विशेष अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“प्रसिद्ध आश्रयावांचूनचें म्हणून वर्णन केलें जाणारें आधेय (म्ह० एखाद्या आधारावर राहणारी वस्तु) हा विशेषाचा पहिला प्रकार; व एक आधेय, मर्यादित अशा एखाद्या आधारावर राहत असूनहीं, तें एकाच वेळीं अनेक आधारांवर राहत असल्याचें वर्णन असेल तर, तो विशेषाचा दुसरा प्रकार.”
युगपत् म्हणजे एकाच वेळीं, हें विशेषण दिल्यानें, पुढें येणार्या पर्याय अलंकारांत या लक्षणाची अतिव्याप्ति होणार नाहीं. अशा रीतीनें ही विशेषाचीं (खरीं) लक्षणें असल्यानें, इतर ग्रंथांत सांगितलेलीं विशेष अलंकाराचीं लक्षणें ही अतिप्रसक्त (म्ह० अतिव्याप्तिदोषानें ग्रस्त) आहेत, असें समजावें.
‘एखाद्यानें, एखादें कार्य सुरू केलें असतां, त्याला कल्पना नाहीं अशी दुसरी एखादी अशक्य वस्तु त्याचे हातून निर्माण होणें,’ हा विशेषाचा तिसरा प्रकार, वरील प्रकारांपैकीं कोणताही एक प्रकार असणें, हें विशेष अलंकाराचें सामान्य लक्षण, असें प्राचीनांचें म्हणणें.
यांपैकीं पहिला प्रकार पुन्हांदोन प्रकाराचा :--- (१) (स्वत:च्याखर्या आधाराला सोडून) दुसर्या आधारावर आधेय राहतें असें वर्णन करणें, व (२) आधारावांचूनच आधेय राहतें, असें वर्णन करणें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP