मना तूं होई लीनरे । सद्गुरुपदीं लीन होवुनी । स्वात्मसुखातें घेईरे ॥धृ०॥
सद्गुरुपदीं मारुनी बुडी । स्वानंदाचीं रत्नें काढी । अमोल्य रत्नें पाहा घडी घडी ।
आहे छानरे । मना तूं० ॥१॥
काढुनी घेई नवरत्नांते । गुंफुनी त्यां तूं विवेक हस्तें ।
लक्ष लावुनी एक चित्तें । कंठीं घालीरे ॥
गुरुच्या ॥ कंठीं घालीरे । मना तूं० ॥२॥
कंठीं माळ तूं घालीसी जेव्हा । स्वानंदसुख गुरु देतील तेव्हा ।
सद्गुरुकृपा होईल केव्हा ? । होतां पदीं लीन रे । मना तूं० ॥३॥
लीन झालीया सद्गुरुनाथ । मुक्त करीती दीन अनाथ ।
वारी म्हणे हें सांगतें सत्य अनुभव घेईरे । मना तूं० ॥४॥