भिडस्त, ७ मित्र - कपटी, ८ विद्धान - स्तुतिपाठक, ९ रोगी - पथ्य न करणारा, व १० गायक - मानी. या दहा गोष्टी व्यवहारांत वर्ज्य म्हणून सांगितल्या आहेत.
दहा गुरु (शीखपंथाचे) १ गुरु नानक, २ गुरु अंगडशहा, ३ अमरदास, ४ रामदास, ५ गुरु अर्जुन, ६ हरिगोविंद, ७ हरिराय, ८ हरिकृष्णजी, ९ तेजबहाद्दर व १० गुरु गोविंदसिंग.
दहा गुनजन्य सिद्धि १ क्षुधा - तृषाप्रभृति ऊमींच्या पलीकडे जाणें, २ दूरचें पाहणें, ३ दूरश्रवण ४ शीघगति, ५ रूपसिद्धि, ६ परकायाप्रवेश, ७ इच्छामरण, ८ स्वर्गांगनाप्राप्ति, ९ संकल्पसिद्धि, व १० निरंकुश आज्ञा.
या दहा गुणजन्य सिद्धि होत. (
[भाग. स्कं. ११-१५])
दहा ग्राम धान्यें १ तांदूळ, २ जव, ३ तीळ, ४ उडीद, ५ अणु, ६ प्रियंगु (राळे), ७ गहूं, ८ मसूर, ९ वाल आणि १० कुळीथ. (
[तैत्तिरीय ब्राह्मन. अ. ८])
दहा ज्योतिःशास्त्राचे ग्रंथकार आचार्य १ वराह, २ नृसिंह, ३ श्रीपति, ४ सत्य, ५ भास्कार, ६ ब्रह्मगुप्त, ७ वैद्यनाथ, ८ लल्ल, ९ श्रीधर व १० रेणुक. (श्रीषट् पंचाशिका)
दहा घन वाद्यें १ चिपळ्या, २ करताल, ३ झांज, ४ टाळ, ५ मंजिरी, ६ तास, ७ घंटा, ८ घुंगरू, ९ टिपर्या व १० जलतरंग. हीं दहा घन म्हणजे एकावर एक आघात करून वाजविलीं जाणारीं वाद्यें होत.
दहा तामस ऋषि १ काणाद, २ गौतम, ३ शक्ति, ४ उपमन्यु, ५ जैमिनि, ६ कपिल, ७ दुर्वास, ८ मृकंडु, ९ बृहस्पति आणि १० जामदग्न्य (परशुराम)
भार्गवं जामदग्न्यं च दशैतान्तामसानृषीन् । पद्म. उत्तरखंड)
दहा थाट (गायनशास्त्र) १ कल्याणथाट, २ बिलावल, ३ खमाज, ४ भैरव, ५ पूर्वी थाट, ६ मारवा, ७ काफी, ८ असावरी, ९ भैरवी व १० तोडी थाट. थाट म्हणजे स्वरानुरोधानें रागाचें वर्गीकरण.
दहा देवयोनि १ विद्याधर, २ अप्सरा, ३ यक्ष, ४ राक्षस, ५ गंधर्वाआआअ ६ किन्नर, ७ पिशाच, ८ गुह्मक, ९ सिद्ध आणि १० भूत. (
[अमर])
दहा दोष काव्याचे १ गूढार्थ, २ अर्थांतर, ३ अर्थहीन, ४ मिन्नार्थ, ५ एकार्थ, ६ अभिप्लुप्तार्थ, (तुटकतुटक), ७ न्यायाला सोडून. ८ कठीण. ९ विसंगत व १० शब्द गाळून.
शब्दच्युंत वै दश काव्यदोषाः। (
[भरत नाटय १६-८६])
दहा दोष (वरासंबंधीं) (अ) १ मुका, २ आंधळा, ३ बहिरा, ४ खुज्या बांध्याचा, ५ मूर्ख, ६ पांगळा, ७ नपुंसक, ८ कुष्ठी, ९ महारोगी आणि १० फपरें येणारा (विवाहसार);
(आ) १ उन्मत्त, २ उपजीविकेचें साधन नसलेला, ३ फेपरें येणारा, ४ दूरदेशीं वास करणारा, ५ कुष्ठ असलेला, ६ मूर्ख, ७ मोक्षमार्गाला अनुसरलेला, ८ शूर - सैनिकपेशा पत्करलेला, ९ अक्षरशून्य व १० विवाह परावृत्त असलेला. अशांना कन्या देऊं नये.
उन्मत्ता वृत्तहीनाश्च तथापस्मारदूषिताः।
दूरस्था कुष्ठ्नो मूर्खा मोक्षमार्गानुसारिणः ॥
शूरा अवेद्या निर्वृत्ता दश दोषयुता वराः।
तथा षंढाश्च पतिता चक्षुःश्रोत्रविवर्जिताः ॥ (ज्योतिर्मयूख)
दहा दोष (वाणीचे) १ विरोधी भाषण, २ एखाद्याला कासावीस करील असें, ३ उपहास, ४ छळ, ५ वर्मस्पर्श, ६ कोरडें आवेशाचें बोलणें, ७ कोटीबाज, ८ आशा पोटांत ठेवून बोलणें, ९ शंका उत्पन्न होईल असें व १० प्रतारणा (फसवेगिरी). हे भाषणप्रसंगीं दहा दोष मानले आहेत.
आटु वेगु विंदाणु। आशा शंका प्रतारणु।
हे सन्यसिले अवगुणु। ज्या वाचा ॥ (
[ज्ञाने. १३-२७२])
दहा द्दष्टियोग (ज्योतिष १ युती योग, २ एकराश्यांतर योग, ३ अर्ध काटकोन योग, ४ द्विराश्यांतर, ५ काटकोन, ६ त्रिकोण, ७ सार्ध काटकोन, ८ षडाष्टक, ९ प्रीतियोग आणि १० समक्रांति योग.
असे दहा द्दष्टियोग ज्योतिषांत मानले आहेत.
दहा धर्मलक्षणें १ धृति (धैर्य), २ क्षमा, ३ सहिष्णुता, ४ चोरी न करणें, ५ पवित्रता, ६ इंद्रियनिग्रह, ७ बुद्धि, ८ विद्या, ९ सत्य व १० अक्रोधता.
धृतिः क्षमा दमोऽस्तेय शाचमिंद्रियनिग्रहः।
धीर्विद्या सत्यक्रोधौ च दशकं धर्मलक्षणम् ॥ (
[मनु. ६-९२])
दहा धर्मसाधनें १ अहिंसा, २ क्षमा, ३ सत्य, ४ लोभलज्जा, ५ श्रद्धा, ६ इंद्रियनिग्रह, ६ दान, ८ यज्ञ, ९ तप व १० ध्यान. हीं दहा धर्मसाधनें होत. (भ. ब्रह्म. १८९-३५)
दहा धातूंचें शरीर १ वात, २ पित्त, ३ कफ, ४ चर्म, ५ रुधिर, ६ मांस, ७ मेद, ८ हाडें, ९ मज्जा व १० शुक्र.
प्रत्येक शरीर या दहा धातूंचें बनलें आहे. (भा. दर्शनसंग्रह)
दहा नांवें अर्जुनाचीं १ अर्जुन, २ फाल्गुन, ३ जिष्णु, ४ किरीटी, ५ श्वेतवाहन, ६ बीभत्सु, ७ विजय, ८ कृष्ण, ९ सव्यसाची आणि १० धनंजय.
अर्जुनः फाल्गुनो जिष्णुः किरीटी श्वेतवाहनः।
बीभत्सुर्विजयः कृष्णः सव्यसाची धनंजयःअ ॥ (
[म. भा. विराट ४४-९])
दहा नांवें शनीचीं १ कोणस्थ, २ पिंगल, ३ बभरु, ४ कृष्ण, ५ रौद्रा, ६ अंतक, ७ यम, ८ सूर्यपुत्र, ९ शनैश्वर (शनि) आणि १० मंद,
कोणस्थः पिंगलो बभरुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः।
सौरिः शनैश्वरो मंदः पिप्पलादेन संस्तुतः ॥ (श्रीशनैश्वरस्तोत्र)
दहा नियम (अ) १ तप, २ संतोष, ३ आस्तिकता, ४ इंद्रियदमन, ५ देवपूजा, ६ सच्छास्त्रश्रवण, ७ लज्जा, ८ बुद्धि, ९ जप आणि १० हवन,
हे दहा नियम म्हणजे आत्मसंयमनासाठीं करावयाचीं कृत्यें.
तपः संतोष आस्तिक्यं दान्तो देवस्य पूजनम् ।
सिद्धान्तं श्रवणं चैव ह्लीर्मतिश्च जपो हुतम।
दशैते नियमाः प्रोक्ता मया पर्वतनायक। (
[देवीगीता])
दहा निरनिराळे अर्थ"योग"शब्दाचें १ ध्यान धारणा - अध्यात्मशास्त्र,
२ औषधी योजना - वैद्यशास्त्र,
३ दोन वस्तूंना जोडणें - वास्तुशास्त्र,
४ कामधंदा - व्यवहारशास्त्र,
५ हस्तलाघव - इंद्रजाल,
६ युद्धसाहित्य जुळवणी - युद्धशास्त्र,
७ कुशाग्रतेनें होणारें कर्म - कर्मयोग,
८ ग्रहांची युति - ज्योतिष,
९ अनेक रसांचें मिश्रण - रसायन आणि
१० कुशलतापूर्ण शासनप्रबंध - राज्यशासन,
असे योग शब्दाचे अर्थ निरनिराळ्या शास्त्रांत अमिप्रेत आहेत. (गीतेंतील राजकीय तत्त्वज्ञान)
दहा पदार्थ गुणोत्पादक १ शास्त्रें, २ तीर्थें, ३ पुत्रादिसमाज, ४ देश, ५ काल, ६ कर्म, ७ जन्म, ८ ध्यान, ९ मंत्र, आणि १० जातकादि - संस्कार. (
[भाग ११-१३-४])
दहा पापकर्में (शारीरिक तीन)- १ हिंसा, २ चोरी, व ३ निषिद्ध कामवासना ;
(वाचिक चार)-१ चहाडी, २ कठोर, ३ खोटें व ४ अप्रसिद्ध असें बोलणें आणि
(मानसिक तीन)- १ दुसर्याचा घात करण्याची इच्छा, २ मत्सर, व ३ खोटी समजूत.
दहा पुराणकालीन मूर्ख १ दुर्योधन, २ रावणा, ३ शिशुपाल, ४ जरासंध, ५ कंस, ६ हिरण्यकशिपु, ७ भस्मासुर, ८ रुक्मी, ९ जयद्रथ आणि १० शकुनि. हे दहा पुराणकालीन मूर्ख होत असे भीष्म सांगतात.
' ऐसे दशमूर्ख संसारीं। म्यां ऐकिले पाहिले नेत्रीं ॥ (
[सिद्धान्तबोध])
दहा पुष्टी १ वाक्पुष्टि, २ ज्ञानपुष्टि, ३ शरीरेंद्रिय युष्टि, ४ ग्रहक्षेत्रपुष्टि, ५ धनधान्यपुष्टि, ६ प्रजापुष्टि, ७ पशुपुष्टि, ८ ग्रामपुष्टि, ९ धर्मपुष्टि, व १० अणिमादिपुष्टि, अशा दहा पुष्टी सांगिलेतल्या आहेत. (रुद्रार्थ दीपिका)
दहा प्रकारच्या कपिला गाई १ सुवर्ण कपिला, २ गौर पिंगला, ३ आरक्त पिंगाक्षी, ४ जल पिंगला, ५ बभरुर्णाभा, ६ श्चेत पिंगला. ७ रक्त पिंगाक्षी, ८ खूर पिंगला, ९ पाटला आणि १० पुच्छ पिंगला, (जिच्या शेपटाच्या केसाचा रंग पिवळा असतो ती). (
[म. भा. अश्वमेध - १०५-५१])
दहा प्रकारचे गारुड मंत्र १ वेदगारुड, २ देवीगारुड, ३ वीरगारुड, ४ कृष्णगारुड, ५ मंत्रगारुड, ६ यंत्रगारुड, ७ सिद्धगारुड, ८ नाथगारुड, ९ अघोरगारुड आणि १० कालमैरवगारुड, (
[मंत्रशास्त्र व मंत्र शक्तियोग])
दहा प्रकारचे गुरु १ उपाध्याय, २ पिता, ३ माता, ४ वडील बंधु, ५ शासक, ६ मामा, ७ श्वशुर, ८ आईचे वडील, ९ पित्याचे वडील व १० चुलता. (
[कूर्म पुराण])
दहा प्रकार चुंबनाचे १ मिलित, २ स्फुरित, ३ घाटिक, ४ तिर्यक्, ५ उत्तरोष्ठ, ६ पीडित, ७ संपुट, ८ हनुववत्र, ९ प्रतिबोध आणि १० समौष्ठ चुंबन, (
[अनंगरंग])
दहा प्रकारचीं बलें १ विद्या, २ कुलीनता, ३ मित्रपरिवार, ४ बुद्धि, ५ सत्त्व, ६ धन, ७ तपस्या, ८ सहाय्यता, ९ सामर्थ्य आणि १० दैव.
विद्याभिजनमित्राणि बुद्धिसत्त्वधनानि च।
तपःसहायवीर्याणि दैवं च दशमं बलम् ॥ (
[म. भा. शांति, अ. १५४])
दहा प्रकारच्या मुद्रा (योगशास्त्र) १ महामुद्रा, २ महाबन्घ, ३ महाभेद, ४ खेचरी, ५ जाळंदरबंध, ६ मूलबंध, ७ विपरीत कृति, ८ उड्डीयान, ९ वज्रोली, व १० शक्ति चालना.
(
[शिवसंहिता]) ह्मा दहा मद्रा जरा व मरण यांचा नाश करणार्या आहेत. (ह. प्र.)
दहा प्रसिद्ध भाट १ वेलंग, २ बलाख, ३ भीमसी (कृतयुग), ४ पिंगळ, ५ रंपाल (त्रेतायुग), ६ सूत, ७ संजय (द्वापारयुग), ८ चंदभाट, ९ वेताळभाट आणि १० गंगभाट (कलियुग).
असे दहा प्रसिद्ध भाट होऊन गेले. (अमृत ऑगष्ट १९५५)
दहा प्रकार मनोव्यवसायाचे १ ग्रहण, २ धारण, ३ स्मरण, ४ व्याप्ति, ५ व्यवस्था, ६ चिकित्सा, ७ निर्णय, ८ निश्चय किंवा श्रद्धा, ९ प्रकटीकरण व १० क्रिया.
या सर्वांना बुद्धि लागते व त्या प्रत्येक प्रकारासंबंधानें बुद्धीचें प्रामाण्य सांभाळावें लागतें. (केळकरांची निबंधमाला)
दहा प्रकारचे यज्ञ १ अग्निहोत्र, २ दर्शपौर्णमास, ३ चातुर्मास्य, ४ पशुयाग, ५ सोमयाग हे पांच नैमित्तिक व १ देवयज्ञ, २ पितृयज्ञ, ३ ब्रह्मयज्ञ, ४ भूतयज्ञ आणि ५ मनुष्ययज्ञ, हे पांच नित्य मिळून दहा यज्ञ होत.
दहा प्रकारची व्यृहरचना १ गुरुड, २ मकर, ३ श्येन, ४ अर्ध - चंद्र, ५ वज्र, ६ शकट, ७ मंडल, ८ सर्वतोभद्र, ९ चक्र आणि १० सूची.
अशी दहा प्रकारची व्यूहरचना प्राचीन काळीं युद्धांत करीत असत. (
[अग्नि २-३६])
दहा प्रकार शाक भाजांचे १ मूल - मुळा, गाजर इ., २ पान - अळू. चुका इ., ३ करीर - वेळूचा कोंब, ४ अग्र - शेंडे शेंडे खुडलेली - हरभरा इ.. ५ फळ - वांगी, तोंडली, इ., ६ कांड - ऊंस, ७ अधिरूढ - बीजांकुर - वाल. मटकी, इ. मोड आणवलेली, ८ त्वक - केळ्याची साल ९ फूल - केळफूल, हदगा, इ., आणि १० कवच - छत्राक.
मूलपत्र - करीराग्र - फकाण्डाऽधिरूढकमऽऽ७।
त्वक् पुष्प - कवचं चैव शांक दशविधं स्मृतम् ॥ (
[अमर])
दहा प्रकारच्या सभा १ राजसभा, २ विलाससभा, ३ सभ्यसभा, ४ संतसभा, ५ सजनसभा, ६ महाजनसभा, ७ सर्वाशा परिपूर्णकारक सभा, ८ ज्ञानसभा, ९ मित्रसभा व १० प्रीतिसभा असे दहा प्रकार. (प्रतिष्ठान मासिक.)
दहा प्रकार सामान्य धर्माचे १ क्षमा, २ सत्यभाषण, ३ दया, ४ दान, ५ शौच, ६ इंद्रियनिग्रह, ७ सूर्यपूजन, ८ अग्नीमध्यें हवन, ९ संतोष व १० चौर्य कर्माचा त्याग.
सूर्यपूजाऽग्निहवनं संतोषः स्तेयवर्णनम् ।
सर्वव्रतेष्वयं धर्मः सामान्यो दशधा स्मृतः॥ (
[भविष्य ब्राह्म. १६८-८])
दहा प्रकार सूक्तांचे १ देवता, सूक्तें, २ ध्रुवपद सूक्तें, ३ कथा सूक्तें, ४ संवाद सूक्तें, ५ दानस्तुति सूक्तें, ६ तत्त्वज्ञान सूक्तें, ७ संस्कार सूक्तें, ८ मांत्रिक सूक्तें, ९ लौकिक सूक्तें व १० आप्री सूक्तें, सूक्त म्हणजे मंत्रसमूह. (
[History of Dharamashastra Vol. V.])
दहा प्रकारचीं स्नानें १ आग्नेय - भस्मस्नान, २ वारुण - पर्जन्य - स्नान, ३ ब्राह्म - गायत्र्यस्नान, ४ वायव्य - गाईच्या पायांच्या धुळीचें, ५ अवगाहन - बुडी मारणें, ६ कंठस्नान, ७ कटिस्नान, ८ कापिल - ओल्या वस्त्रानें अंग पुसणें, ९ मंत्रस्नान - मंत्रानें मार्जन आणि १० मानसस्नान.
आग्नेयं वारुणं ब्राह्मं वायव्यं चावगाहनम् ।
कंठस्नानं कटिस्नानं कापिलं मंत्रमानसे॥ (विश्वब्रह्मपुराण)
दहा प्रकार हास्याचे १ विनोद, २ अट्टहास, ३ अतिरंजना, ४ विद्रूप, ५ परिहास, ६ उपहास, ७ व्याजोक्ति, ८ वक्रोक्ति, ९ व्यंग्य व १० विकृति (हिंदी सा. कोश)
दहा प्रजापति १ मरीचि, २ अत्रि, ३ अंगिरा, ४ पुलस्त्य, ५ पुलह, ६ क्रतु, ७ भृगु, ८ वसिष्ठ, ९ दक्ष आणि १० नारद,
हे दहा ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होत. यांपासून पुढें सर्व प्रजा उत्पन्न झाल्या. (
[भाग. ३-१२-२१])
दहा प्राण तालांचे १ काल, २ मार्ग, ३ क्रिया, ४ अंग, ५ ग्रह, ६ जति, ७ कला, ८ लय, ९ यति व १० प्रस्तार,
संगीत क्रियेच्या गतीचें नियमित प्रमाण ज्याच्या योगानें दाखविलें जातें त्यास ताल म्हणतात. तालास लागणार्या विशेष महत्त्वाच्या गोष्टीस प्राण अशी संज्ञा आहे. (
[म. ज्ञा. को. वि. १९])
दहा प्रमुख स्थानें चुंवनाचीं १ ललाट, २ केश, ३ कपोल, ४ नयन, ५ वक्ष, ६ स्तन, ७ ओष्ठ अंतर्मुख, ८ वंक्षण, ९ कक्षा आणि १० वरांग.
हीं दहा चुंबनाचींज प्रमुख स्थानें कामशास्त्रांत सांगितलीं आहेत. (
[वा. कामसूत्रें])
दहा प्रमुख दार्शनिक वाद १ आरंभवाद, २ संघातवाद, ३ असत्ख्यातिवाद, ४ आत्मख्यातिवाद, ५ परिणामवाद, ६ विवर्तवाद, ७ द्दष्टिसृष्टिवाद, ८ प्रतिबिंबवा, ९ सत्ख्यातिवाद आणि १० अख्यातिवाद. असे दहा प्रमुखवाद दर्शन ग्रंथांतून सांगितले आहेत.
