पंधरा अंगें योगाचीं १ यम, २ नियम, ३ त्याग, ४ मौन, ५ देश, ६ काल, ७ आसन, ८ मूलबंध, ९ देहाची समता, १० द्दष्टीची स्थिरता, ११ प्राणायाम, १२ प्रत्याहार, १३ धारणा, १४ आत्मध्यान्व १५ समाधि (अपरोक्षानुभूति)
पंधरा अनर्थ द्रव्या मुळें उद्भवतात १ चोरी, २ हिंसा, ३ असत्य अथवा फसवाफसवीचा व्यवहार, ४ दंभ, ५ काम, ६ क्रोध, ७ गर्व, ८ मद, ९ भेद, १०, वैर, ११ अविश्वास, १२, स्पर्धा, १३ स्त्री, १४ द्यूत व १५ मद्यपान.
'एते पञ्चदशानर्था ह्मर्थमूला मता नृणाम् ।' (
[भाग ११-२३-१९])
एवं ही पंधरा अनर्थ। मूर्ख अथवा पंडित।
जें अर्थसंग्रह करित। अवश्य हे तेथ उठती ॥ (
[ए. भा. २३-३-३४])
पंधरा कौरवांचे प्रमुख साह्मकर्ते १ भगदत्त, २ भूरेश्रवा, ३ शल्य, ४ कृतवर्मा, ५ जयद्र्थ, ६ सुदक्षिण, ७ नील, ८ विन्द व अनुविन्द ९ केकेय, १० बृहद्वल, ११ शकुनि, १२ बाल्हिक, १३ कर्ण, १४ अलम्बुष, (राक्षस) व १५ संशप्तकगण, (
[म. भा. उद्योग. अ १९])
पंधरा तत्त्वें स्थूल शरीराचीं १ ते ५ पंच ज्ञानेंद्रियें, ६ ते १० पंचकर्मेंद्रियें आणि ११ ते १५ पंचविषय हीं मिळून पंधरा तत्त्वांचा स्थूल देह निर्माण झाला आहे.
पंधरा तेजस्वी तारे तारे व इतर आकाशस्थ ज्योति असंख्य असल्या तरी त्यांत अधिक तेजस्वी असे पंधरी तारे आहेत त्यांचीं नांवें - व्याध, २ अगस्ति, ३ मित्र, ४ अभिजित् , ५ ब्रह्मह्रदय, ६ स्वाती, ७ नील, ८ प्रश्वाअ, ९ अशिर, १० ब्रह्मा, ११ श्रवण, १२ लोहित, १३ रोहिणी, १४ चित्र, व १५ ज्येष्ठा. (
[म. ज्ञा. कोअ. २०])
पंधरा प्रकार नमनाचे १ दंडवत, २ रामराम, ३ मुजरा, ४ सलाम, ५ कुरनिसात, ६ कुरनिस, ७ अभिनंदन, ८ आदेश, ९ जय - गोपाळ, १० जोहार, ११ आशीर्वाद, १२ जय सीताराम, १३ शिरसाष्टांग, १४ नमस्कार व १५ साष्टांग नमस्कार, (शब्दत्नावली) आधुनिक - हस्तांदोलन हा सोळावा प्रकार होय.
पंधरा प्रतिष्ठा १ मान, २ कीर्ति, ३ पत, ४ लौकिक, ५ प्रसिद्धि, ६ बहुमानाच्या जागीं स्थापना, ७ देवालयाच्या सन्मानार्थ उभारलेल्या स्मारकाची स्थापना, ८ देवमूतींची यथाविधि स्थापना, ९ वास्तुशांति, १० स्वतःचें घर असणें, ११ देवाचें वर्षासन इत्यादि, १२ सालंकृत कन्यादान, १३ आयुष्यांत स्थिर व स्थायिक होणें, १४ टोपण नांव व सभा वगैरे ठिकाणीं घेऊन जाण्याचा पोषाख आणि १५ एखादी सन्माननीय पदवी. (
[म. श. को.])
पंधरा प्रमुख गंधर्व १ विराध, २ तुंबरु, ३ दनु, ४ चित्ररथ, ५ धृतराष्ट्र, ६ किशोर, ७ हूहू, ८ हाहा, ९ विद्याधर, १० उग्रसेन, ११ विश्वावसु, १२ परावसु, १३ चित्रसेन, १४ गोपाल व १५ बल.
'चित्रसेनश्च गोपालो बलः ॥' (ग. ब्रह्म. ९-३)
पंधरा मुख्य प्रकार औषधींचे (आयुर्वेद) १ घृत, २ तैल, ३ कषाय, ४ गुटिका, ५ मोदक, ६ पुटपाक, ७ चूर्ण, ८ कल्क, ९ स्वरस, १० लेह ११ अवलेह, १२ यवागू, १३ अरिष्ट, १४ आसव व १५ चूर्णारिष्ट. (
[म. ज्ञा. को. वि. ५])
पंधरा स्थितप्रज्ञाचीं लक्षणें १ कामनात्याग, २ आत्मसंतुष्ट, ३ दुःखानें उदास होत नाहीं, ४ सुखाची आसक्ति नाहीं, ५ प्रीति, भय व क्रोध यांपासून अलिप्त, ६ ममत्वत्याग, ७ आसक्तिरहित, ८ शुभप्राप्तीचा आनंद नाहीं, ९ अशुभाचा द्वेष नाहीं, १० इंद्रियनिग्रह करून परमेश्वरपरायण ११ संयमी, १२ प्रसन्नचित्त, १३ भोगासंबंधीं उदासीन, १४ स्वस्वरूपीं स्थिर, १५ कामना, ममता व अहंकार वगैरेंचा त्याग, निरिच्छ्ता, (
[भ. गीता. २-५५-७१])