असंगति अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
‘वरवर विरुद्ध भासणारें जें वैयधिकरण्य, [म्ह० हेतु म्ह० कारण व कार्य यांचें निराळ्या ठिकाणीं राहणें,] ती असंगति.’
‘हे नेपाळच्या राजा ! तूं धनुष्याला स्पर्श केला असतां, कोणत्याही राजांना झोप आली नाहीं; म्ग तुझ्या डोळ्याचा कोपरा लाल झाला असतां, कोणाला झोप येईल बरें ?”
या श्लोकांत धनुष्याचा स्पर्श व डोळ्यांतील लाली हे दोन हेतु; व झोप मोडणें हें त्यांचें कार्य हीं दोन्ही निराळ्या ठिकाणीं, (म्ह० धनुष्यस्पर्श व डोळ्यांतील लाली हीं नेपाळेश्वराचे ठिकाणीं व निद्रानाश शत्रंचे ठिकाणीं,) राहिलीं आहेत; त्यामुळें येथेंही असंगति अलंकार होऊ लागेल; त्याचें निवारण करण्याकरतां लक्षणांत, ‘विरुद्ध’ हा शब्द घातला आहे. प्रस्तुत श्लोकांत धनुष्याला स्पर्श करणें व डोळ्यांतली लाली, हीं दोन कारणें निराळ्या ठिकाणीं राहूनच कार्य उत्पन्न करू शकतात; त्यामुळें या ठिकाणीं कार्य व कारण हीं निराळ्या ठिकाणीं असण्यांत विरोधाला जागाच नाहीं. येथें कुणी असें म्हणतील कीं, ‘डोळ्यांतल्या लालीनें सूचित होणारा क्रोध कालिकसंबंधानें हेतु असल्यामुळें तो कार्याहून निराळ्या ठिकाणीं असला तरी चालेल; पण राजानें स्वत:च्या धनुष्याला लीलेनें केलेला स्पर्श, हा स्वत: कांहीं निद्राभंगाला हेतु नाहीं; तर त्या स्पर्शाचें शत्रूंना होणारें अनुमितीसह ज्ञान त्यांच्या निद्राभंगाला हेतु आहे, असें मानलें पाहिजे, मग वरील श्लोकांत कार्य व कारण निराळ्या ठिकाणीं आहेत असें कसें म्हणतां येईल ?’ यावार (आमचें) उत्तर असें कीं, (या ठिकाणीं स्पर्शज्ञानाला आम्ही कारण म्हटलें नसून, धनुष्याला स्पर्श करणें यालाच कारण म्हटलें आहे.) लक्षणांतील हेतु या शब्दानें आम्ही प्रयोजक (म्हणजे पंरपरेनें होणारा हेतु म्ह० प्रयोजककारण म्ह० कारणाचें कारण) हा अर्थ घेतल्यानें, येथें कांहींही बिघडलेलें नाहीं. आतां चापस्पर्श हा जो प्रयोजक (परंपरेनें, येथें कांहींही बिघडलेलें नाहीं. आतां चापस्पर्श हा जो प्रयोजक (परंपरेनें) कारण होतो तो, भ्रमात्मक (म्हणजे नेपाळच्या राजाच्या खोटया क्रोधाची) जी अनुमिति (हीच निद्रानाशाचें कारण) तिला लिंग म्हणजे ज्ञापक हेतु होऊन होतो. (म्हणजे चापस्पर्श हार रोषाच्या अनुमितिज्ञानाला कारण व रोषज्ञान हें निद्रानाशाला कारण.)
उदाहरण :---
‘आपल्या अत्यंत सुकुमार अशा अवयवांनीं ती फुलांची शोभा हरण करते; आणि मदन, जगांतील तरुणांवर प्रहार करतो (म्ह० त्यांना शिक्षा करतो).’
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP