प्रतीप अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां साध्यत्व व सिद्धत्व (अमुक एका वस्तूच्या ठायीं कायमचें असतें असें नसून) हें वक्त्याच्या बोलण्याच्या इच्छेवर अवलंबून असल्यानें, (प्रतीपाच्या पहिल्या प्रकारांत, चंद्र इत्यादि प्रसिद्ध उपमानांना साध्य म्ह० उपमेय केलें व मुखादिक उपमेयांना सिद्ध म्ह० उपमान केलें आहे) यांत कांहीं बिघडलें नाहीं.
दुसर्या व तिसर्या प्रतीपाच्या प्रकाराचें फळ उपमान व उपमेयांचा गर्व हरण करणें हें, स्पष्टच आहे. चतुर्थ प्रतीपाचें फळ, ज्याचा निषेध केला जात आहे त्या वस्तूंतील सर्व गुण ह्या वर्ण्य विषयांत आहेत असें ज्ञान होणें हें. पंचम प्रतीपाचें फळ पहिल्या प्रकारासारखें (म्हणजे उपमानाचें न्यूनत्व व उपमेयाचे आधिक्य हें).
उदाहरण :--- “माझें अंग सोन्यासारखें आहे असें भाबडेपणानें कं ग उगीच बडबत आहेस ? अग अवदसे ! तें सोनें जर अग्नींत पडलें असतें तर, तें खात्रीनें तुझ्या अंगासारखें दिसलें असतें.”
या श्लोकाच्या पूर्वार्धांत असलेल्या उपमेनें सोन्याच्या रंगाचा अधिकपणा सूचित केला असला तरी, त्या अधिकपणाचा उत्तरार्धांईल प्रतीप अलंकार तिरस्कार करतो, व बालिकेच्या अंगवर्णाचा अधिकपणा सूचित करतो. सोनें अग्नींत पडल्यावांचून प्रतीप अलंकार होणेंही कठीण; आणि उपमा तर स्वप्नांसुद्धां संभवणार नाहीं, हें भाबडेपणा व अवदसेपणा ह्या शब्दांनीं सूचित केलें आहे.
“मी मोठेपणाची परिसीम आहे; ‘मी गंभीरतेचें [(१) गंभीरपणाचें व (२) खोलपणाची परिसीमा आहे; ‘मी गंभीरतेचें [(१) गंभीरपणाचें व (२) खोलपणाचें] घर आहे; मी जगांत रत्नांचा एकच एक जनक आहे; माझ्यासारखा दुसरा कोण आहे ?’ अशा विचारानें, हे दुग्धसागरा ! तूं एकदम गर्वानें आंधळा होऊ नकोस; कारण तुझ्यासारखा असलेला दिल्लीचा बादशहा विजयशाली आहे.”
“स्वत:ची अत्यंत गौर कान्ति पाहून, तूं मनांत शेफारून जाऊ नकोस. वेडे ! बघ तर खरें, घ्रोघरीं तुझ्या अंगाच्या वर्णासारख्या सोन्याच्या बांगडया (हातांत) लोळत पडल्या आहेत.”
‘अपमानाचा काय उपयोग ?’ हा जो प्रतीपाचा चवथा प्रकार, त्याचें उदा० ‘अभूदप्रत्यूह:०’ हें आक्षेपालंकाराच्या प्रकरणांतच आम्ही दिलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP