मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|वारांचा आरती संग्रह| एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही... वारांचा आरती संग्रह कर्हेच्या पाठारीं नांदे ... आधार चक्र नृत्य मांडिलें ... चिंतामणी परिपूर्ण देवाधि ... एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही... निर्गुण गुणवंत तूं विघ्नह... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा... पुजेच्या प्रांतीं अभ्यंग ... आरती बुधवारची - एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती. The poem composed in praise of God is Aarti. Tags : aratimorya gosaviwednesdayआरतीबुधवारमोरया गोसावी आरती बुधवारची Translation - भाषांतर एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥ अगम्य गम्य रुप आनंदघन ॥ मयूरपूर रहिवास कैलास (स्वानंद) भुवन ॥ ब्रह्मादिक सुरवरां नकळे महिमान ॥ जयदेव जयदेव जय जय गजवदना ॥ आदि पुरुषा भाळिं चंद्र त्रिनयना ॥ कृपा अमृत घन भवताप शमना ॥ उजळूं अष्टभावें आरति तव चरणा ॥१॥धृ०॥ सहस्त्रवदनें शेष वर्णिंता झाला ॥ नकळे तुमचा महिमा स्तवितां श्रमला ॥ मौन धरुनि वेद श्रुति परतल्या ॥ तोचि (हाचि) मोरेश्वर विश्वंभरीं अवतरला ॥जयदे० ॥२॥ कोटि सूर्य प्रकाश कोटि (शशि) निर्मळ ॥ सर्वात्मा सर्वांजीवीं जिव्हाळा ॥ मोरया गोसावी पाहे अवलीला ॥ देव भक्त प्रेमें घेति सोहळा ॥ जयदेव० ॥३॥ N/A References : N/A Last Updated : July 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP