-
न. १ कार्याचें अधिकारणी नियमेंकरुन विद्यमान असुन जें कार्योंप्तादक तें ; निमित्त ; कार्यप्रवर्तक ; प्रमाण ; आधार ; ज्यामुळें एखादी गोष्ट घडते तें ; हीं तीन आहेत - समवायी , असमवायी व निमित्त ( अंतस्थ किंवा अविभाज्य , दुरस्थ किंवा अप्रत्यक्ष , साधनभुत किंवा आकस्मिक ; कारण यांचा प्रथमार्थी कर्तृत्व , हेतु , अपेक्षा , प्रेरणा , उद्देश , आधार इतक्यां अर्थी प्रयोग होतो ). ' तयाही बोधा कारण । जाणता मीचि । ' - ज्ञा १५ . ४३८ . ' ऐसा आहे समाचार । कारण पाहिजे विचार । ' - दा १२ . ६ . २९ . २ प्रयोजन ; हेतु . ३ गरज ; काम ; प्रसंग , ' आज पाऊस पडला नाहीं म्हणुन छत्रीचें कारण लागलें नाही .' ४ मुंज किंवा लग्नासारखा कोणताहि समारंभ . ५ साधन उपकरण ; घटक ; मुलतत्व ; आद्यद्रव्य . ६ ( न्याय ) नियतपूर्व ; दुसर्या कोणत्याहि गोष्टीवर अवलंबुन नसणारें . - न्याप ३४ . ७ मसलत . ' हाता चढे धन । ऐसें रचिलें कारण । ' - तुगा १८४० ८ कार्य ' जाऊं दे सावित्री , मज करूं दे कारण । ' - वसा ६७ . ' करुनी कारण स्वामी यश द्यावें । पाईका त्या नांवें खरेपण ' - तुगा ३७९ . ९ इच्छित वस्तु ; सृष्टीचें आद्य तत्त्व . ' तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेंसीं आधीं । मग तिया लावितां वेधीं । कारणाच्या । ' - ज्ञा १३ . ९६८ . १० साध्य . ' तें परब्रह्मा निर्वाण । जें आत्मविदांचें कारण । ' - ज्ञा १३ . ९३८ . १० साध्य . ' तें परब्रह्मा निर्वाण । जें आत्मविदांचे कारण । ' - ज्ञा . ५ . १४९ . ११ ( वेदांत ) महत्तत्व . अहंकार , व सुक्ष्म पंचभुतें ( आनंदगिरीचें मत ); पंचज्ञानेंद्रियें . त्याचें विषय मन , बुद्धि व अहंकार , ( शांकरमत भगवतगीता १३ . २० .). ( सं . कृ = करणें ) कारणीं लावणें - कामाला , उपयोगाला लावणें . ( देह , द्रव्य , सामर्थ्य , आयुष्य , जन्म इ० )- ' करणीं लावोनि करील सार्थंक । ' - दावि ३९१ .
-
०त्व न. कारण असणें ; कारणरुप असणें . ( सं .)
-
०देह शरीर - पुन . देहचतुष्टयापैकीं तिसरा देह . याला अविद्येचें किवा अज्ञानाचें अधिष्ठान आहे . ' स्थूल सुक्ष्म देहद्वयातें । आणि विपरीत ज्ञानातें । अज्ञानाचि प्रसवलें म्हणोनि त्यातें । कारण देह म्हणीजे पैं । ' ( सं .)
-
०परत्वें कारण पडल्यास ; जरूर लागल्यास . ' कोंडो - भटाबरोबर मात्र ती कारनपरत्वें बोलत होती .' - स्वप . २१४ .
Site Search
Input language: