-
स्त्री. चौदा विद्या . चौदाजणींची ठेव । नचले स्वरूप वर्णावया । - ह ३ . ३ . - वि . १४ संख्या ; दहा आणि चार . [ सं . चतुर्दश ; प्रा . चउद्दाह ; हिं . चौदह ; बं . चौद्द ; उ . गु . चौद ; पं . चौदा ] सामाशब्द -
-
०इंद्र पु. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या कालांत जसे पृथ्वीवर एकामागून एक चौदा इंद्र त्या कालांत राज्य करून जातात . म्ह० - चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच ( सभोंवतें अनेक फेरफार होत असतांना देखील जी एकच व्यक्ति , वस्तु , संस्था , विधि , चाल इ० टिकून राहते तिचें वर्णन करतांना या म्हणीचा उपयोग करतात ). गोत्रें - नअव . ( कोंकणस्थ ब्राह्मणांचीं ) अत्रि , कपि , काश्यप , कौंडिण्य , कौशिक , गार्ग्य , जामदग्न्य , नित्युंदन , बाभ्रव्य , भारद्वाज , वत्स , वासिष्ठ , विष्णुवृध्द व शांडिल्य .
-
०चौकडया वि. चौदा चौकडयांचें राज्य असणारा . चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण झाली गति । - तुगा
-
०चौकडयांचें न. कृत , त्रेता . द्वापार व कलि हीं चार युगें मिळून एक चौकडी होते . अशा चौदा चौकडया होईपर्यंत केलेलें राज्य ; अतिशय दीर्घकाल केलेलें राज्य ; रावणाचें राज्य . सर्व देवांना बंदींत टाकणारा व चौदा चौकडया राज्य करणारा रावण स्वत : च्या प्रतापासंबंधाच्या ... ... चुकीच्या कल्पनेला बळी पडला . - कीचकवध .
Site Search
Input language: