मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत मुक्ताबाईचे अभंग|
नामबळें देहीं असोनि मुक्त...

संत मुक्ताबाईचे अभंग - नामबळें देहीं असोनि मुक्त...

मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वरांची सर्वात धाकटी बहीण, हिचा पाया अध्यात्मिक होता. मुक्ताबाईने चांगदेवाचे गर्वहरण केले. मुक्ताबाईंनी आपल्या अध्यात्मिक सामर्थ्याने ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजले होते.
Muktabai's life was brief but she enlightened thousands of people by her striking personality, which helped to enhance the greatness of her brothers too. She was struck by lightening and reached the abode of God when she was barely eighteen. Muktabai is honoured to this day and regarded as one of the pioneers of the Varakari cult. The story of Muktabai is chiefly bound up with that of Jnanadev, one of her brothers.

नामबळें देहीं असोनि मुक्त । शांति क्षमा चित्त हरिभजनें ॥ १ ॥

दया धरा चित्तीं सर्वभूतीं करुणा । निरंतर वासना हरिरूपीं ॥ २ ॥

माधव मुकुंद हरिनाम चित्तीं । सर्व पैं मुक्ति नामपाठें ॥ ३ ॥

मुक्ताईचें धन हरिनामें उच्चारु । अवघाचि संसारु मुक्त केला ॥ ४ ॥

N/A

N/A
Last Updated : January 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP