|
चतुर्थ १ चार वस्तूंच्या समुच्चयापैकीं चवथ्या वस्तूला संकेतानें म्हणतात. कात, मोक्ष, दंड इ. (अ) १ पान, २ सुपारी, ३ चुना आणि ४ कात ; (आ) १ धर्म २ अर्थ, ३ काम आणि ४ मोक्ष ; (इ) १ साम, २ दाम, ३ भेद, आणि ४ दंड. चतुराक्षरी मंत्र (अ)"राधा कृष्ण"भाविकांचा एक गोड मंत्र. (आ)"वासुदेव" (इ)"दत्ता - त्र - य"(श्रीदत्तस्तवपदामृत) (ई)"रामकृष्ण". "उघडा मन्व जाणा। रामकृष्ण म्हणा"([तुकाराम]) चतुरात्मा १ मन, २ बुद्धि, ३ अहंकार व ४ चित्त या चार अंतःकरणाच्या वृत्ती होत ; म्हणून त्यांस चतुरात्मा म्हणतात. (वि. स. नाम) चतुरानंद १ आत्मानंद, २ ब्रह्मानंद, ३ अविद्यानंद व ४ विषयानंद. चतुरायुध १ शंख, २ २ चक्र, ३ गदा आणि ४ पद्म. हीं श्रीविष्णूचीं चार आयुधें. चतुरायुध क्षेत्रें - १ शंखक्षेत्र - जगन्नाथपुरी, चक्रक्षेत्र - भुवनेश्वर, ३ गदाक्षेत्र - वैतरणी नदी आणि ४ पद्मक्षेत्र - मैत्रावन (कोणार्क) हीं सर्व चतुरायुध क्षेत्रें ; ओरिसांत (उत्कल) आहेत. चतुर्विध अन्न (अ) १ भक्ष्य - चर्वण करून खाण्याचे पदार्थ - भाकरी, पोळी वगैरे ; २ लेह्म - जसें पंचामृत, रायतें वगैरे ३ चोष्य - चोखण्याचे ऊंस इ. आणि ४ पेय - पिण्याचें - दूध, ताक वगैरे. (आ) १ शुक्र, २ पक्र, ३ स्निग्ध आणि ३ विदग्ध. ([शिव - लि.]) चतुर्विध आसव (चित्त - मळ) १ कामासव, २ द्दष्टि़ आसव - माताभिमान, ३ भवासव - पारलौकिकेच्छा व ४ अविद्या - अयथार्थ ज्ञान (बुद्ध्दर्शन) चतुर्विध जीव १ देव, २ मनुष्य, ३ तिर्यक् (मनुष्येतर जीव) आणि ४ नरकी (जैनधर्म) चतुर्विध कर्तव्यें विद्यार्थ्यांचीं १ स्वतंत्र बुद्धि, २ स्वतःवर ताबा असणें, ३ सेवापरायणता व ४ सर्वासाबधानता (भूदानगंगा भाग ६) चतुर्विध दानें १ आहारदान, २ ज्ञानदान, ३ औषधीदान आणि ४ अभयदान (जिनधर्म). चतुर्विध पुरुषार्थ १ धर्म, २ अर्थ, ३ काम व ४ मोक्ष. हे चार पुरुषार्थ होत. ज्ञानी भक्त, भक्ति हा पंचम पुरुषार्थ मानतात. 'भक्ति भाग्य प्रेमा। साधित पुरुषाथ। ब्रह्मींचा जो अर्थ। निज ठेवा ॥' ([तुकाराम]) चतुर्विध प्रलय १ आर्त - द्रौपदी, २ जिज्ञासु - उद्धव, ३ अर्थार्थीधरूव आणि ४ ज्ञानी - शुकदेव. 'आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।' ([भ. गी. ७-१६]) चतुर्विधभक्त १ आर्त - द्रौपदी, २ जिज्ञासु - उद्ध्व, ३ अर्थार्थीधरूव आणि ४ ज्ञानी - शुकदेव. 'आर्तो जिज्ञासुरर्थाथीं ज्ञानी च भरर्षभ।' ([भ. गी. ७-१६]) चतुर्विध भक्ति लोकमातेची (नदीची) १ स्नान, २ पान, ३ दान व ४ गान (जीवनलीला). चतुर्भद्र (अ) १ धर्म, २ अर्थ, ३ काम व ४ मोक्ष या चार पुरुषार्थांचा समुच्चय. (आ) १ सुंठ, २ अतिविष. ३ मुस्ता गवत व ४ गुळवेल. या चार औषधींचा समूह. (इ) १ गोड शब्दानें दान, २ गर्वरहित ज्ञान, ३ क्षमाशील शौर्य व ४ त्यागयुक्त वित्त. या चार दुर्लभ गोष्टींना चतुर्भद्र म्हणतात. ([प्रश्नोत्तर - रत्न - मालिका]) चतुर्विध मित्र १ औरस, २ नात्यागोत्यांचे, ३ वंशपरंपरा ऋणानुबंधी आणि ४. आपत्कालीं रक्षण करणारे. औरसं कृतसंबंध तथा वंशक्रमागतम् । रक्षकं व्यसनेभ्य़श्च मित्रं ज्ञेयं चतुर्विधम् ॥ (का. नी. ४-७४) चतुर्विध मुक्ति १ सकोकता, २ समीपता, ३ सरूपता व ४ सायुज्यता. ([दा. बो. ४-१०-२८]) चतुर्मूर्ती १ विराट्, २ सूत्रात्मा, ३ व्याकृत व ४ तुरीय. या चार ब्रह्माच्याच मूर्ती होत म्हणून त्यास चर्तुमूर्ती म्ह्णतात. ([विष्णू स.- नाम]) चतुर्विध योग १ कर्मयोग. २ भक्तियोग, ३ राजयोग आणि ४ ज्ञानयोग. चतुर्व्यूह (अ) १ बासुदेव. २ संकर्षण, ३ प्रद्युम्न आणि ४ आनिरुद्ध. पृथ्वीस आधारभूत असे चार व्यूह आहेत ; (आ) १ रोग, २ आरोग्य, ३ निदान आणि ४ भैषज्य (वैद्यशास्त्र) (इ) १ शरीर पुरुष, २ छंदः पुरुष, ३ वेद पुरुष आणि ४ महापुरुष असे परब्रह्माचे चार व्यूह आहेत म्हणून त्यास चतुर्व्यूह म्हणतात. ([विष्णू स. नाम.]) चतुःश्लोकी भागवत श्रीमद्भागवताच्या दुसर्या स्कंधांतील नवव्या अध्यायांतील ३२ ते ३५ हे चार श्लोक. यांत ब्रह्मदेवाला भगवंतानें सांगितलेलें गुह्म ज्ञान अथवा सर्व भागवत ग्रंथाचें सार आहे, म्हणून त्यास चतुःश्लोकी भागवत म्हणतात. तें हें चतुःश्लोकी भागवत। स्त्रष्टयासी सांगे भगवंत ॥ (च. भा. ४३०) चतुःश्लोकी शाकुंतल शाकुंतल नाटकांतल्या चवथ्या अंकांतील चार श्लोक. या कालिदासाच्या अमर कृतीला ही संज्ञा आहे. काव्येषु नाटकं रम्यं तत्रापि च शकुंतला। तन्मध्ये तु चतुर्थोऽङ्कः तत्र श्लोकचतुष्टयम् ॥ ([सु.]) चतुर्विध साधनें (दुःखपारिहाराचीम) १ मैत्री, २ करुणा, ३ मुदिता आणि ४ उपेक्षा ([योग०]) चतुःशास्त्र १ न्याय, २ व्याकरण, ३ पूर्वमीमांसा आणि ४ उत्तर मीमांसा हीं चार शास्त्रें व यांत पारंगत तो चतुःशास्स्त्री. चतुःसूत्री (कर्मयोगाची) १ कर्मण्येवाधिकारस्ते, २ मा फलेषु कदाचन, ३ मा कर्मफलहेतुर्भूः, ४ तो ते सङ्गोऽस्त्वकर्मणि. ([भ. गी - २-४७]) चतुःसूत्री (महानुभाव) २ अहिंसा, २ निःसंग, ३ निवृत्ति आणि ४ भक्तियोग. चतुःसूत्री (चरित्र लेखनाची) १ व्यक्तिविकास, २ स्वभावचित्रण, ३ सौंदर्य आणि ४ अचूकता (म. टाईम्स २९ पप्रिल १९६३) चतुःसूत्री (लोकमान्यप्रणीत) १ स्वदेशी, २ बहिष्कार ३ राष्ट्रीय शिक्षण आणि ४ स्वराज्य. चतुःसूत्री (व्यावहारिक आचरणाची) १ जसेंच्या तसें, २ जेव्हांच्या तेव्हा, ३ ज्याचें त्यांनीं व ४ जेथल्या तेथें ([आयुर्वेदपत्रिका एप्रिल १९६०]) चतुःसूत्री (श्रीशिवछत्रपतींच्या अवतारकार्याची) १ देव, २ धर्म, ३ गो (गाय) आणि ४ ब्राह्मण यांचें प्रतिपालन. चतुःसूत्री (श्रीशंकराचार्य) १ अथातो ब्रह्मजिज्ञासा, २ जन्मः - द्यास्य यतः, ३ शास्त्रयोनित्वात् व ४ तत्तु समन्वयात् ([ब्रह्मसूत्र शारीरकभाष्य]) चतुःसूत्री (समर्थांची) (अ) १ हरिकथानिरूपण - भक्ति, २ राजकारणशक्ति, ३ सर्वविषयीं सावधपणा - युक्ति आणि ४ साक्षेप - मुक्ति. ([दा. बो. ११-५-४]) (आ) १ कर्म, २ उपासना, ३ ज्ञान आणि ४ मोक्ष ([दा. बो.]) चतुःसूत्री (स्वास्थ्यरक्षणाची) १ दिनचर्या २ ऋतुचर्या, ३ वेगोदीरणधारण आणि ४ सदाचार (आयुवेंद) चतुःसूत्री (ज्ञानेश्वरीची) १ भक्तियुक्त अंतःकरण, २ अध्यात्म - शास्त्र, ३ वाक्चातुर्य आणि ४ सर्वांचें सुख ([ज्ञानेश्वरी १८-१७५०]) चत्वार गुण १ तमोगुण, २ रजोगुण, ३ सत्त्वगुण आणि ४ शुद्ध - सत्त्वगुण. ऐसे हे चत्वार गुण। चौदेहाम्चे ॥ ([दा. बो. १७-९-५]) चत्वार देव १ नाना प्रतिमा, २ अवतार महिमा, ३ अंतरात्मा व ४ निर्विकारी देव. ऐसे हे चत्वार देव। सृष्टीमधील स्वभाव। या वेगळा अंतर्भाव। कोठेंचि नाहीं ([दा. बो. ११-२-३४]) चत्वार देह आणि त्यांचे अभिभानी १ स्थूल देह - विश्व, २ सूक्षमदेह - तैजस, ३ कारणदेह - प्राज्ञ व ४ महाकारण देह - प्रत्यगात्मा (परमामृत) चत्वार भोग १ स्थूल भोग, २ प्रविविक्त भोग (उपाधिरहित), ३ आनंद भोग व ४ आनंदावभास भोग ([दा. बो. १७-९-३]) चत्वार मात्रा १ अ - कार २ उ - कार, ३ म - कार व ४ अर्धमात्रा. ऐस्या मात्रा चत्वार। चौदेहाच्या ([दा. बो १७-९-४]) चत्वार शक्ति १ क्रियाशक्ति, २ द्र्व्यशक्ति, ३ इच्छाशक्ति आणि ४ दानशक्ति. ([दा. बो. १७-९-६]) चतुष्पाद चार पायांचीं जनावरें किंवा चार चरणांचीं नक्षत्रें. चतुष्पाद धर्म (अ) १ तप, २ यज्ञ, ३ ज्ञान व ४ वैराग्य ; (आ) १ अहिंसा, २ सत्य, ३ अस्तेय आणि ४ आनृण्य. हे चार धर्माचे पाद (पाय) होत. चतुष्पादा संपत्ति व तिच्या सोळा कला ([आयुर्वेदांतील -संपत्ति कला]) (अ) वैद्य - १ द्क्ष, २ गुरूपासून विद्यक शिकलेला, ३ स्वच्छतेची आवड असलेला व ४ अनुभविक. (आ) औषध - १ अनेक प्रकारें देतां येण्यासरखें, २ अनेक विकार बरें करणारें, ३ संपन्न - ताजें व ४ ज्या रोगावर द्यावयाचें त्याच रोगावर योजिलेलें. (इ) परिचारक - प्रेंमळ, २ स्वच्छतेनें राहणारा, ३ रोग्याबद्दल आस्था असलेला व ४ चतुर. (ई) रोगी - १ औषधास खर्च करणारा, २ बैद्यावर विश्वारस ठेवणारा, ३ रोगाचीं खरीं कारणें सांगणारा आणि ४ धैर्यवान् . या प्रकारच्या षोडशकलात्मक चतुष्पाद संपत्तीनें युक्त असा रोगी बरा झाल्यावांचून राहात नाहीं असें वैद्यक शास्त्रांत सांतितलें आहे. (वा. अ. १) चातुर्मास्य १ आषाढ शु. ११ ते कार्तिक शु. ११ पर्यंतचा चार महिन्यांचा काळ. चार अक्षरी मंत्र (अ) त - ड - जो - ड व्यवहारांत हा मंत्र उभयपक्षीं सुखावह होतो. (आ) वि - स - र - लों - ज्याला मनःपूर्वक काम करावयाचें नसतें त्याला वेळ मारून नेण्याचा सोइस्कर मंत्र म्हणून उच्चारला जातो. चार अंगें (आत्मज्ञानाचीं) १ इच्छाशक्ति, २ प्रज्ञा, ३ नीतिज्ञान व ४ श्रद्ध. (कल्यान ईश्वरांक) चार अंगें ह्ठयोगाचीं १ आसन २ प्राणायाम, ३ मुद्रा व ४ नादानुसंधान ([कबीर दोहावली]) चार अंगें (सहिष्णुतेचीं) १ द्वंद्वसहिष्णुता, २ वेगसहिष्णुता, ३ परोत्कर्षसहिष्णुता आणि ४ परमतसहिष्णुता, चार अपाय श्रवणास १ लय - निद्रा, २ विक्षेप - वृत्तीची बहिर्मुखता, ३ कषाय - राग द्वेष इत्यादिकांचे योगानें चित्त स्तब्ध होणें, व ४ रसस्वाद - प्रसंगोपात्त आलेलीं वर्णनें तींच तींच ऐकण्याविषयींची आसक्ति ([ए. भा. ११-७०५]) चार अवस्था (अ) १ जागृति (सृष्टीच्या विविधतेचा अनुभव), २ स्वप्र, ३ सुषुप्ति (अद्वैताचा अनुभव) आणि ४ तुर्या (शु्द्धावस्था); (आ) १ बाल्य, २ पौगंड, ३ तारुण्य आणि ४ वार्धक्य. यांना अवस्था - चतुष्टय म्हणतात. चार अवस्थांतील चार गोष्टींचा कधींच मेळ बसत नाहीं १ बाळपणच्या कल्पना, २ तारुण्यांतील मनोराज्यें, ३ प्रौढपणींचे विचार आणि ४ वार्धक्यांतील भावना. चार अवस्था (फोटोच्या) १ प्रकाश दर्शन, २ विकसन, ३ प्रस्थापन व ४ मुद्रण. फोटो घेण्यापासून तो तयार हिईपर्यंत या चार अवस्थांतून जावें लागतें. (सुलभ फोटोग्राफी) चार अवस्था (आनंदाच्या) १ आनंद, २ परमानंद, ३ विरमानंद आणि ४ सहजानंद. चार अवस्था (मोक्षमार्गावरील) १ बद्ध, २ मुमुक्षु, ३ साधक आणि ४ सिद्ध, चार अवस्था (वासनांच्या) १ प्रसुप्तवासना, २ तनुवासना २ विच्छिन्न - वासना आणि ४ उदार वासना ([पा. योग - साधनपाद]) चार अवस्था (स्त्रियांच्या वयपरत्वें) १ बाला - बारा वर्षेपर्यंत २ प्रौढ - बारा ते चोवीस वर्षें, ३ मुग्धा - चोवीस ते बत्तीस आणि ४ प्रगल्भा - बत्तीसपासून चाळीस वर्षेपर्यंत (मूळस्तंभ) चार अवस्था (साधकांच्या) बाल, २ उन्मत्त, ३ पिशाचवत् आणि ४ सहजावस्था (रवींद्र्वीणा) चार अवतार (श्रीदत्ताचे) १ श्रीदत्त, २ श्रीपाद श्रीवल्लभ, ३ श्रीनृसिंह सरस्वती आणि ४ अक्कलकोटचे स्वामी. (माऊली विशेषांक) चार अरण्यें १ दंडकारण्य़, २ स्वकारण्य, ३ नैमिषारण्य आणि ४ धर्मारण्य. हीं पूर्वकालीं भारतवर्षांतर्गत जंबुद्वीपांतील चार अरण्यें होतीं. (मूळस्तंभ) चार अश्व (श्रीकृष्णाच्या रथाचे) शैब्य, २ सुग्रीव, ३ मेघ - पुष्प व ४ बलाहक ([म. भा. उद्योग ८३-१९]) चार आदर्श कामिनींचे (अ) १ जूनो, २ व्हीनस, ३ मिनर्व्हा आणि ४ डायना असे चार आदर्श ग्रीक रोमन समाजानें कल्पिले आहेत. (आ) वैदिकांचे मतें - १ मानिनी - सती, २ रूप्सम्राज्ञी - रति, ३ शारदा व ४ युद्ध - प्रिया - दुर्गा हे होता. (अशोक ते कालिदास) चार आश्रम १ ब्रह्मचर्याश्रम, २ गृहस्थाश्रम, ३ वानप्रस्थाश्रम आणि ४ संन्यासाश्रम. ' एते गृहस्थप्रभवाश्वत्वारः पृथगाश्रमाः ([मनु ६-८७]) चार आर्य सत्यें - (बौद्ध धर्म) १ जग दुःखाचाहि (निरोध होतो आणि ४ दुःअखनिरोध शक्य तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग. चार आचार्य (वैष्णव सांप्रदायाचे) १ विष्णुस्वामी, २ निंबार्क, ३ मध्वाचार्य आणि ४ रामानुजाचार्य, हे चारहि वैष्णव सांप्रदायप्रवर्तक दक्षिण भारतांत होऊन गेले. विष्णुस्वामी प्रथमतो निंबादित्यो द्वितीयकः। मध्वाचार्यस्तृतीयस्तु चतुर्थो रामानुजस्तथा ॥ चार आचार्यपीठें (मठ) (श्रीशंकराचार्य स्थापित) १ पूर्वेस - जगन्नाथ पुरी - गोवर्धन मठ, २ पश्चिमेस - द्वारका - शारदा पीठ, ३ उत्तरेस - बदरीनारायण जवळ - ज्योतिर्मठ व ४ दक्षिणेस - श्रृंगेरी - म्हैसूरप्रदेश - मुख्य़ पीठ. चार आत्मे १ जीवात्मा - शरीरांत राहणारा, २ शिवात्मा - जग भरून राहणारा, ३ परमाअत्मा - दिक्कालातीत आणि ४ निर्मलात्मा (केवळ शुद्ध चैतन्य स्वरूप) ([दा. बो. १७-४५]) चार आत्मज्ञानाचीं मुख्य साधनें १ विवेक, २ वैराग्य, ३ शमादि षट्क व ४ मुमुक्षता. चार आपत्तींची द्वारें १ अयोग्यकर्माचा आरंभ, २ स्वजनांशीं वैर, ३ बलंवताशीं स्पर्धा आणि ४ दुष्ट स्त्रीचा विश्वास. (प्रमाणसाहस्त्री) चार आनंद (अ) १ शब्दानंद, २ कल्पनानंद ३ अनुभवानंदव ४ श्रद्धानंद (विचारपोथी). चार आरोग्याचे शत्रु १ रसनेची विकृत रुचि, २ देहांतील मृत तंतु, ३ अनवश्य्क अन्न आणि ४ न पचतां जठरांत सांचणारें अन्न. चार उपाय १ साम, २ दाम, ३ भेद आणि ४ दंड. ([या. स्मृति]) चार उपाय (ज्ञान प्राप्तीचे) १ श्रद्धा, २ तत्परता, ३ इंद्रिय - संयम आणि ४ योगसंसिद्धि (समत्व बुद्धियोग) ([भ. गी. ४-३९]) चार उपवेद १ आयुर्वेद ([ऋग्वेद]) २ धनुर्वेद ([यजुर्वेद,]) ३ गांधर्ववेद ([सामवेद]) आणि ४ स्थापत्यवेद - अर्थशास्त्र ([अथर्ववेद]) (भ. ब्रा. २-८) चार ऋणें १ देवऋण, २ ऋषिऋण, ३ पितृऋण व ४ मनुष्यऋण किंवा समाजऋण वा परमात्मऋण ([मानवधर्मसार]) चार ऋत्विज १ अध्वर्यु, २ ब्रह्या, ३ होता आणि ४ उद्गाता. असे यज्ञांत मुख्य चार ऋत्विज असतात. चार कर्में (इस्लाम धर्म) १ नमाज, २ रोजा, ३ जकात, व ४ हज. ([कल्याण साधनांक]) चार कर्में (यतींचीं) १ ध्यान, २ अंतर्बाह्म शुचिता, ३ भिक्षा आणि ४ नित्य एकान्तसेवन. ध्यांनं शौचं तथा भिषा नित्यमेकान्तशीलता। यतेश्चत्वारि कर्माणि पञ्चमं नोपपद्यते ॥ ([स्कंद, काशी. ४१-२०]) चार कलि (कलह) वास्तव्य स्थानें - १ द्यूत, २ मद्यपान, ३ स्त्रियांसंबंधीं क्षुद्र व्यवहार व ४ हिंसा, कलीनें आपल्यास राहावयास स्थान नेमून देण्याविषयीं विनंती केल्यावरून राजा परीक्षितानें हीं चार प्रकारचीं दुष्कृत्यें जेथें चालतात अशीं चार स्थानें नेमून दिलीं. अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानि कलये ददौ। द्यूतं पानं स्त्रियः सूना यत्राधर्मश्चतुर्विधः ([भाग. स्कंध १-१७-३८]) चार कषाय (मनोविकार) १ क्रोध. २ लोभ, ३ मान, व ४ माया. या चारीपासून कर्मबंध उत्पन्न होतो असें जैन धर्म मानतो. ([रत्नकरंडक श्रावकाचार अ १]) चातुर्वर्ण्य १ ब्राह्मण, २ क्षत्रिय, ३ वैश्य आणि ४ शूद्र या चार समाजविशेषांना मिळालेलें सामुदायिक नाम. चार 'ग' कार १ गंगा, २ गीता, ३ गायत्री आणि ४ गोविंद. या चार 'ग' कारांचें स्मरण करणारांस पुनर्जन्मापासन मुक्त होतां येतें. गीता गङ्गा च गायत्री गोविन्दो ह्रदि संस्थितः। चतुर्गकारसंयोगत पुनर्जन्म न विद्यते ॥ (पां. गी.) चार गति १ देवगति, २ मनुष्यगति, ३ तिर्यंच्गति आणि ४ नरकगति, ([तत्त्वार्थसूत्र]) चार गुण (कोंबडयापासून घ्यावेत) १ पहाटे उठणें, २ युद्ध करणें, ३ स्वकष्टार्जित भाग बंधुवर्गास देणें व ४ स्त्रीचें आपत्तीपासून रक्षण करणें, युद्धं च प्रातरुत्थानं भोजनं सहबंधुभिः। स्त्रियमापद्नतां रक्षेच्चतुः शिक्षेच्च कुक्कुटात् ([वृ. चा. ६-१८]) चार गुण (दुर्लभ) १ दान - संतोषानें, २ ज्ञान - निगर्वी, ३ शौर्याचे अंगीं क्षमा आणि ४ संपत्तींत त्याग. "वित्तं त्यागसमेतं दुर्लभमेतच्चतुर्भद्रम् "([बृहत्स्तोत्ररत्नाकर]) चार गुण (शाश्वत स्त्रीत्वाचे) - १ रजोदर्शन ; २ गर्मधारण, ३ प्रजोत्पादन व ४ प्रज्ञापोषण. ([नासदीय सूक्त भाष्य - उत्तरार्ध]) चार गुण (वृद्धसन्मानानें प्राप्त होतात) १ आयुष्य, २ सौंदर्य, ३ सुख आणि ४ बल (श्री माताजी) चार गुण (स्वभावसिद्ध असतात) १ औदार्य, २ मधुर भाषण, ३ धैर्य व ४ युक्तायुक्त विचार. दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता। अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वारः सहजा गुणाः ॥ ([सु.]) चार गोष्टींवर व्यक्तीचें महत्त्व १ जन्म (कुल), २ रूप, ३ शील आनि ४ अंगति, ([गूढार्थचंद्रिका]) चार गोष्टी (एकदा गेल्या म्हणजे पुन्हा न मिळणार्या) १ गेलेली अब्रू, २ वोललेला शब्द, ३ दवडलेली संधि आणि ४ गेलेलें आयुष्य. चार गोष्टी (कल्याणकर) १ वाणीचा संयम, २ अल्पनिद्रा, ३ अल्प - आहार आणि ४ एकाग्र चित्तानें परमेश्वर - स्मरण. चार गोष्टीपासून ग्रंथ सांभाळावेत १ तेल, २ पाणी, ३ अस्ताव्यस्तपणें ठेवणें आणि ४ मूर्खांचे हातीं देणें. तैलाद्रक्षेद् जलाद्रक्षेत रक्षेत् शिथिलबंधनात् । मूर्खहस्ते न दातव्यमिदें बदति पुस्तकम् ॥ ([सु.]) चार गोष्टी (नसतील तेथें वास्तव्य करूं नये) (अ) १ मान अथवा प्रतिष्ठा, २ प्रीति, ३ गोत्रज व ४ ज्ञानसंपादन ; (आ) १ धनिक, २ वैद्य, ३ श्रोत्रिय ब्राह्मण आणि ४ जलपूर्णा नदी. तत्र मित्र न वस्तव्यं यत्र नास्ति चतुष्टयम् । ऋणदाता च वैद्यश्च श्रोत्रियः सजला नदी ॥ ([सु.]) चार गोष्टी (निरर्थक) १ घृतरहित भोजन ३ नेता नसलेलें राज्य, ३ वक्ता नसलेली सभा व ४ भूगोल न जाणणारा गणितशास्त्रज्ञ ([सिद्धांत शिरोमणि]) चार गोष्टी (पडद्याआड ठेवाव्यात) १ भोज, २ भजन, ३ संपत्ति आणि ४ स्त्री. भोजन भजन खजाना और नारी ये चारों चीजें कर परदेखि आरी चार गोष्टी (पवित्र) १ झर्याचें पाणी, २ पतिव्रता स्त्री, ३ कल्याण करणारा राजा अथवा थोर पुरुष व ४ संतुष्ट ब्राह्मण. चार गोष्टींचा परिणाम द्दष्टोत्पत्तीस येत नाहीं १ अजायुद्ध, २ ऋषिश्राद्ध (तर्पण), ३ सकाळचे ढग आणि ४ दांपत्यकलह. अजायुद्धमृषिश्राद्धं प्रभाते मेघडम्बरम् । दंपत्योः क्लह्श्चैव परिणामे न किंचन ॥ ([सु.]) चार गोष्टी (बुद्धीचा वाढ करणार्या) १ तीर्थावलोकन, २ सर्वत्र परिचय, ३ द्र्व्यार्जन आणि ४ नाना प्रकारचें निरीक्षण. चार गोष्टी (मनुष्यास बिघडविणार्या) १ यौवन, २ धन, ३ अधिकार आणि ४ अविवेक. चार गोष्टी (मनुष्याच्या आयुष्यावर परिणाम करणार्या) १ स्त्री, २ पैसा, ३ ईश्वर व ४ नांव (रुझवेल्टचीं - स्मृतिचित्रें) चार गोष्टी (मिळतांना सुख व सोडतांना दुःख देणार्या) १ अधिकार, २ गर्म, ३ ऋण आणि ४ श्वानमैथुन. अधिकारं च गर्मं च वित्तं च श्वानमैथुनम । आगमे सुखमाप्रोति निर्गमे प्राणसंकटम् ॥ ([सु.]) चार गोष्टी (मोक्षाचे दारावरील द्वारपाल) १ शम, २ विचार, ३ संतोष आणि ४ साधुसमागम. मोक्षद्वारे द्वारपालाश्चत्वारः परिकीर्तिताः ! शमो विचारः संतोषश्चतुर्थः साधुसंगमः ॥ (यो. वा. २-११-५५) चार गोष्टी (योगसिद्धीस सहाय्यक) १ शास्त्र, २ उत्साह, ३ गुरु आणि ४ काल आणि ४ शुत्र. चार गोष्टींची लहान म्हणून उपेक्षा करूं नये - १ रोग, २ सर्प, ३ अग्रि आणि ४ शत्रु. चार गोष्टींत (लज्जा अथवा भिडस्तपणा असूं नये) १ धान्य - संग्रह, २ विद्यासंपादन, ३ भोजन व ४ व्यवहार. धनधान्यप्रयोगेषु विद्यासंग्रहणेषु च। आहारव्यवहारे च त्यक्तलज्जः सुखी भवेत् ॥ ([चाणक्य - नीतिसार]) चार गोष्टी (वर्ज्य) १ आत्मनिंदा, २ आत्मस्तुति, ३ परनिंदा व ४ परस्तुति. या चारहि भल्या मनुष्यास वर्ज्य मानिल्या आहेत. ([म. भा. कर्ण ३६-४५]) चार गोष्टींनी विप्राचा नाश होत असतो १ वेदध्ययन नसणें, २ आचारधर्माचा त्याग, ३ आळस आणि ४ अन्नदोष. ([मनु]) चार गोष्टी (वृथा होत) - १ समुद्रावर पर्जन्य, २ भोजन झाल्यानंतर भोजन, ३ समर्थाला दान आणि ४ दिवसा दीप. वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम् । वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवाऽपि च ([सु.]) चार गोष्टी (सद्यःफलदायक) १ देवतांचा संकल्प, २ बुद्धिवानांचा प्रभाव, ३ विद्वानांचा विनय, आणि ४ पापी पुरुषांचा नाश. हे चारी सद्यःफलदायी होतात असें बृहस्पतीनें इंद्रास सांगितलें, अशी कथा आहे. देवतानां च सङ्कल्पमनुभावं च धीमताम् । विनयं कृतविद्यानां विनाशं पापकर्मणाम् ॥ ([म. भा. उ. ३३-७२]) चार गोष्टी (स्वार्थ - परमार्थ हे दोन्ही साधणार्या) १ सूर्योदया - पूर्वी स्नान, २ गोसेवा, ३ पुष्पोद्यानांत निवास आणि ४ मातापित्यांची सेवा. प्रातःस्नानं गवां सेवा आरामः पुष्पवाटिका। मातापित्रोश्च शुश्रूषा शास्त्राय च सुखाय च ॥ ([सु.]) चार गोष्टी (राष्ट्रोदयास आवश्यक) १ लोकांत एकी, २ धर्म - श्रद्धा, ३ विद्वानांचा मान आणि ४ शक्तिसंपन्नता. (भक्ति सा. २८-४२) चार गोष्टी (वडिलांच्या सेवेनें वृद्धिंगत होणार्या) १ आयुष्य, २ विद्या, ३ बल व ४ यश, अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः। चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम् ॥ ([मनु. २-१२१]) चार गोष्टी (हानिकारक) १ मलिन वस्त्रानें सतेजता कमी होते. २ कुभार्येमुळें घराचा बिघाड, ३ वाईट अन्नानें ओज कमी होणें, आणि ४ कुपुत्रामुळें कुलाला कलंक. कुवस्त्रं हरते तेजः कुभार्या हरते गृहम् । कुभोज्यं हरते बीजं कुपुत्रो हरते कुलम् ॥ ([सु.]) चार गृहसौख्यें १ स्वतःचें व कुटुंबियांचें आरोग्य, २ सुशील व सुद्दढ पत्नि, ३ खेळकर व दणकट संतति आणि ४ आवश्यक तितकें धन. चार चक्रें १ धर्मचक्र, २ कालचक्र, ३ विष्णुचक्र आणि ४ इंद्र - चक्र अशीं चार चक्रें (अस्त्रें) श्रीरामास विश्वामित्राकडून प्राप्त झालीं होतीं अशी कथा आहे. ([वा. रा. बालकांड]) चार चरण (धर्माचे) १ आत्मज्ञान, २ अध्यात्मचिंतन, ३ मनोविजय (मनःस्थिरत्व) आणि ४ इंद्रियनिग्रह. 'चतुष्पादा हि धर्मस्य ज्ञानं ध्यानं शमो दमः ॥' चार जाती (पुरुषांच्या) १ मृग, २ शश - ससा, ३ वृषभ आणि ४ गर्दम ([अनंगरंग - कामशास्त्र]) चार जाती स्त्रियांच्या १ पद्मिनी, २ चित्रिणी, ३ हस्तिनी व ४ शंखिनी. चार दानें सर्वश्रेष्ठ १ कन्यादान, २ गोदान, ३ भूदान व ४ विद्यादान, दानानां च समस्तानां चत्वार्येतानि भूतले। श्रेष्ठानि कन्याभूमिविद्यादानानि सर्वदा ॥ (सि. शि. चार दुर्गुण विनाशाप्रत नेणारे १ आळस, २ निद्रा, ३ विस - राळूपणा व ४ दिंरगाई. (कुरल) चार द्वारांचे चार दिक्पाल (मनुष्यदेहाचे) १ पूर्वद्वारा - मुख, २ पाश्चिमद्वार - गुदा, ३ उत्तर - मस्तकांत आणि ४ दक्षिणद्वार - शिश्न. पूर्व आणि पश्चिमद्वारांचा संबंध अन्ननलिकेशीं आणि दक्षिण आणि उत्तर द्वारांचा संबंध मज्जातंतूशीं आहे. ([अथर्व - अनु. मराठी भाग २ रा]) चार धनदायाद १ धर्म, २ अग्नि, ३ चोर आणि ४ राजा अथवा शासनाधिकारी. 'चत्वारो धनदायादा धर्माग्निनृपतस्कराः ॥' (स.) चार धर्मलक्षणें १ वेद, २ स्मृति, ३ सदाचार शिष्टाचार) आणि ४ (शास्त्रानें विकल्प सांगितला असेल तेथें) जो पक्ष आपणांस प्रिय असेल तो. वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः। एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद्धर्मस्य लक्षणम् ॥ ([मनु २-१२]) चार धर्मांतील चार सर्वश्रेष्ठ देवस्थानें १ हिंदु (वैदिक)- काशी - श्रीविश्वेश्वर, २ बौद्ध - बुद्धगया - बोधिवृक्षाचें स्थान, ३ मुसलमान - मक्का - काबा, ४ खिरस्ती - जेरुसलेम - ख्रिरस्ताची जन्मभूमि. चार धामें (अ) १ उत्तरेस - केदारनाथ, २ दक्षिणेस - रामेश्वर (हीं शिवाधाम्रें), ३ पूर्वेस - जगन्नथ व पश्चिमेस द्वारका हीं भारतांतलीं पवित्र देव - स्थानें. (आ) १ गंगोत्री, २ जम्नोत्री, ३ बदरी आणि ४ केदार (हिमालयांत). चार नरकद्वारें - १ काम, २ लोभ, ३ क्रोध आणि ४ दंभ. 'कामो लोभस्तथा क्रोधो दंभश्चत्वार इत्यमी ।।' (ग. गी. १०-२३) चार नैसर्गिक शक्ति (मानवाच्या) १ मन, २ प्राण, ३ संकल्पात्मक बुद्धि आणि ४ वाक् ([योगशास्त्र]). चार पण १ अज्ञानी बालपण, २ धुंद तरुणपण, ३ पराधीन म्हातारपन व ४ बाळंतपण. पहिले तीन पुरुषांना व त्याखेरीज चवथा स्त्रियांना असे चार पण आयुष्यांत जिंकावयाचे असतात. (भा. मर्दनशास्त्र) चार पदार्थ स्वतंत्र व अनादि १ जीव, २ देवता, ३ प्रपंच व ४ ईश्वर असे महानुभाव संप्रदायांत मान्ले आहेत. (भा. दर्शनसंग्रह) चार परम विख्यात धर्मोपदेशक १ श्रीकृष्ण, २ बुद्ध, ३ येशू आणि ४ अहंमद. असे चार धर्माचे उपदेशक आजपर्यंत जगतांत होऊन गेले. ([म. भा. उपसंहार]) चार परिमाणें विश्वाचीं (आधुनिक विज्ञान) १ लांबी, २ रुंदी, ३ उंची व ४ काल. ' लांबी रुंदी, उंची तीन। काल हें चवथें परिमाण। मानितें नव - विज्ञान। विश्व चतुःपरिमाणात्मक ॥ (विश्वदर्शन - नासदीय नीरांजन) चार परब्रह्माचीं प्रतीकें १ आकाश, २ सागर, ३ सूर्य आणि ४ नगाधिराज हिमालय. चार पायर्या परमार्थसाधनेच्या १ श्रवण, २ मनन, ३ निदिध्यासन व ४ साक्षात्कार. "द्र्ष्टव्यः श्रोतव्यः मन्तव्यः निदिध्यासितव्यः"([बृहदारण्यकोपनिषद्]) चार पार्वतीच्या सख्या १ जया, २ विजया, ३ जयंती आणि ४ मंगलारुणा. ([स्कंद. चातु. २१-२३]) चार पुण्यश्लोक १ नल, २ युधिष्ठिर, ३ जनक, आणि ४ जनार्दन (परमेश्वर). हे चार पवित्र कीतींचे पुरुष म्हणून सांगितले आहेत. पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः ॥ पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यश्लोको जनार्दनः ॥ ([पद्म. सृष्टि]) चार पैगंबर १ दाऊद, २ महम्मद, ३ ईसा व ४ मूसा. असे चार पैगंबर मुसलमानांत मानिले आहेत. (तत्त्व - निज - विवेक) चार प्रकार (अभिनयाचे) १ सात्त्वि, २ आंगिक, ३ वाचिक आणि ४ आहार्य. ([भ. ना. ६-२४]) चार प्रकार (अनध्ययाचे) १ नित्य अनध्याय, २ नैमित्तिक अनध्याय, ३ तात्कलिक व ४ आकालिक अनध्याय ([संस्कृति कोश]) चार प्रकार (आकाशाचे) १ घटाकाश, २ जलाकाश, ३ मेघाकाश व ४ महाकाश विचार - सा. रहस्य) चार प्रकार (अवघूताचे) १ ब्रह्मावधूत, २ शैवावधूत, ३ वीरावधूत व ४ कुलावधूत (ब्रह्मनिर्वाणतंत्र) चार प्रकार (अवतारांचे) १ पुरुषावतार, २ गुणावतार, ३ लिलावतार (कल्पावतार) आणि ४ मन्वंतरावतार (कल्यान मासिक). चार प्रकार (आनंदाचे) १ शारीरिक, २ मानसिक, ३ बैद्धिक आणि ४ आत्मिक. चार प्रकार (कुस्तीचे) १ भीमसेनी (शक्तिचे डाव), २ हनुमन्ती (युत्कीचे डाव), ३ जांबुवन्ती (बांधाचे डाव) आणि ४ जरासन्धी (नेस्या - हातपाय मोडण्याचे). (व्या. को.) चार प्रकारचे आचार शाक्तपंथाचे १ वामाचार, २ दक्षिणाचार, ३ सिद्धान्ताचार व ४ कौलाचार. (भा. दर्शनसंग्रह) चार प्रकार (उपासनेचे) (अ) १ प्रणवोपासना, २ सामोपासना, ३ अक्षिपुरुषोपासना व ४ दहरोपासना ([हरिपाठ रहस्य]). (आ) १ सम्पत् उपासना, २ आरोप उपासना, ३ अध्यास उपासना व ४ संवर्ग उपासना. "सम्पदारोपसंवर्गाध्यासा इति मनीषिभिः"([शिवगीता १२-१०]) चार प्रकारचे गण (समूह) औषधींचे (रसशास्त्र) १ रसौषधि, २ महौषधि, ३ सिद्धौषधि व ४ दिव्यौषधि. रसौषध्यो महौषध्यः सिद्धौषध्यस्तथापराः। दिव्यौषध्य इति प्रोक्ता भैरवेण चतुर्विधाः ॥ (रसेंद्र चूडामणि अ. ६) चार प्रकारचे गुण (थोर पुरुषांचे) १ विभूतिमत्त्व, २ साधुत्व, ३ सिद्धत्व आणि ४ प्रचारकत्व. ([एकनाथ दर्शन भाग १ ला]) चार प्रकार गृहस्थाचे १ वार्ताक - नित्यकर्म तत्पर, २ यायावर - अयाचित्त वृत्ति असलेला, ३ शालीन - षट्कर्मनिरत असून धनसंचय करणारा व ४ घोरसंन्यसिक - उंच्छ्रवृत्तीवर निर्वाह करणारा गृहस्थ ([ब्र. सू. शा. भा. अ.]) ३ पाद ४) चार प्रकार घोडयांचे व त्यांचीं गुणदर्शक नांवें १ अश्चवाटेल तेव्हां कामाला तयार, २ तुरंगम - त्वरेनें चालणारा, ३ वाजी - वेगवान् - वेगानें चालतो तो व ४ हय - खिंकाळत चालणारा ([सु.]) चार प्रकार जपाचे १ रसना जप, २ ओष्ठ जप, ३ श्वास जप, ४ मानसजप (Pathway to God) चार प्रकार चैतन्याचे (वेदांतशास्त्र) १ कृटस्थचैतन्य, २ जीवचैतन्य, ३ ईश्वरचैतन्य आणि ४ ब्रह्मचैतन्य. (विचार सा. रहस्य). चार प्रकार तानांचे (संगीत शास्त्र) १ सरलतान, २ मिश्र तान, ३ अलंकारित तान व ४ कूटतान. चार प्रकार दीक्षेचे (योगशास्त्र) १ स्वर्शदीक्षा, २ शब्ददीक्षा, ३ चाक्षुषी दीक्षा व ४ संकल्प दीक्षा अथवा ध्यान दीक्षा (गुरुदत्तयोग). चार प्रकार दीक्षेचे (वीरशौव) १ देहदीक्षा, २ मंत्रदीक्षा, ३ आज्ञा दीक्षा आणि ४ उपमादीक्षा ([विवेके चिंतामणि]) चार प्रकार दानाचे १ नित्य, २ नैमित्तिक, ३ काम्य व ४ विमल (निष्काम). चार प्रकारची देहशुद्धि (वैद्यक) १ वमन, २ विरेचन, ३ निरुह आणि ४ नस्य. या चार प्रकारांनीं देहशुद्धि करतां येते. चार प्रकार ध्यानाचे १ आधिभौतिक ध्यान - शालिग्राम वगैरेंचे, २ आधिदैविक - सूर्य इ. ३ आध्यात्मिक - चक्रचिंतन करणें व ४ निराकार - नादानु - संधान ([श्रीगुरुदत्तयोग]) चार प्रकारचे नायक (नाटयशास्त्र) १ धीरोदात्त, २ धीरोद्धत ३ धीरललित आणि ४ धीरप्रशांत. चार प्रकारच्या नायिका (अ) १ अनुकूला, २ दक्षिणा, ३ शठा व ४ दुष्टा. (आ) १ धीरा, २ ललिता, ३ उदात्ता व ४ निभृता ([अनंगरंग]). चार प्रकार नांवाचे १ नाक्षत्रनाम, २ मासनाम, ३ देवनाम व ४ व्यावहारिकनाम. चार प्रकारें पुरुषपरीक्षा १ शास्त्राभ्यास, २ स्वभाव, ३ कुल व ४ कर्म. तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते श्रुतेन शीलेन कुलेन कर्मणा ॥ ([सु.]) चार प्रकारचे पुरुंष राष्ट्रोद्धारास आवश्यक १ संत व साक्षात्कारी पुरुष, २ शास्त्रज्ञ व तत्त्ववेत्ते, ३ कवि वा ग्रंथकार आणि ४ शूरवीर (भक्ति - सारामृत अ. ४६) चार प्रकारची पुष्टिभक्ति पुष्टि म्हणजे ईश्वरी अनुग्रह - १ प्रवाह - पुष्टिभक्ति, २ मर्यादा - पुष्टिभक्ति, ३ पुष्टि - पुष्टिभक्ति आणि ४ शुद्ध - पुष्टिभक्ति. (वल्लभ) संप्रदाय). चार प्रकार (प्राणायामाचे) (अ) १ पूरक (श्वास वर ओढून घेणें), २ कुंभक (श्वाअस स्थिर करणें), ३ रेचक (श्वास हळूहळू खालीं सोडणें) आणि ४ शून्यक अथवा केवल कुंभक (आंतून श्वास बाहेर न सोडणें व बाहेरूनहि न घेणें.) रेचकः पूरकश्चैव कुंभकः शून्यकस्तथा। एवं चतुर्विधः प्रोक्तः प्राणायामो मनीषिभिः ॥ ([बृ. ना. पूर्व. ३३-१२०]) (आ) १ बाह्म, २ अभ्यंतर, ३ स्तंभवृत्ति आणि ४ संघटकरण (केवल) कुंभक)- प्राणगतीचा निरोध करणें ([श्रीगुरुदत्तयोग]). चार प्रकारचे महापुरुष (गीतोक्त) १ स्थितप्रज्ञ, २ त्रिगुणातीत, ३ भक्तिमान् आणि ४ निष्काम कर्मयोगी. चार प्रकारचीं पापें १ कायिक, २ वाचिक, ३ मानसिक आणि ४ सांसर्गिक. ([काशी खंड]) चार प्रकारचे प्राणी - १ अण्डज (पक्षी, मासे वगैरे), २ जारज (मनुष्य, पशु वगैरे), ३ स्वेदज (उवा, ढेकूण वगैरे) आणि ४ उद्भिज (झाडें, वेली वगैरे). या चार प्रकारच्या जीवकोटि आहेत. यांना योनिचतुष्टय म्हणतात. चार खाणी चारी वाणी। चौर्यांयशी लक्ष जीवयोनि ॥ निर्माण झाले लोक तिन्ही। पिंड ब्रह्मांड ॥ ([दा. बो. १३-३-१५]) चार प्रकारचे प्रेम १ अनुयोगी (लहानाचें मोठयावर) २ परायोगी (मोठयाचें लहानावर), ३ समयोगी - समानतेच्या दर्जावरून वाटणारें प्रेम व ४ भिन्नलिंगी - प्रकृति आणि पुरुष या नैसर्गिक भेदावर असलेलें. यालाच अनुक्रमें १ भक्ति, २ वात्यल्य, ३ सौहार्द व ४ श्रृंगार. अशा संज्ञा आहेत. (सह्मादिर एप्रिल १९५३) चार प्रकार प्रेमाचे १ लालन प्रेम, २ वात्सल्य प्रेम, ३ सख्य प्रेम व ४ माधुर्य प्रेम. व्यवहारांत तसेच अध्यात्मांत असे चार प्रकार मानले आहेत. ([ज्ञानेश्वरी गूढार्थदीपिका खंड ३]) चार प्रकारचें बल १ वीर्यबल, २ प्राणबल, ३ शरीराची बृद्धि आणि ४ पुष्टि. मनुष्यानें आपलें शरीर या चतुर्विध बळांनीं युक्त केलें पाहिजे. ([अथर्व - अनु - मराठी]). चार प्रकार भक्तिचे १ गुर्वी, २ अनन्या, ३ अव्यभिचारिणी व ४ परा."अर्जुना हे गुरुवी। भक्ति सांगीतली तुजप्रती। आतां ज्ञानयज्ञ यजिती। ते भक्त आइके ॥ ([ज्ञा. ९-२२८]) चार प्रकार भक्तांचे १ आर्त - ध्रुव, २ जिज्ञासु - उद्धव ३ अर्थाथीं - बिभीषण व ४ ज्ञानी - शुकाचार्य ([भ. गी. ७-१६]) चार प्रकार मानवी रक्ताचे १ अ, २ अब, व ४ ओ असे चार प्रकार मानवी रक्ताचे असतात. (लॅन्डस्लीनर. १९-७) चार प्रकार मित्राचे १ औरस पुत्र, २ संबंधी - नातलग बगैरे, ३ पिढिजाद मैत्री असलेला व ४ संकट निवारण करणारा. असे मित्राचे अथवा मित्रात्वाचे चार प्रकार. "औरसं कृतसम्बन्धं तथा वंशक्रमागतम् । रक्षितं व्यसनेभ्यश्च मित्रं ज्ञेयं चतुर्विधम् "(कार्मदकीय नीतिसार) चार प्रकारची माणसें १ विशाल ह्रदय - आपण न खातां दुसर्यास देतो तो, २ उदार ह्रदय - आपण खातो व दुसर्यासहि देतो, ३ अनुदार ह्रदय - आपण खातो पण दुसर्यास देत नाहीं तो आणि ४ कृपणा ह्रदय - आपणहि खात नाहीं व दुसर्यासहि देत नाहीं असा. ([कल्याण मासिक]) चार प्रकार मंत्रांचे १ सिद्ध, २ साध्य, ३ सुसिद्ध आणि ४ अरिउच्चाटन (नाम चिंतामणि). चार प्रकारचे मेघ १ आवर्त - विशेषस्थानीं वृष्टि, २ संवर्त - सर्वत्र वृष्टि, ३ पुष्कर - अल्प पर्यन्य व ४ द्रोण - विपुल पर्जन्य. ([कृषिपाराशर - २४-२६]) चार प्रकार योगाचे १ मंत्रयोग, २ हठयोग, ३ लययोग आणि ४ राजयोग ([शिवसंहिता]). चार प्रकारचे लोक (अ) १ कर्मी, २ भक्त, ३ ज्ञानी व ४ योगी. 