एकोणीस नांवें गंगेची १ गंगा, २ त्रिपथगा, ३ भागीरथी, ४ त्रिदशदीर्घिका, ५ त्रिस्त्रोता, ६ जाह्लवी, ७ मंदाकिनी, ८ भीष्मजननी ९ सरिद्वरा, १० विष्णुपदी, ११ सिद्धगा, १२ स्वर्गा, १३ स्वर्गंगा, १४ खगा, १५ आपगा, १६ ऋषिकुल्या, १७ हैमवती, १८ सर्वापि आणि १९ हरशेखरा. (हेमचंद्रकोश)
एकोणीस धन संपादनाचे कामीं साहाय्यक सदगुण १ शास्त्र, २ बुद्धि, ३ धैर्य, ४ दक्षता, ५ प्रगल्मता, ६ धारणाशक्ति, ७ उत्साह, ८ वक्तृत्व, ९ औदार्य, १० संकटकालीं सहनशीलता, ११ तेज, १२ पावित्र्य, १३ मित्रत्व, १४ त्याग, १५ सत्य, १६ कृतज्ञता, १७ कुलं, १८ शील आणि १९ हेम.
शास्त्रं प्रज्ञा घृतिर्दाक्ष्यं प्रागल्म्यं धारयिष्णुता।
उत्साहो वाग्मितौदार्यमापत्कालसहिष्णुता ॥
प्रभावः शुचिता मैत्री त्यागः सत्यं कृतज्ञता।
कुलं शीलं दमश्चेति गुणा सम्पत्तिहेतवःअ। (
[अग्नि. २३-५])
एकोणीस प्राचीन संगीत शास्त्रवेत्ते १ शिव, २ गौरी, ३ ब्रह्मा, ४ माधव, ५ नंदिकेश्वर, ६ दंतिल, ७ कहोल, ८ रावण, ९ हनुमान्, १० याज्ञ्वल्क्य, १६ गणेश, १२ नारद, १३ तुंबर, १४ हाहा. १५ हूहू, १६ षण्मुख, १७ बृहस्पति, १८ अर्जुन आणि १९ बाणासुरकन्या उषा.
(
[संगीतरत्नाकर])
एकोणीस प्रकारच्या वीणा १ कच्छपी. २ कुब्जिका, ३ चित्रा, ४ वहन्ती, ५ परिवाहिनी, ६ जया, ७ घोषवती, ८ ज्येष्ठा, ९ नकुली, १० महती, ११ वैष्णवी, १२ ब्राह्मी, १३ रौद्री, १४ कूर्मी, १५ रावणी, १६ सरस्वती १७ किन्नरी १८ सैरंघ्री व १९ घोषका. (संगीत मकरंद)