दहा भास्कर क्षेत्रें १ काशी, २ पुष्पगिरि, ३ कांची, ४ निवृत्ताख्या (निवृत्ति संगम), ५ अलंपुरी, ६ श्रीशैल, ७ श्रीविरूपाक्ष, ८ सेतुबंध रामेश्वर, ९ केदार व १० गोकर्ण.
काशी पुष्पगिरिःअ कांची निवृत्ताख्या अलंपुरी।
श्रीशैलः श्रीविरूपाक्षः सेतुः केदार एव च।
गोकणें च दशैतानि भास्कराण्याहुरुत्तमाः॥ (
[स्कंद - गोकर्ण अ. ६६])
दहा मर्मस्थानें (शरीरांतील) १ शिरोबंधन, २ रसनाबंधन, ३ कंठ, ४ रक्त, ५ ह्रदय, ६ नामि, ७ मूत्राशय, ८ शुक्र, ९ ओज व १० गुद् .
दश जीवितधामानि शिरोरसनबंधनम् ।
कंठोऽस्त्रं ह्रदयं नाभिर्बस्तिः शुक्रौजसी गुदम ॥ (
[वाग्मट, शरीअर ३-१३])
दहा' म' कार चंचल होत १ मन, २ मधुकर, ३ मेघ, ४ मानिनी, ५ मदन, ६ मरुत - वारा, ७ मा (लक्ष्मी), ८ मद, ९ मर्कट आणि १० मत्स्य.
हे दहाजण अति चंचल होत. त्यांत मनाला अग्रस्थान दिलें आहे.
मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत ।
मा मदो मर्कटो मत्स्यो मकरा दश चंचलाः॥ (
[सु.])
दहा मुख्य मुद्रा १ महामुद्रा, २ महाबंध, ३ महावेध, ४ खेचरी, ५ उड्डियान. ६ मूलबंध, ७ जालंधरबंध, ८ विपरीत करणी, ९ वज्रोली व १० शक्तिचालन, या दहा मुद्रा जरा व मरण यांचा नाश करणार्या आहेत. (इ. प्र.)
दहा मंत्रब्राह्मण ग्रंथकार व विधर्माचा नाश करणारे १ वसिष्ठ, २ शक्ति, ३ पराशर, ४ इंद्रप्रमति, ५ भरद्वसु, ६ मैत्रावरुण, ७ कुण्डिन, ८ सुद्युम्न, ९ बृहस्पति आणि १० भरद्वाज.
' दशमस्तु भरद्वाजो मन्त्रब्राह्मणकारकः।
एते चैव हि कर्तारो विधर्मध्वंसकारिणः॥' (
[वायु, पूर्वार्ध ५६-१०६])
दहा मंत्री (श्रीकृष्णसभेचे) १ उद्धव, २ वसुदेव, ३ कंक, ४ विपृथु, ५ श्वफल्क, ६ चित्रक, ७ गद, ८ सत्यक, ९ बलमद्र व १० पृथु.
हे दहा यदुकाळांतील ज्येष्ठ व श्रेष्ठ असे दहा मंत्री श्रीकृष्णाच्या सभेंत होते. (
[हरिवंश विष्णुपर्व])
दहा यतिधर्म १ क्षमा, २ निर्लोभता, ३ आर्जव, ४ मार्दव, ५ तप, ६ संयम, ७ सत्य, ८ शौच, ९ आकिंचन्य, व १० ब्रह्मचर्य. (जैनधर्म)
दहा यम (नियमन - आत्मसंयमन) (अ) १ अहिंसा, २ सत्य, ३ चोरी न करणें, ४ ब्रह्मचर्य, ५ दया, ६ सरळपणा, ७ क्षमा, ८ धैर्य, ९ मिताहार आणि १० पवित्रता;
(आ) १ सत्य, २ क्षमा, ३ आर्जव, ४ ध्यान, ५ आनृशंस्य (क्रौर्याचा अभाव), ६ अहिंसा, ७ इंद्रियदमन, ८ प्रसन्न चित्त, ९ सद्वर्तन आणि १० सर्वाभूतीं दया.