'कर्मिणः सन्ति भक्ताश्च ज्ञानिनो योगिनस्तथा ॥' ([रा. गी. ११-३]) (आ) १ दुर्जन, २ मतलबी, ३ सज्जन आणि ४ संत. दुर्जन रत संसारी। मतलबी कामापुरता धरी। सज्जन त्याचा विचार करी। संत त्यागी सर्वथा ॥ (भ. सा. १७-६४) (इ) १ सत्पुरुष- स्वार्थ सोडून लोकांचें कल्याण करणारे, २ सामान्य - स्वार्थ स सोडतां लोकांसाठीं झटणारे, ३ मानवराक्षस - स्वर्थासाठीं लोकांचे नुकसान करणारे व ४ पशुराक्षस - सार्थहि नसतां दुसर्याची निरर्थक हानि करणारे. असे चार प्रकारचे लोक जगांत असतात. एते सत्पुरुषाः परार्थघटकाः स्वार्थं परित्यज्य ये। सामान्यास्तु परार्थमुद्यमभृतः स्वार्थाविरोधेन ये ॥ तेऽमी मानुषराक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये। ये निघ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे ॥ ([भ. नी. ८४]) चार प्रकारचें वर्षमान (कालगणना) १ चांद्रवर्ष, २ सौरवर्ष, ३ नाक्षत्रवर्ष आणि ४ सायन अथवा संपातवर्ष. चार प्रकारचे वाद १ आरम्भवाद - हा काणादांचा पक्ष - नैयायिक मीमांसक वगैरे, २ संघातवाद - हा बौद्धांचा पक्ष, ३ परिणामवाद - सांख्य, पातंजल वगैरेंचा पक्ष आणि ४ विवर्तवाद किंवा मायावाद - अद्वैत वेदान्त्यांचा पक्ष. चार प्रकारचीं वाद्यें १ तंत - तारेचीं वाद्यें, २ वितंत - टाळ, चिपळ्या वगैरे, ३ घन - नगारा, डफ वगैरे व ४ सुस्वर - सनई वगैरे. चार प्रकार वानप्रस्थाचे १ वैखानस, २ औदुंवर, ३ वालखिल्य व ४ फेनपा ([ब्र. सू. शां. भाष्य - अ ३ पाद ४]) चार प्रकार विदूषकाचे १ तापस, २ द्विज, ३ राजजीवि आणि ४ शिष्य ([भ. ना.]) चार प्रकारचे वैद्य १ विषवैद्य, २ शाल्यवैद्य, ३ रोगवैद्य आणि ४ कृत्यावैद्य, असे चार प्रकारचे वैद्य राजानें जवळ बाळगावेत. चतुर्विधांश्व वैद्यान्वै संगृह्णीयाद्विशेषतः। ([म. भा. शांति]) चार प्रकारचें वैराग्य (अ) १ यतमान वैराग्य, २ व्यतिरेक वैराग्य, ३ एकेन्द्रिय वैराग्य व ४ वशीकार वैराग्य. (आ) १ भयजनित वैराग्य, २ विचारजनित वैराग्य, ३ साधनयुक्त वैराग्य आणि ४ ज्ञानजनित वैराग्य. सविरागः पुराणेषु चतुर्धा सम्प्रकीर्तितः यतमानवशीकारव्यतिरेकादिभेदतः ॥ ([सु.]) चार प्रकारची वैद्याची वृत्ति असावी १ रोग्याविषयीं ममता. २ दया, ३ साधा रोग वरा करण्याचा उत्साह व ४ रोग असाध्य असेल तर (अगोदरच) सोडणें, अशी वैद्याची वृत्ति असावी. मैत्री कारुण्यमार्तेषु शक्ये प्रीतिरुपेक्षणम् । प्रकृतिस्थेषु भूतेषु वैद्यवृत्तिश्वतुर्विधा ॥ (च. सू. ९-२४) चार प्रकार व्यूहाचे (सैन्यरचनेचे) १ मानुष, २ दैव, ३ गांधर्व व ४ आसुर. असे चार प्रकार भारतकालीं होते. ([म. भा. भीष्म १९-२]) चार प्रकार शास्त्र वचनाचे १ भयानक, २ रोचक, ३ अनुवाद व ४ तथार्थ (बोधामृत). चार प्रकारची स्त्रीपुरुषांची प्रीति १ नैसर्गि - स्वाभाविकपणें, २ विषयजा - पुष्पमाला, मेवामिठाई वगैरेमुळें, ३ समा - ललितकला वगैरेमुळें जडणारी आणि ४ अभ्यासजा - परस्परांच्या सारख्या संवयीनें व आवडी निवडीमुळें जडणारी ([अनंगरंग]). चार प्रकारची शुचिता १ द्रव्यशौच, २ मनःशौच, ३ बाक्शौच आणि ४ कामशौच. चार प्रकार शैवांचे १ सामान्यशैव, २ मिश्रशैव, ३ शुद्धशैव व ४ वीरशैव. (वीरशैवान्वय चंद्रिका) चार प्रकारची सिद्धावस्था १ स्वप्रसिद्ध, २ मंत्रसिद्ध, ३ दैवसिद्ध आणि ४ नित्यसिद्ध (श्रीरामकृष्ण वाक्सुधा) चार प्रकार सूत्र ग्रंथांचे १ श्रौतसूत्रें, २ गृह्मसूत्रें, ३ धर्मसूत्रें व ४ शुल्बसूत्रें - यज्ञकर्म. चार प्रकार श्रद्धेचे १ अध्यात्मश्रद्धा, २ कर्मश्रद्धा, ३ तामसीश्रद्धा व ४ निर्गुणश्रद्धा ([ए. भा. अ. २५ ओंवी ३५१ ते ३६८]) चार प्रकारें सुवर्णपरीक्षा १ कसोटीवर घासून, २ कापून, ३ तापवून व ४ हातोडीनें ठोकून, अशा चार प्रकारानीं करतां येते. चार प्रकारचा संन्यास १ विद्धत् , २ विविदिषा ३ मर्कट व ४ आतुर (स्वामी - विवेकानंदांच्या सहवासांत) चार प्रकारची संन्यासदीक्षा १ कुटीचक (आश्रमविहित कर्म करणारा), २ बहूदक करणारा) व ४ परमहंस (ब्रह्मज्ञानी झालेला). 'दीक्षा असे ही चतुर्विध' (गुरु - ली १३-२४) ([विष्णु ४-११]) चार प्रकारचे संबंध १ संयोगसंबंध, २ समवायसंबंध, ३ तादात्म्यसंबंध व ४ भेदाभेद संबंध (वैशिषिक शास्त्र) चार प्रकारचे समास १ अव्ययीभाव, २ तत्पुरुष, ३ बहुव्रीहि आणि ४ द्वंद्व. (व्याकरण शास्त्र) चार प्रकारचे संवाद (ज्ञानेश्वरी ग्रंथांतर्गत) १ श्रीकृष्णार्जुनसंवाद, २ धृतराष्ट्र - संजय, ३ श्रीज्ञानेश्वर - निवृत्तीनाथ आणि ४ श्रीगुरुखेरीज इतर श्रोते असे चार प्रकारचे संवाद ज्ञानेश्वरींत वर्णिले आहेत. चार प्रकारचीं स्त्रियांचीं भूषणें १ केशभूषा, २ वेशभूषा, ३ वस्त्रप्रावरण आणि ४ विलेपन (अंगाला उटी लावणें). कचधार्यं देहधार्यं परिधेयं विलेपनम् । चतुर्धा भूषणं प्राहुः स्त्रीणामन्यच्च दैशिकम्॥ (ससाकर) चार प्रकारचें ज्ञान १ शब्दज्ञान, २ अपरोक्षज्ञान, ३ सामान्यज्ञान व ४ विशेषज्ञान. चार प्रमाणें १ स्मृति, २ प्रत्यक्ष, ३ इतिहास व ४ अनुमान. स्मृतिः प्रत्यक्षमैतिह्मम । अनुमानश्चतुष्टयम ॥ ([तै, आ. १-२]) चार प्रमुख तत्त्वें (झरतुष्ट्री धर्माचीं) १ अहुरमज्द हा सर्वश्रेष्ठ देव व सर्वज्ञ, २ आत्मा अमर आहे, ३ विचार, उच्चार आणि आचार यांना आपणच जबाबदार मानणें व ४ असद् विचार, अपशब्द आणि कुकर्में यांचा शपथपूर्वक त्याग. (गुजरात) चार प्रमुख शिष्य श्री मध्वाचार्यांचे १ पद्म्नाभतीर्थ, २ नरहरितीथे, ३ माधवतीर्थ व ४ अक्षोभ्यतीर्थ. चार प्रमुख शिष्य व्यासांचे १ वैशंपायन, २ पैल, ३ जैमिनि व ४ सुमन्तु. 'सुमन्तुश्चेति चत्वारो व्यासशिष्या महौजसः' ([शिव - कैलास - अ. २३]) चार प्रमुख प्रकार पर्वतांचे १ वलीपर्वत किंवा घडीचे पर्वत, २ गठ पर्वत ३ अवशिष्ट पर्वत व ४ संचय पर्वत (सुलभ - विज्ञान). चार प्रमुख विचार प्रवाह 'भारतीय' तत्त्व प्रतिपादनाचे १ जडाद्वैतपक्ष, २ शून्यवाद, ३ द्वैतवाद व ४ अद्वैतवाद. विविधविचार प्रवाहांची एकूण संख्या सुमारें ३८४ होती असें म्हणतात. त्यांतले हे चार प्रमुख होत. ([ब्रह्मसूत्रभाष्य - प्रस्तावना]) चार प्रमुख शिष्य श्रीशंकाराचार्यांचे १ पद्मपादाचार्य, २ चित्सुखाचार्य, ३ आनंदगिरि व ४ सुरेश्वराचार्य. चार प्रलय १ नित्य, २ नैमित्तिक, ३ प्राकृतिक व ४ आत्यंतिक. ([दु. श. को.]) चार बहुमोल रत्नें १ सवत्स कामधेनु, २ सुंदरस पलंग, ३ रत्नजडित दीप व ४ नागवेलीचीं पानें, हीं चार रत्नें पाताळलोकच्या राजा वासुकीनें भूलोकींच्या राजा उदयनाला आपल्या कन्येच्या विवाहप्रसंगीं हुंडा म्हणून दिलीं अशी कथा आहे. (प्र. को.) चार ब्रह्मवेत्ते १ श्रीदत्तात्रेय, २ शुकाचार्य, ३ कपिलमुनि व ४ याज्ञवल्क्य, हे चार महान् ब्रह्मवेत्ते होऊन गेले. चार ब्रह्मदेवाचे मानसपुत्र १ सनक, २ सनन्दन, ३ सनातन आणि ४ सनत्कुमार हे चार ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ज्ञानी असून ते नैष्ठिक ब्रह्यचारी होते. ([भाग स्कंद ३ अ. १२-४]) चार बौद्ध क्षेत्रें व त्यांची चार प्रतीकें १ कपिलवस्तु - जन्मस्थान - छत्रीधारी घोडा. २ बुद्धगया - ज्ञानप्राति - बोधिवृक्ष, ३ सारनाथ - पहिले प्रवचन दिलें - धर्मचक्र. व ४ कुशीनगर - निर्याणस्थान - स्तूप. चार 'म' कार स्वभावसिद्धच असावे लागतात १ मन, २ मनगट, ३ मेंदु आणि ४ माणुसकी. हे रक्तांत म्हणजे स्वभावांतच असावे लागतात. चार मठ श्रीशंकराचार्यांचे १ श्रृंगेरी मठ (दक्षिणाम्नाय) सांप्रदाय - भूरीवार, वेद - कृष्णयजु, तीर्थ - तुंगभद्रा, २ गोवर्धन मठ (जगन्नाथपुरी पूर्वाग्नाय) भोगवार, ऋग्वेद, महोदधी. ३ बदरीनारायण (उत्तराम्नाय) आनंदवार, अथर्वण, अलकनंदा आणि ४ द्वारकामट (पश्चिमाम्नाय) कीटवार सामवेद गोमतीतीर्थ. (शंकराचार्य - चरित्र अ. ३४) चार मतें (गायनाचीं) १ शिवमत, २ ब्रह्ममत, ३ पिंगल नागमत व ४ हनुमंतमत. चार महर्षि शैव शास्त्र सिद्धान्त प्रवचनकार १ रुद्र, २ दधीच, ३ अगस्त्य आणि ४ उपमन्यु ([शिव. प. वा. संहिता अ. ३२]) चार मार्ग आध्यात्मिक उन्नतीचे (शैवपंथ) १ दासमार्ग - पूजा वगैरे बाह्मोपचार करणें, २ क्रिया अथवा सत्पुत्रमार्ग - पुत्राप्रमाणें ईश्वसेवा करणें, ३ योगमार्ग - मानस पूजा व ध्यानधारणा आणि ४ सन्मार्ग ज्ञानमार्ग. (प्रसाद जुन १९६३). चार मार्ग (महम्मादीय) १ शरीयत - कर्ममार्ग, २ तरीकत् - उपासनामार्ग ३ हकीकत् - योगमार्ग आणि ४ मारफत् - ज्ञानमार्ग ([पंचग्रंथी]). चार महावाक्यें (भक्तिमार्गाचीं) १ कृष्णस्तु भगवान् स्वयम, २ मत्तःपरतरं नान्यत् , ३ ब्रह्मणे प्रतिष्ठाहम व ४ मामेकं शरणं ब्रज. ([भागवत]) चार महावाक्यें (वेदान्ताचीं) १ प्रज्ञानं ब्रह्म ([ऋग्वेद]), २ अहं ब्रह्मासिस्म ([यजुर्वेद]), ३ तत्त्वमसि ([सामवेद]) व ४ अयमात्मा ब्रह्म ([अथर्ववेद]). चार मानें (परिमाण विश्चिति अथवा वजन लांबी इ. यांचें माप) १ डावे - उजवें, २ मागेंपुढें, ३ वर - खालीं आणि ४ आधीं - नंतर. (पंचागांतील ज्योतिःशास्त्र.) चार मास तीर्थसद्दश अभीष्ट फल देणारे १ आषाद, २ कार्तिक, ३ माघ व ४ वैशाख. तत्राषाढः कार्तिकश्चा माघो वैशाख एव च। तीर्थान्युक्तानि मासा वै चत्वारोऽभीष्टदायकाः ॥ ([कल्याण - तीर्थांक.]) चार मित्र १ विद्या - प्रवासांत, २ पत्नी - घरीं, ३ औषध - व्याधि - ग्रस्तावस्थेंत आणि ४ धर्म - अंतसमयीं. विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च। व्याधितस्योषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च ॥ ([सु.]) चार मुक्तिस्थानें १ ब्रह्मज्ञान, २ गयाश्राद्ध, ३ गाईच्या गोठय़ांत मरण आणि ४ कुरुक्षेत्रनिवास. ब्रह्मज्ञानं गयाश्राद्धं गोगृहे मरणं तथा। वासः पुंसां कुरुक्षेत्रे मुक्तिरेषा चतुर्विधा ॥ (गयामहात्म्य) चार मुद्रा (अ) १ खेचरी, २ भूवरी, ३ चांचरी आणि ४ अगोचरी ; (आ) १ ध्यान, २ राधायंत्र, ३ षण्मुखी आणि ४ शांमवी. चार मूळ गोत्रें १ अंगिरस, २ कश्यप, ३ वसिष्ठ व ४ भृगु. मूलगोत्राणि चत्वारि समुत्पन्नानि भारत। अङ्रिराः कश्यपश्वैव वसिष्ठो भृगुरेव च ॥ ([म. भा. शांति २९६-१७]) चार मोक्षद्वाराचे द्वारपाल १ शम, २ विवेक, ३ संतोष व ४ साधु - समागम. 'शमो विचाः संतोषश्चतुर्थः साधुसंगमः' ([सु.]) चार युगें (अ) १ कृतयुग - आरंम काल -"कार्तिक शु० ९ " २ त्रेतायुग -"वैशाख शु० ३" ३ द्वापरयुग -"माधव - ३०" ४ कलीयुग -"भाद्रपद व० १२" (शिवनिबंध) आद्यं कृतयुगं प्रोक्तं ततस्त्रेतायुगं बुधैः। तृतीयं द्वापरे पार्थ चतुर्थं कलिरुच्यते ॥ (कुर्म २९-९) (आ) १ सुवर्णयुग, २ रजतयुग, ३ ब्राँझयुग आणि ४ लोहयुग (ऑगस्टीन कालगणना). चार युगांतील चार अवतार (महानुभाव) १ दत्त (कृत), २ इंस (त्रेता), ३ कृष्ण (द्वापर) आणि ४ प्रशांत (कलियुग - व्हावयाचा आहे.) चार युगाचे चार स्मृतिकार १ कृतयुग - मनु, २ त्रेतायुग - गौतम, ३ द्वापर - शंखलिखित आणि ४ कलियुग - पराशर ([प्रा. च. को.]) चार युगांतील चार प्रकारचा धर्म १ कृत - तपःप्रधान, २ त्रेत - ज्ञानप्रधान, ३ द्वापर - यज्ञप्रधान आणि ४ कलि - दानप्रधान ([म. भा. शांति ३-२३१]). चार युगांतील प्राणांचीं चार स्थानें १ कृत अथवा सत्य युग - अस्थीमध्यें, २ त्रेता - मांसांत, ३ द्वापर - रक्तांत व ४ कलियुग - अन्नांत -(पराशर). चार योगभूमिका १ वाणील्य, २ मनोलय, ३ बुद्धिलय व ४ अहंकारलय. (विचारचंद्रोदय) चार रत्नें १ सूर्य - आकाशांत, २ बालक - घरीं, ३ स्त्री - शयनप्रसंगीं व ४ पडित - समेमध्यें. आकाशे रविरत्नानि गृहरत्नानि बालकः। शयने स्त्रीरत्नानि सभारत्नानि पंडितः ॥ ([सु.]) चार श्रेष्ठ दानें १ कन्यादान, २ गोदान, ३ भूमिदान आणि ४ विद्यादान. दानानां च समास्तानां चत्वार्येतानि भूतले। श्रेष्ठानि कन्यागोभूमिविद्यादानानि सर्वदा (शं. सं.) चार लक्षणें (ईशदर्शन झाल्याचीं) १ बालवत्, २ पिशाचवत्, ३ जडवत् आणि ४ उन्मत्तवत् . ज्याअ व्यक्तीला ईशदर्शन झालें ती अशा चार लक्षणांनीं युक्त होऊन जाते. ([भागवत]) चार लक्षणें (खर्या ज्ञान्याचीं) १ वाणी गोड असून उदार, २ ज्ञान असून गर्व नाहीं, ३ शूर असून अंगीं क्षमा आणि ४ अमूप धन तसेंच अपार औदार्य. या चौलक्षणीं मंडित। तोचि ज्ञानि तोचि पंडित ॥ (वेदान्तसूर्य) चार लक्षणें (शिष्टाचाराचीं) १ गुरुशुश्रूषा, २ सत्य, ३ अक्रोध आणि ४ दान. हीं चार शिष्टाचाराचीं निय्त लक्षणें होत. गुरुशुश्रूषणं सत्यमक्रोधो दानमेव च। एतच्चतुष्ठय ब्रह्मन शिष्ठाचारेषु नित्यदा ॥ ([म. भा. वन. २०७-६५]). चार ललितकला १ नृत्य, २ नाटय, ३ गायन व ४ वादन. चार लोक १ स्वर्ग, २ मृत्यु, ३ पाताळ आणि ४ कैलास. चार वर्ण १ ब्राह्मण, २ क्षत्रिय, ३ बैश्य व ४ शुद्र. मूळ एका वर्णाचेच हे चार वर्ण म्हणजे चातुर्वर्ण्य महाभारतकाळीं करण्यांत आले. "चत्वारो वै वर्णाः ब्राह्मणो राजन्यो बैश्यः शुद्धः।"([शतपथ]) हे चार वर्ण म्हणजे चार प्रकारच्या शक्ती होत. १ शिक्षकशक्ति - ब्राह्मण, २ रक्षकशक्ति - क्षत्रिय, ३ पोषकशक्ति - बैश्य वा ४ सेवकशक्ति - शूद्र. राष्ट्राच्या सोयीसाठीं या चार प्रकारच्या शक्तींची आवश्यकता असते. ([वा. रामायणाचें निरीक्षण - पं. सातवळेकर]) चार वर्ण (मुसलमानांत) १ सय्यद, २ शेख, ३ मोंगल व ४ पठाण. असे चार वर्ण मुसलमानांत मानतात. चातुर्वर्ण्य वैदिक धर्माप्रमाणें निरनिराळ्या समाजांत, निरनिराळ्या नांवाखालीं चातुर्वर्ण्यात्मक समाजरचना प्रचलित आहे. ती अशी - (अ) १ प्रीस्ट, २ सोल्जर, ३ मर्चंट व ४ वर्कंमन (इंग्रज) (आ) १ अलिम्, २ आमिल, ३ ताज्जिर व ४ मजदूर. (महम्मदी) (इ) १ अथर्वन्, २ अरथस्तार, ३ वस्त्र्य आणि ४ हूविश. (पारसीक) (ई) १ शोगुन्, २ समूरा, ३ हैमिन् इ. (जपानी) अशा प्रकारचे चातुर्वर्ण्य सर्वत्र आढळतें. ([मानवधर्मसार]) चार वर्णांचीं चार दैवतें १ ब्राह्मण - महादेव, २ क्षत्रिय - विष्णु, वैदय - ब्रह्मदेव व ४ शूद्र - गणेश. विप्राणां दैवतं शम्भुः क्षत्रियाणां च माधवः। वैश्यानां तु भवेद ब्रह्मा शूद्राणां गणनायकः ॥ ([सु.]) चार वर्णांचे चार यज्ञ १ ब्राह्मण - तप, २ क्षत्रिय - उद्योग, ३ वैश्य - हवि व ४ शूद्र - सेवा. असे चार प्रकारचे यज्ञ चार वर्णांस विहित आहेत. ([म. भा. शांति २३९-१००]). चार वर्णांचे चार सण १ ब्राह्मण - श्रावणी, २ क्षत्रिय - विजया - दशमी (दसरा), ३ वैश्य - दिवाळी व ४ शूद्र - होळी. चार वस्तूंवर कोणाचेंहि एकाचें स्वामित्व नाहीं १ अरण्य, नद्या, ३ पर्वत व ४ तीर्थें. यांवर कोणाचेंहि एकाचें स्वामित्व नसतें. ([म. भा. अनु. ६९-३४]) चार वाटेकरी धनाचे १ धर्म, २ अग्नि, ३ राजा (शासन), व ४ तस्कर (चोर) असे धनाचे चार वांटेकरी होत. "चत्वारो धनदायादा धर्म्राग्निनृपतस्कराः ([सु.]) चार वस्तु दुःखाचा विसर पाडणार्या (अ) १ मद्य, २ हिरवळ, ३ नदीचा प्रवाह व ४ सुंदर मुख. (आ) १ नमाज, २ रोजा, ३ माता आणि ४ तोबा (झेबुन्निसा,) (अमृत जुलै १९६२) चार वाणी १ परा, २ पश्यन्ती, ३ मध्यमा व ४ वैखरी, या चार वाणी आहेत. यांना वाचाचतुष्टय म्हणतात. आतां ज्ञानदेवो म्हणे। श्रीगुरूप्रमाणें येणें। फेडिली वाचा ऋणें। चौही वाकांची ॥ ([अमृतानुभव]) चार वाचिक पापें १ कठोर भाषण, २ खोटें बोलणें, ३ चहाडी आणि ४ अद्वातद्वा बोलणें. हीं वाणीचीं चार पापें होत. ([स्कंद - काशी. २७-१५३]) चार विद्या १ तर्कशास्त्र, २ वेदविद्या, ३ कृषिकर्मादि अर्थशास्त्र आणि ४ सामदामदंडादि राजनीति. ([कौ. १-२]) चार वेद १ ऋग्वेद, २ यजुर्वेद, ३ सामवेद, आणि ४ अथर्ववेद. आणि नाटय हा पांचवा वेदच असें भर्त नाटय शास्त्रांत म्हटलें आहे. सर्वशास्त्रसंपन्नं सर्व शिल्पप्रवर्तकम् । नाटयाख्यं पंचमं वेदं सेतिहासं करोम्यहम् ॥ ([भ. ना. अ १]) चार विकथा १ भक्तकथा, २ स्त्रीकथाअ, ३ राजकथा व ४ देशकथा. ([रत्नकरंडक श्रावकाचार अ ३]) चार वेद (महाराष्ट्राचे) १ श्रीज्ञानेश्वरी, २ एकनाथी भागवत, ३ दासवोध व ४ तुकारामगाथा. चार वेदांचीं उपांगें १ पुराणें, २ न्याय, ३ मीमांसा व ४ धर्मशास्त्र. चार वेदांचे चार द्रष्टे १ ऋग्वेद - अग्निऋषि, २ यजुर्वेद - वायुऋषि, ३ सामवेद - आदित्यऋषि व ४ अथर्ववेद - अंगिरसऋषि. ([The wisdom of India]) चार वैष्णव संप्रदाय १ प्रकाशसंप्रदाय (श्रीज्ञानेश्वर), २ आनंद - संप्रदाय ([एकनाथ]), ३ स्वरूपसंप्रदाय ([रामदास]) व ४ चैतन्यसंप्रदाय ([तुकाराम]). असे परमार्थमार्गांत चार प्रकारचे वैष्णव संप्रदाय मानले आहेत. त्यांस वारकरीचतुष्टय म्हणतात. ([अमृता - अमृतवाहिनी टीका]) चार वंश १ सोमवंश - यादव, २ सुर्यवंश - श्रीरामचंद्रचा, ३ ब्रह्मवंश व ४ शेषवंश, असे चार वंश पुराणांत वर्णिले आहेत. (चंडमाहात्म्य) चार व्यसनें सत्ताधार्यांना असणारीं १ मृगया, २ मद्यपान, ३ द्यूत व ४ अतिरिक्त कामासक्ति ([म. भा. सभा. ६८-२०]). चार व्यास १ वृद्धव्यास,- याचे चार ब्राह्मण सोळा अध्याय, २ बृह्दव्यास - याची चार अरण्यें वीस अध्याय, ३ वेदव्यास - याच्या चार संहिता चोवीस अध्याय आणि ४ मानवव्यास - याचीं महाभारत अठरा पुराणें व इतिहास. ([दर्शनप्रकाश]) चार व्यृह (रचना) वर्णाश्रमात्मक १ शिक्षाव्यूह, २ रक्षाव्यूह, ३ वार्ताव्य़ूह आणि ४ सोवाव्यूह. ([मानवधर्मसार]) चार वृत्ति अंतःकरणाच्या १ मन - कल्पनांना आंत घेतें, २ चित्त - त्यांची निवड करतें, ३ अहंकार - कल्पनेचा पक्ष घेतो आणि ४ बुद्धि - निश्चय करते. या चार वृत्ति वेदांतांत मानिल्या आहेत. ([मानवधर्मसार]) चार शक्तित १ क्रियाशक्ति, २ द्वव्यशक्ति, ३ इच्छाशक्ति व ४ ज्ञानशक्ति. ([दा. बो. १७-९-६]) चार शक्ति अथवा विश्व देवता १ महेश्वरी, २ महाकाली, ३ महालक्ष्मी व ४ महासरस्वती. (अरविंद के पत्र) चार शिष्य येशूख्रिस्ताचे १ मॅथ्यू, २ मार्क, ३ ल्यूक व ४ जॉन. या चौघांनी 'गॉस्पेल' नांवाचे ग्रंथ लिहिले आहेत. चार शक्ति राष्टू जिवंत राहण्यास आवश्यक १ शिक्षक - शाक्ति - ब्राह्मण, २ रक्षकशक्ति - क्षत्रिय, ३ पोषशक्तित - वैश्य, आणि ४ सेवक - शक्ति - शूद्र. ([वा. रा. समालोचना]) चार शिष्यप्रकार बुद्धाचे १ माध्यमिक, २ योगाचार, ३ सौत्रां - तिक व ४ वैभाषिक, ([भारतीयदर्शन संग्रह]) चार शैली (रचनाप्रकार) निबंधवाङ्वयाच्या १ कैशिकी, २ भारती, ३ सात्वती आणि ४ आरमटी. (साहित्य) ([आपटेकोश]) चार शून्यें १ ऊर्ध्वशून्य, २ अधःशून्य, ३ मध्यशून्य व ४ ब्रह्म. ऊर्ध्वशून्यं मनोभूतं अधःशून्यं तु मारुतः। मध्यशून्यं जीवभूतं चतुर्थं ब्रह्म उत्तमम् ॥ ([सु.]) प्रपंचाचा रोविला वेळू। चहूं शून्याचा मांडिला खेळू ॥ (सकलसंतगाथा) चार स्त्रिया परमसिद्धीला प्राप्त झाल्या १ मैत्रेयी, २ सुलमा, ३ शाङ्गीं व ४ शांडिली. या चौघी पूर्वजन्मांतील पुण्याईनें परमसिद्धीला प्राप्त झाल्या. मैत्रेयी सुलभा शाङ्गीं शांडिली च तपस्विनी। स्त्रीत्वे प्राप्ताः परां सिद्धिमन्यजन्मसमाधितः ॥ ([योगचिंतामणि]) चार संस्कार १ संयम, २ सेवा, ३ साधना आणि ४ सज्जन - समागम. संयम सेवा साधना सत्पुरुषोंका संग। ये चारो करते तुरन्त मोहनिशाको भंग ॥ ([कल्याण मासिक]) चार संगीत मतें १ नारदमत संगीत, २ भरतमत - संगीत, ३ हनुमन्तमत - संगीत व ४ श्रीकृष्णमत - संगीत असे चार प्रकार आहेत. चार साधनें अंतर्मल विनाशाचीं १ श्रीहरिस्मरण, २ हरीतकी - भक्षण (हिरडा), ३ गायत्री जप व ४ गंगाजल - पान. या चार गोष्टी उक्त मानिल्या आहेत. हरिं हरीतकीं चैव गायत्री जाह्लवीजलम् । अन्तर्मलविनाशाय स्मरेत् भक्षेत् जपेत् पिबेत् ॥ (जीवनविकास) चार साधनें जनतासंपर्काची १ संचार, २ संपर्क, ३ संवाद व ४ संघटना. (इंद्रायणी दि. अंक १९६२) चार साधनें मोक्षाचा अधिकारी होण्याचीं १ नित्यानित्यवस्नु - विवेक, २ इहामुत्रफलभोगविराग - सांसारिकसुखाविषयीं वैराग्य, ३ शमादिषट् - संपत्ति व ४ मुमुक्षुत्व (वेदांतशास्त्र ब्रह्मसूत्रें अ १) चार संस्था संस्कार करणार्या १ घर, २ शिक्षणसंस्था, ३ सामाजिक अथवा बाह्म वातावरण आणि ४ परिस्थिति. (माहेर मासिक) चार संप्रदाय विष्णवांचे १ ब्रह्म, २ सनक, ३ श्री व ४ रुद. ([पद्मपुराण]) चार संप्रदाय शैवांचे १ शैव, २ पाशुपत, ३ कारुणिक - सिद्धान्ती व ४ कापालिक. चार संप्रदाय सुफी पंथाचे १ चिस्ती, २ प्रकाशबंदी, ३ सुहरावर्दी व ४ काद्री (सुफी संप्रदाय) चार स्वर (गायनांत) १ वादी - राजा, २ संवादी - प्रधान, ३ अवादी - सरदार व ४ व्याधी - शुत्र. (द्रु. श. को.) चार स्वातंत्र्यें १ व्यक्तिस्वातंत्र्य, २ धर्मस्वातंत्र्य, ३ भाषण - स्वातंत्र्य व ४ मुद्रणस्वातंत्र्य. हीं आधुनिक काळचीं चार स्वातंत्र्यें लोक - शाहीचीम मूलभूत तत्त्वें म्हणून मानिलीं आहेत. चार श्रेष्ठ आसनें १ सिद्धासन, २ पद्मासन, ३ सिंहासन व ४ भद्रासन (गोरक्षासन). योगशास्त्रांतील चौर्यायशीं आसनांत हीं चार आसनें श्रेष्ठ होत. चार श्रेष्ठ शक्ति (लोकशाहींतील) १ राष्ट्रपति, २ राज्यसभा, ३ संसद् (लोकसभा) व ४ वृत्तपत्रें. चार सिद्ध आदेश १ पुराणें, २ मानवधर्म, ३ सांगवेद आणि ४ वैद्यक, या चार गोष्टी सिद्ध म्हणजे अबाधित आज्ञा होत. त्या टाळून चालावयाचें नाहीं. पुराणं मानवो धर्मः साङ्रो वेदश्चिकित्सितम् । आज्ञासिद्धानि चत्वारि न हातव्यानि हेतुभिः ॥ (वि. स्मृ.) चार स्थानें मुक्तिप्रद १ गयाश्राद्ध, २ ब्रह्मज्ञान, ३ गाईच्या गोठयांत मरण व ४ कुरुक्षेत्री निवास. ([करवीरमाहात्म्य अ८]) चार स्थानीं कृष्णास्त्रान दुर्लभ १ शूर्पालय, २ मलप्रभा व कृष्णासंगम, ३ छाया (भगवती) या नांवाचें एक तीर्थ (छाया भगवती - कृष्णा संगम - विजापूर पासून १० मैलावर तंगडगी जवळ.) आणि ४ श्रीशैल. शूर्पाले संगमे चैव छायायां श्रीगुरौ तथा। सर्वत्र सुलभा कृष्णा चतुःस्थानेषु दुर्लभा ॥ (कृ. मा. ५४-८) चार स्थानीं कुंभमेळा १ हरद्वार, २ प्रयाग, ३ उज्जयिनी व ४ नाशिक, समुद्रमंथनांतुन निघालेला अमृतकुंभ या चार ठिकाणीं १ चंद्र, २ बृहस्पति, ३ शनि व ४ सूर्य या चौघांच्या संरक्षणाखालीं बारा दिवसपर्यंत दडवून ठेवला होता. तन्निमेत्त पुराणकालापासून भारतांत प्रचलित असलेली मोठी यात्रा. (केसरी जानेवारी १९५६) चौघेजण कोणत्याहि कार्याच्या चांगल्यावाईटाचे समभागी होत १ प्रत्यक्ष करणारा, २ तें करविणारा, ३ जवळ असून पाहणारा आणि ४ अनुमोदन देणारा. कर्ता कारयिता चैव प्रेषको ह्मनुमोदकः। सुकृतं दुष्कृतं चैव चत्वारः समाभागिनः ॥ ([सु.]) चार स्थानीं मुंडण व उपोषण वर्ज १ विरजक्षेत्र, २ कुरुक्षेत्र. ३ विशालतीर्थ व ४ गया क्षेत्र. ([करवीर महात्म्य अ ८]) चौघांची खरी ओळख चार अवस्थेंत होते १ विपत्काळांत मित्राची, २ दारिद्यसमयीं स्त्रीची, ३ युद्धांत विरांची आणि ४ अपकीर्तींत बांधवांची. चौघेजणच चक्रव्यूहाचा भेद जाणणारे १ श्रीकृष्ण, २ अर्जुन, ३ प्रद्युम्न व ४ अभिमन्यु. हे चार जणच चक्रव्यूहाचा भेद जाणणारे महाभारतकालीं होते. चौघेजण थट्टेपासून मुक्त १ शुक, २ भीष्म, ३ हनुमान् आणि ४ कार्तिकस्वामी. थट्टेपासून सुटले चौघेजण। शुक भीष्म आणि हनुमान। चौथा कार्तिकस्वामी जाण ॥ त्याला नाहीं बट्टा। अशी ही थट्टा। भल्याभल्यासी लाविला बट्टा ॥ ([एकनाथ]) चौघेजण ब्रह्महत्त्येच्या पापाचे वाटेकरी १ भूमि, २ उदक, ३ वृक्ष आणि ४ स्त्रिया. इंद्रानें ब्रह्महत्त्येचा लोकापवाद दूर करण्याकरितां ती ब्रह्महत्त्या चार भाग करून या चौघांना वांटून दिली व ती त्यांनीं कांहीं अटीवर ग्रहण केली अशी कथा आहे. ([भाग - स्कंध ६ अ ९-७]) चौघांशीं मसलत करूं नये १ मंदमति, २ चेंगट, ३ हर्षानें हुरळून जाणारा आणि ४ स्तुतिपाठक. ([म. भा. उद्योग ३३-६९]) चौघेजण आश्रयास पात्र १ वृद्ध नातेवाईक, २ खालावलेला कुलीन मनुष्य, ३ दरिद्री मित्र आणि ४ निपुत्रिक भगिनी, ([म. भा. उद्योग ३३-७०]) चौघे शत्रुवत् होत १ भार्या रुपवती, २ निरक्षर पुत्र, ३ ऋणकर्ता बाप आणि ४ अकुलीन माता. भार्या रूपवती शत्रुः पुत्रः शत्रुरपण्डितः। ऋणकर्ता पिता शत्रुर्माता च व्यभिचारिणी ॥ ([सु.]) चौघेजण शूलवत् दुःखदायक १ मूर्ख सेवक, २ कंजूप राजा - शासनाधिकारी, ३ कुलटा स्त्री व ४ कपटी मित्र. सेवक सठ नृप कृपन, कुनारी। कपटी मित्र सूलसम चारी ॥ ([राम - मानस किष्किंधाकांड]) चौघांचे स्मरणानें कलिनाश होतो १ कर्कोटाक नाग, २ दमयंती, ३ नळ आणि ४ राजा ऋतुपर्ण. कर्कोटकस्य नागस्य दमयन्त्या नलस्य च। ऋतुपर्णस्य राजर्षेः कीर्तनं कलिनाशनम् ॥ ([सु,]) चौघांकडील अन्न त्याज्य १ राजा, अथवा शासनाधिकारी, २ वेश्य, ३ वैद्य व ४ दुष्कर्माचरणी. राजान्नं गणिकान्नं च मिषगन्नं तथैव च। दुष्कर्मणां व सर्वेषामन्नं त्याज्यं सयत्नतः ॥ ([कल्याण मासिक]) अनुबंध चतुष्टय १ प्रयोजन, २ विषय, ३ अधिकारी आणि ४ संबंध. या गोष्टी ग्रंथांत असाव्या लागतात. अनंत चतुष्टय १ अनंतज्ञान, २ अनंतदर्शन, ३ अनंतवीर्य व ४ अनंतसुख. उपसर्ग चतुष्टय १ आधि, २ व्याधि, ३ उपाधि व ४ समाधि, घात चतुष्टय १ घातचंद्र, २ घाततिथि, ३ घातनक्षत्र व ४ घातवार. चित्त चतुष्टय १ मन, २ बुद्धि, ३ चित्त आणि ४ अहंकार. तनु चतुष्टय १ स्थूल, २ सूक्ष्म, ३ कारण आणि ४ महाकारण. ([दा. बो. ४-१-२८]) पुरुषार्थ चतुष्टय १ धर्म, २ अर्थ, ३ काम आणि ४ मोक्ष, प्रस्थान चतुष्टय १ दशोपनिषदें, २ ब्रह्मसूत्रें, ३ भगवद्नीता आणि ४ श्रीमद्भागवत. या चार ग्रंथांना मिळून प्रस्थान चतुष्टय म्हणतात. वेदांचे विभाग व ब्रह्मसूत्रांची रचना करूनहि व्यासांना शांति मिळाली नाहीं. ती त्यांना श्रीभद्भागवताची रचना केल्यानंतर लाभली अशी कथा आहे. भक्त चतुष्टय १ नारद, २ ध्रुव, ३ प्रल्हाद व ४ विदुर. हे चार आदर्श भक्त होत. विद्या चतुष्टय १ आन्वीक्षकी, २ त्रयी, ३ वार्ता व ४ दण्डनीति. ([मानवधर्मसार]) वीर चतुष्टय (पुराणकालीन) १ भरत, २ अभिमन्य, ३ ककुत्स्थ आणि ४ भीषम. सौभाग्य चतुष्टय १ धर्मा, २ श्री, ३ जय आणि ४ वैभव, ([भ. गी. १८-७८]) (गीताईनीतिकथा) संत चतुष्टय जागतिक कीर्तीचे (आधुनिक भारतीय) १ स्वामी रामकृष्ण परमहंस, २ स्वामी विवेकानंद, ३ स्वामी रामतीर्थ व ४ योगी अरविंद. (महाराष्ट्र जीवन) पौराणिक चांडाळ चौकडी १ दुर्योधन, २ दुःशासन, ३ कर्ण आणि ४ शकुनि. चतुर्विध शिष्य १ आप्तशिष्य. २ अंगशिष्य, ३ स्थानशिष्य व ४ सद्भावशिष्य. आप्त अंग स्थान। आणि सद्भाव म्हणोन। ऐसे चतुर्तिध शिष्य मिन्न। परिक्रमे ([वि. चिंतामणि प्रथम परिच्छेद]) चार अनार्य व्यवहार १ मृषावाद, २ पिशुन वाचा, ३ परुष वाचा व ४ व्यर्थ बडबड. चारा अधिष्ठानें १ प्रज्ञाघिष्ठान, २ सत्याघिष्ठान, ३ त्यागाधिष्ठान व ४ उपशमाधिष्ठान, ([दीघनिकाय]) चारा कारणानें चार गोष्टीं विनाश १ कलहानें घरें, २ अपशब्दानें मैत्री, ३ शिथिल राज्यव्यवस्थेनें राष्ट्र आणि ४ दुप्कृत्यामुळें माणसाची कीर्ति - कलहान्तानि हर्म्याणि कुवाक्यान्तं च सौह्रदम्। कुराज्यान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम्। सु. चार गोष्टी एकटयाला निषिद्भ १ मिष्टान्नभोजन. २ कार्यविचार. ३ प्रवास आणि ४ इतर लोक झोपले असतां एकटयानें जागणें. ([म. भा. उद्योग ३३-४६]) चार गंगा १ द्विजगंगा - गोदावरी, २ क्षत्रिय गंगा - भागीरथी, ३ वैश्यगंगा - नर्मदा व शूद्रगंगा - कावेरी - हे ओघ जरी वेगळाले। परी गंगेनें व्याप्त सगळे। भेदरूप राहिले। शब्द नुसते व्यवहारांत (गोदामहात्म्य) चार गोष्टी मृतवत् १ दरिद्री मनुष्य २ अराजक माजलेलें राष्ट्र. ३ अनधी विप्राकरवीं केलेलें श्राद्ध. ४ दक्षिणा न देतां केलेलें धार्मिक कृत्य चार खाणी माणसांच्या १ आपलपोटे. २ प्रपंचस्वार्थी, ३ जातिपक्षीय आणि ४ समाजपक्षीय (सुविचार - स्मरणी) चार गोष्टी कोठूनहि ध्याव्यात विषादप्यमृतं ग्राह्यं अमेध्यादपि काञ्चनम्। नीचादप्युत्तमाविद्या स्त्रीरत्नं दुष्कुलादपि ॥ ([सु.]) १ अमृत - विषाच्या सांन्निध्यांत असले तरी २ सुवर्ण - अशुचि पदार्थात पदते तरी ३ विद्या - नीच माणसापासूनदेखील चांगली विद्या. ४ स्त्रीरत्न - दुष्कुलांत जन्म असला तरी देखील. चार गोष्टी कोरीव लेखाला प्रामाण्य आणणार्या १ कालाचा उल्लेख गणितद्दष्टया जुळला पाहिजे. २ स्थलाचा उल्लेख वस्तुस्थितीस धरून, ३ लेखांतील वंशावळ इतर प्रमाणभूत लेखांशीं जुळली पाहिजे आणि ४ तत्कालीन प्रामाणिक लेखांतील कल्पना, शब्दसमुच्चय, बिरूदें यांचा उपयोग.- दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासाचीं साधनें चार नृत्य प्रकार बाली नृत्याचे १ लेगांग नृत्य - तीन लहान मुलींनीं मिळून केलेले नृत्य, २ जांगर नृत्य - दहा मुलें व दहा मुली अशा वीस जणांनीं मिळून केलेलें, ३ कवियर नृत्य - बसूनच केलें जातें व ४ केचक अथवा वानर नृत्य (स्त्री नोव्हेंबर १९६३) चार प्रकार चित्रांचे (कल्पनागम्य) (अ) १ आदर्शवादी, कल्पनावादी, २ अलंकारिक वा भौषणिक, ३ रूढीवादी व ४ प्रतीकवादी (कला आणि कलास्वाद) (आ) १ वस्तुनिष्ठ, २ इंद्रियगग्य, ३ संलग्नित व ४ उत्स्फूर्त किंवा स्वाभाविक (चित्रकला - एक शैक्षणिक माध्यम) चार प्रकार पेमाचे १ लालन प्रेम, २ वात्सल्य प्रेम, ३ सख्य प्रेम व ४ माधुर्य प्रेम. (श्री ज्ञानेश्वर गूढार्थ दीपिका खंड ३ चार प्रकार स्तोत्रांचे १ द्रव्य स्तोत्र, २ कर्मस्तोत्र, ३ विधिस्तोत्र आणि ४ अभिजन स्त्रोत्र, द्रव्यस्तोत्रं कर्मस्तोत्रं विधिस्तोत्रं तथैव च। तथैवाभिजनस्तोत्रं स्तोत्रमेतच्चतुर्विधम् ([न्यायकोश]) चार प्रकारच्या लोकांना वश करण्याचे चार मार्ग १ लोभी - धनानें, २ क्रुद्ध - हात जोडून, ३ मूर्ख - त्याच्या कलानें व ४ पंडित - खरेपणानें. लुब्धमर्थेन गृह्लीयात्क्रुद्धं चाञ्जलिकर्मणा। मूर्खं छन्दानुबंधेन याथातथ्येन पण्डितम् ॥ ([सु.]) चार प्रकार सृष्टीचे १ संकल्पोदभव, २ दर्शनोद्भव, ३ स्पर्शोद्भव, व ४ मैथुनजन्य. संकत्पाद्दर्शनात्स्पर्शात्पूर्वेषां सृष्टिरुच्यते। दक्षात् प्राचेतसादूर्ध्व सृष्टिमैंथुनसम्मवा ॥ सृष्टीचे आरंमीं पहिल्या तीन प्रकारांनीं निर्मिति होत असून दक्षापासून मैथुनजन्य संतति निर्माण होऊ लागली म्हणजे दक्ष हा पहिला प्रजापति. ([मत्स्य पुराण]) चार प्रकार ज्ञानाचे १ शब्दज्ञान, २ अपरोक्षज्ञान, २ सामान्यज्ञान व ४ विशेषज्ञान. ([ज्ञानप्रबोध]) चार प्रकार तीर्थीचे १ दैवी, २ राक्षसी, ३ ऋषिज व ४ मानवी. ब्रह्म बोले त्यावर। तीर्थाचे ते प्रकार चार दैवी राक्षसी साचार। ऋषिज आणि मानवी (गोदामाहात्म्य) चार प्रकारचे वाक्यदोष १ भ्रम, २ प्रमाद, ३ विप्रलिप्सा - विपरीत अर्थ सांगण्याची इच्छा व ४ कर्णापाटव - अशुद्ध उच्चार वा बोबडेपणा. ([न्यायकोश]) चार प्रवाह वेदान्ताचे १ शुद्धद्वैत, २ विशिष्टाद्वैत, ३ शुद्धाद्वैत व ४ केवलाद्वैत. (स्वामी विवेकानंद) चार प्रकार योगाचे कर्मयोग. २ भक्तियोग, ३ राजयोग व ४ ज्ञानयोग (सार्वजनीन धर्म स्वरूप व साधना) चार प्रकार रंगभूषेचे १ साधारण नेहमींचा, २ श्रृंगारिक, ३ कृत्रिम बाहयरूप व ४ लुकणि (Plaslie) (रंगभूषा शास्त्र) चार प्रसंगानंतर स्नान आवश्यक १ अंगाला तेल लावल्यावर. २ प्रेतयात्रेस जाऊन आल्यावर. ३ मैथुनानंतर आणि ४ क्षौर विधिनंतर, अशावेळीं स्नान न करणारा मनुष्य चांडाळ समजला जातो. चार बलें १ बीर्यबल, २ स्मृतिबल, ३ समाधिबल व ४ प्रज्ञाबल ([दीघनिकाय]) चार धर्मस्कंध १ शीलस्कंध, २ समाधिस्कंध, ३ पुण्यस्कंध व ४ विमुक्तिस्कंध. चार भावना १ मैत्री भावना, २ प्रमोद भावना, ३ कारुण्य भावना, व ४ माध्यस्थ्य भावना (धर्मामृत) चार मूळ गोत्रें १ अङिगरा, २ कश्यप, ३ वसिष्ठ व ४ भृगु. मूल गोत्राणि चत्वारि समुत्पन्नानि भारत। अंङिगराः कश्यपश्चैव वसिष्ठो भृगुरेव चा ॥ ([म. भा. शांति. अ. २६४]) चार मूलभूत गोष्टी स्थिर राज्याला अत्याश्यक १ सुबुद्ध नेतृत्व, २ शासकीय पात्रता, ३ समान आर्थिक संधि, ४ राष्ट्रीय सहकार्य, (राष्ट्रपति डॉ. राधाकृष्णन् केसरी ५-११-६३.) चार विशेषणें आत्म्याचीं १ सत् , २ चित् , ३ आनंद व ४ अद्वैत चार विशेषणें अनात्म्याची १ असत् , २ जड, ३ दुःख आणि ४ द्वैतत्व (वि. चंद्रोदय दर्शन) चार संवाद - श्री रामचरितमानसांतर्गत १ काकमुशुंडि - काकगुरुड - संवाद, २ उमा - शंभु - संवाद, ३ याज्ञवल्क्य - भरद्वाज संवाद व ४ श्री तुलसीदास - आणि त्यांचे श्रोते. हे चार संवाद म्हणजे श्रीरामचरितमानस (काव्य) सरोवराचे चार घाट होत. यांत चार कल्पांतील रामावताराचें वैशिष्टय दाखविलें आहे. अतिसुंदर संवादवर विरचित - बुद्धि - विचारिं। ते या पावन सुमगा सरिं घाट मनोहर चारिं ([गूढार्थचंद्रिका])
|