शून्य आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् असत् आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा आहेत. सर्व संसाराची उत्पत्ति शून्यापासूनच झाली आहे. हें सर्व चराचर विश्व शून्यांतून निघालें आहे.
"शून्यांतील सारें चराचर" हें शून्य़ "अगणित" व "अक्षय्य" आहे. (
[ज्ञा. अभंग])
शून्याला वृद्धि क्षय होतच नाहींत म्हणून अक्षय्य.
शून्यकान कान नाहीं असा प्राणी - - सर्प (प्राकृत ग्रंथांत त्यास चक्षु : - श्रवा म्हणतात.)
शून्यचरण चरण नाहीं असा प्राणी - सर्प (प्राकृत ग्रंथांत त्यास पादोदर किंवा उरग म्हणतात.)
शून्य जिव्हा जिव्हा नाहीं असा प्राणी - बेडूक (
[दु. श. कोश])
शून्यवाद जग हें केवळ शून्यापासून - अभावापासून उत्पन्न झालें. त्यास बौद्धांचा शून्यवाद म्हणतात. (
[बौद्धदर्शन])
शून्यशिर शिर नाहीं असा प्राणी - खेंकडा.