दहा यमकें (अलंकारप्रकार) दोन चरणांतील शेवटचीं कांहीं अक्षरें एकाच ध्वनीचीं किंवा तींच तीं असलीं तर यमक हा अलंकार होतो. त्याचे प्रकार - १ आद्ययमक, २ अंत्ययमक, ३ चरणयमक, ४ पूर्णयमक, ५ दामयमक, ६ अश्वघाटी यमक, ७ पुष्पयमक, ८ संदष्टयमक, ९ संयुतावृत्ति यमक व १० पंक्तियमक.
दहा विश्वेदेव १ क्रतु, २ दक्ष, ३ वसु, ४ सत्य, ५ काल, ६ काम, ७ धुनि, ८ रोचन, ९ पुरुरवा आणि १० आर्द्रव.
धुनिश्च रोचनश्चैव तथा चैव पुरुरवाः।
आर्द्रवश्च द्शैते तु विश्वेदेवाः प्रकीर्तिताः॥ (
[बृह - स्मृति])
दहा व्यसनें (कामवासनेपासून उत्पन्न होणारीं) १ मृगया, २ अक्षक्रीडा, ३ दिवसा निद्रा, ४ परदोषकथन, ५ स्त्रीसंभोग (
[अमर्यादित]), ६ मद्यपान, ७ अतिगायन, ८ अतिवादन, ९ अतिनर्तन आणि १० अकारण भ्रमण, (
[मनु ७-४७])
दहा वाहनें श्रीविष्णूचीं १ हंस, २ सिंह, ३ हनुमान् , ४ शेष, ५ गुरुड, ६ दंतावळ, ७ रथ, ८ अश्च, ९ शिबिर आणि १० पुष्पक. (
[कल्याण भागवतांक])
दहा शिक्षणानुग्रहास पात्र १ आचार्यपुत्र, २ सेवक, ३ अन्य कोणतेंहि ज्ञान सांगणारा, ४ धार्मिक, ५ पवित्र, ६ आप्त, ७ ग्रहण करण्यास सम्रर्थ, ८ धनदाता, ९ हितेच्छु व १० ज्ञातिवर्ग, (
[मनु २-१०९])
दहा विशेषणें वेदानें स्त्रीस दिलेली १ इडा - उत्तम वाणीनें युक्त, २ रन्ता - रमणीय, ३ हव्या - पूजनीय, ४ काम्या - कामना पूर्ण करणारी, ५ चंद्रा - आल्हाद देणारी, ६ ज्योति - अज्ञानांधकार हरण करणारी, ७ दीनता - हीनता रहित, ८ ज्ञान संपादन करणारी, ९ उदार भावनायुक्त आणि १० बहुश्रुता.
इडे रन्ते हव्ये काम्ये चन्द्रे ज्योतेऽदिते सरस्वति महि विश्रुति।
एता ते अऽघ्न्ये नामानि देवेभ्यो मा सुकृतं ब्रूतात् ॥ (माध्यदिन - शुक्ल यजुर्वेद संहिता ८-४३)
दहा वैशिष्टयें सर्व सामान्य हिंदुधर्माचीं १ ब्रह्म हें एकच सत्तत्व आहे.
२ सर्वधर्मसहिष्णुता,
३ एकांत अनेकत्व आणि अनेकांत एकत्व - परमेश्वर एक असून सर्वांतर्यामी असल्यामुळें अनेकत्व. अशा प्रकारें अनेकत्व असूनहि तो मूळांत एकच आहे म्हणून एकत्व,
४ ऋणत्रय (देव, ऋषि व पितर),
५ पुरुषार्थ चतुष्टय (धर्म, अर्थ, काम व मोक्ष),
६ वर्ण आणि जाति,
७ आश्रम व्यवस्था, (ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ आणि संन्यास)
८ कर्म आणि पुनर्जन्म,
९ कर्म, भक्ति व ज्ञान हे तीन मार्ग व
१० अधिकार भेद.
(
[History of Dharmashastra VOL. V. Part. II])
दहा सर्वौषिधि १ कोष्ठ, २ जटामांसी, ३ साधी हळद, ४ आंबे - हळद, ५ मुरामांसी ६ शिलाजीत, ७ चंदन, ८ वेखंड, ९ चाफा व १० नागरमोथा.
कुष्ठं मांसी हरिद्रे द्वे मुरा शैलेयचंदनम् ।
वचा ञ्चंपकमुस्ते च सर्वौषध्यो दश स्मृताः ॥ (
[History of Dharmashastra VOL. V, Prt.. I])
हीं सर्वोपयोगीं औषधें होत.
दहा सत्पुरुषांचींज लक्षणें १ भक्ति, २ परमेश्वरावर निष्ठा, ३ निर्मयता, ४ ध्यान, ५ विराग्य, ६ सरलता, ७ करुणा, ८ निर्जनप्रियता. ९ अनिदा आणि १० शास्त्रनिष्ठा. (
[कल्याण संतांक])
दहा संस्कार (मंत्रसिद्धीसाठीं) १ जनन, २ दीपन, ३ बोधन, ४ ताडन, ५ अभिषेक, ६ विमलीकरण, ७ जीवन, ८ तर्पण, ९ गोपन व १० आप्यायन,
हे संस्कार मंत्रसिद्धीसाठीं करावे लागतात, असा सांस्कारिक मंत्र लवकर सिद्ध होतो. (
[कल्याण संतांक])
दहा स्थानें अग्नीचीं १ ते ३ प्रुथिवी वगैर तीन लोक, ४ अग्नि, ५ वायु, ६ आदित्य, ७ अप्, ८ औषधी, ९ वनस्पति आणि १० शरीर. (
[ऋग्वेद. मंडळ. १०-३])
दहाजण धर्म जाणत नाहींत १ मद्यपि, २ वेसावध ३ उन्मादग्रस्त, ४ थकलेला, ५ क्रुद्ध, ६ बुभुक्षित, ७ उतावळा, ८ लुब्ध, ९ मित्रा आणि १० विषयलंपट.
तेव्हां शहाण्यानें यांशीं संबंध ठेवूं नये.
मत्तःअ प्रमत्त उन्मत्तः श्रान्तः क्रुद्धो बुभुक्षेतः
त्वरमाणश्व लुब्धश्च भीतः कामी च ते दश ॥ (
[म. भा. उद्योग])
दहाजण पोष्य होत १ आई, २ बाप, ३ गुरु, ४ पत्नी, ५ प्रजा, ६ दीन, ७ आश्रित, ८ पाहुणा, ९अ अतिथि आणि १० अग्नि.
पिता माता गुरुर्मार्या प्रजा दीनः समाश्रितः।
अभ्यागतोऽतिथिश्चाग्निः पोष्यवर्ग उदाह्रतः ॥ (
[दक्षस्मृति]) (
[देवी भाग. ११-१२-२०])
दहाजण षण्मुद्रा साध्य झालेले १ ध्रुव, २ प्रह्लाद, ३ मारुति, ४ लक्ष्मण, ५ मयूरध्वज, ६ हरिश्चंद्र, ७ रुक्मांगद, ८ अंबरीष, ९ अर्जुन आणि १० श्रीकृष्ण.
दहा फायदे शिकारीपासून होणारे १ श्रेष्ठ व्यायाम, २ कफापचय - कफनाश, ३ मेदोपकर्ष - चरबी कमी होणें, ४ सर्वासहत्व - विविध ऋतु व क्षुत्पिपासा सहनशीलता वाढते, ५ पिकांचें व हिंस्त्र पशुपासून इतर प्राणिमात्रांचें संरक्षण, ६ स्थलपथशल्यशोधन - हिंस्त्र प्राणीमात्रांच्या वधानें मार्गातले अडथळे दूर करणें, ७ भूप्रदेशाचें निरीक्षण, ८ सत्त्वज्ञान - प्राणीमात्रांच्या भावनांचा अभ्यास, ९ वन्यजमातींचा विश्वास संपादन व १० उत्साहशक्ति - शौर्यादि गुणांची वृद्धि, (दशकुमारचरित)
दहा जणांकडे जातांना रिक्त हस्तें जाऊ नये १ अग्निहोत्र, २ गृह, ३ क्षेत्र, ४ मित्र, ५ भार्या, ६ सुत, ८ शिशु - कोणताही लहान मुलगा, ९ राजा व १० देवता,
अग्निहोत्रं गृंह क्षेत्रं भार्या सुतं शिशुम्।
रिक्तापाणिर्न पश्येत राजानं देवताम गुरुम् ॥ (
[सु.])