-
स्त्री. ( महानु .) टोंचणी ; नेट ; तगादा . ' त्यांनी त्या कामी नोक लाविली .'
-
स्त्री. ( क्व . ) १ ( सुई , काठी इ० चे ) टोंक ; अणी ; फळ ( भाल्याचे ). सखे तूं पातळ पुतळी फोक । नको मारुं नयनाची नोक । - होला १७८ . २ ( ल . ) मुद्दा ; खुबी ; तात्पर्य ( गोष्ट , भाषण यांतील ) ध्यानांत धरण्यासारखी गोष्ट , लक्षण ; वैशिष्ट्य ; विशिष्ट ढब ; पद्धत . त्याचे बोलण्यांत नोक आहे . ३ छानी ; नोकझोक ; नखरा ; ऐट . करितात कवन गातात मधुर नोकिंत . - प्रला १३२ . ४ किंचित सूचना ; खोंच ; चुणुक ; टोला ; उपरोध ; व्यंगोक्ति . ( क्रि० दाखविणे ; मारणे ; लावणे ) झोंबणारे भाषण . ऐकोनि स्त्रियेचा नोक थोरु । शस्त्र घेऊनि सत्वरु । धावतां फिटला पीतांबरु । ते नृपवरु स्मरेना । - एभा २६ . ७१ . बरे आजचा दिवस तुम्ही मौजा करा . इतकी नोक मारुन गेला . [ फा . नौक ]
-
०झोक झोंक - स्त्री . १ व्यंगोक्ति ; टोला . नोक अर्थ ४ पहा . अशी भाषणे नोके - झोकेची जाटांनी ही भाऊसाहेबांकडे सांगून पाठविली . - पाब ७ . नोकानोकी पहा . २ ढब ; नखरा ; थाटमाट ( पोशाख , भाषण , चालणे वगैरेत ). ( क्रि० संभाळणे ). वक्तृत्व म्हणजे नुसते बोलणेच नव्हे , तर उंच व मनोवेधक स्वर , अंगविक्षेपाचा नोक झोक ... - नि २९६ . ३ तंटा ; भांडण ; धकाधकी ; झोंबाझोंबी . ४ चुणूक ; दाखविलेली झुळूक . ( क्रि० दाखविणे ). हा नोकझोंक दाखवून गेला . ५ इशारा ; अंधूक सूचना . ( क्रि० दाखविणे ).
-
; a remarkable point or feature; a particular excellence; a distinguishing air, cast, style: also airiness, smartness, degagéness. 2 An innuendo or a hint, a slight intimation or insinuation. v दाखव, मार, लाव.
Site Search
Input language: