सांगं प्राजापत्यमाह.
‘‘ गौतमः’’ हविष्यान्प्रातराशान्भुक्त्वा तिस्रो रात्रीर्नाश्र्नीयादथापरं त्र्यहं नक्तं भुंजीताथापरं त्र्यहं न कंचन याचेताथापरं त्र्यहमुपवसेत्तिष्ठेदहनि रात्रावासीत क्षिप्रकामः सत्यंवदेदनार्यैर्न संभाषेत रौरवयोधां जपे नित्यं प्रयुंजीतानुसवनमुदकोपस्पर्शन मापोहिष्ठेति तिसृभिः पवित्रवतीभिर्मार्जयतीत हिरण्यवर्णाः शुचयः पावका इत्यष्टाभिरथादकतर्पणं नमो हमाय मोहमाय मंहमाय धुन्वते तापसाय पुनर्वसवे नमो मौंज्यायौर्व्याय सुविदाय वसुविदे सर्वविदे नमः परायुविदे सर्वविदाय नमः पराय सुपराय पारदाय पारयिष्णवे नमो रुद्राय पशुपतये महते देवाय त्र्यंबकायैकचरायाधिपतये हरये शर्वायो ग्राय वज्रिणे घृणिने कपर्दिने नमः सूर्यायादित्याय नमो नीलर्ग्रावाय शितिकंठाय नमः कृष्णाय पिंगलाय नमो ज्येष्ठाय श्रेष्ठाय वृद्धायेंद्राय हरिकेशायोर्ध्वरेतसे नमः सत्याय पावकाय पावकवर्णाय कामाय कामरूपिणे नमो दीप्ताय दीप्तरूपिणे नमः सौम्याय पुरुषाय महापुरुषाय मध्यमपुरुषाय ब्रह्मचारिणे नमश्र्चंद्रललाटाय कृत्तिवाससे नम इति एत एवादित्योपस्थान एता एवाज्याहुतयोद्वादशरात्रस्यांते चरुं श्रपयित्वैताभ्यो (देवताभ्यो) जुहुयादग्नये स्वाहा सोमाय स्वाहाऽग्नीषोमाभ्यामिंद्राग्निभ्यामिंद्राय विश्र्वेभ्यो देवेभ्यो ब्रह्मणे प्रजापतयेऽअग्नये स्विष्टकृत इत्यंते ब्राह्मणभोजनमेतेनातिकृच्छ्रोव्याख्यात इति नमो हमायेत्यादयस्त्रयोदशमंत्रा नमःपूर्वा नमोंताश्र्चेति ‘‘हरदत्तः’’ कौथुमब्राह्मणे तु तथैव पाठः
संपूर्ण प्राजापत्य.
संपूर्ण प्राजापत्याच्या स्वरूपाचें वर्णन.
‘‘गौतम’’ सांगतो---तीन दिवस दिवसां हविष्यांचे भक्षण करावें, तेव्हां तीन रात्रीं भोजन करूं नये. त्यानंतर तीन दिवस पावेतों रात्रीं जेवावें तेव्हां दिवसां जेऊं नये. त्यानंतर तीन दिवसपर्यंत कोणाजवळ कांहीं न मागतां जेवावें. याप्रमाणें तत्काळ मनोरथ पूर्ण होण्याची इच्छा करणारानें व्रत करीत असतां दिवसा उभें राहावें, रात्रीं बसावें, खरें बोलावें, अनर्यांशी संभाषण करूं नये व ‘‘रौरवयोधा’’ या सामाचा नित्य जपाकडे उपयोग करावा. प्रत्येक काळीं पाण्यानें स्नान करावें. ‘‘आपोहिष्ठा’’ या तीन ॠचा, ‘‘पवित्रवती’’ व ‘‘हिरण्यवर्णाःशुचयः पावकाः’’ या आठ ॠचा यांनी मार्जन करावें. नंतर पुढील मंत्रांनीं पाण्यानें तर्पण करावें. ‘‘नमोहमाय मोहमाय मंहमाय धुन्वते तापसाय पुनर्वसवे, नमो मौंज्यायौर्व्याय सुविदाय वसुविदे सर्वविदे, नमः परायसुविदे सर्वविदाय, नमः परासुपराय पारदाय पारायिष्णवे, नमोरुद्राय पशुपतये महते देवाय त्र्यंबकायैकचरायाधिपतये हरये शर्वायोग्राय व्रजिणे घृणिने कपर्दिने, नमः सूर्यायादित्याय, नमो नीलग्रीवाय शितिकंठाय, नमः कृष्णाय पिंगलाय, नमो ज्येष्ठाय श्रेष्ठाय वृद्धायेंद्राय हरिकेशायोर्ध्वरेतसे, नमः सत्याय पावकाय पावकवर्णाय कामाय कामरूपिणे, नमोदीप्ताय दीप्तरूपिणे, नमः सौम्याय पुरुषाय महापुरुषाय मध्यमपुरुषाय ब्रह्मचारिणे, नमश्र्चललाटाय कृत्तिवाससे नमः’’ हेच मंत्र सूर्याच्या उपस्थानांत घ्यावे, आणि याच मंत्रांनीं तुपाच्या आहुति (होम) द्याव्या. बाराव्या रात्रीच्या शेवटी (तेराव्या दिवशीं) भात शिजवून त्याचा पुढील देवतांस होम द्यावा. ते मंत्र अग्नये स्वाहा, सोमायस्वाहा, अग्नीषोमाभ्यांस्वाहा, इंद्राग्निभ्यांस्वाहा, इंद्रायस्वाहा, विश्र्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, प्रजापत्ये स्वाहा, अग्नये स्विष्टकृते स्वाहा’’ याप्रमाणें होम दिल्यानंतर शेवटी ब्राह्मणभोजन करावे. याप्रमाणें अतिकृच्छ्र सांगितला. ‘‘नमोहमाय इत्यादि हे ज्यांच्या पूर्वी व शेवटीं ‘‘नमः’’ हें पद आहे असे तेरा मंत्र आहेत असें ‘‘हरदत्त’’ म्हणतो. जसें---नमोहमाय मोहमाय मंहमाय धुन्वते तापसाय पुनर्वसवे नमः’’ इत्यादि ‘‘कौथुम ब्राह्मणांत’’ ही तसाच पाठ आहे.