-
पुन . १ जो स्त्री नव्हे आणि पुरुषहि नाही असा मनुष्य ; हिजडा ; तृतीयप्रकृति ; षंढ . २ पराक्रमहीन , गांडू , दुबळा पुरुष . - वि . शब्दांच्या तीन लिंगापैकी एक . व्याकरणातील तृतीय म्हणजे पुल्लिंग व स्त्रीलिंग यांहून भिन्न अशा लिंगाचे . नपुसकलिंग पहा . [ सं . ] नपुसकाच्या हाती पद्मीण - रंभा - उपभोग घेण्यास असमर्थ अशा व्यक्तिच्या हाती अतिशय सुंदर , बहुमोल अशी वस्तु ( पडणे , राहणे इ० ); विजोडपणा . नपुंसकत्व - न . नपुंसकपणा ; संभोगविषयक दुबळेपणा . नपुंसकत्व सात प्रकारचे आहे . - योर २ . ७१२ . नपुसकलिंग - न . ज्या नामेकरुन प्राणिवाचक अथवा अप्राणिवाचक पदार्थाच्या पुरुषत्वाचा अथवा स्त्रीत्वाचा बोध होत नाही परंतु जी सामान्येकरुन सर्व जातीची अथवा त्या जातींतील एखाद्या व्यक्तिची वाचके असतात त्यांस अथवा त्यांचे नपुसकलिंग म्हणतात . जसेः - माणूस , ढोर , कुत्रे , लांकूड , तेल इ० - मराठी भाषेचे व्याकरण २६ . [ नपुसक + लिंग ]
-
n m A human or other creature without organs of generation; one neither male nor female. An impotent person, one without the power of procreation.
-
ना. क्लीब , तृतीयपंथी , मामर्द , पौरुषहीन , षंढ , हिजडा .
-
a In grammar. Neuter.
Site Search
Input language: