-
पु. १ काव्यात्मक मंडण , विस्तार . २ अतिशयोक्ति ; तिखटमीठ . ( क्रि० लावणें ; मांडणें ; करणें ). ३ ( सामा . ) वाढ ; विस्तार . दाउ वेल्हाळ देसी नवी । जैसी साहित्यातें चोजवी । . - स्त्री . गप्पिष्ट स्त्री . - वि . फोफावलेलें ; विस्तारलेलें . जैसी अंकुरेसी सरळ । वेली दिसे वेल्हाळ । - अमृ ७ . ४३ . [ वल्ली ; प्रा . वेल्ला ]
-
पु. नवरा किंवा इतर प्रियकर यासंबंधी लाडिकपणें म्हणतात . - स्त्री . १ बायको किंवा इतर प्रियपात्र यासंबंधी योजतात . वदत वेल्हाळ गौरवर्णी । - ह ९ . १८ . २ . ( निंदार्थी ) नगरभवानी ; विलासिनी . - वि . १ लाडका ; प्रिय . पंच वर्षाचा चिलया बाळ । बत्तीस लक्षणी वेल्हाळ । - शिली ( नवनीत पृ २३४ ). २ सुंदर . डोळस आंगें वेल्हाळ । - दाव ६४ . ३ नाजुक . कंठांतून पिक दिसे वेल्हाळ । - अफला ५४ [ देप्रा . वेल्लाहल ] वेल्हाळा , वेल्हाळी - स्त्री . १ पत्नी , रक्षा , प्रीतिप्रात्र इ० स लावतात . की वेल्हाळा विद्युलता । सेजें आलिया । - शिशु ७५१ . २ सुंदरी ; प्रिय स्त्री ; वेल्हाळ . देखोनि हांसिन्नला वनमाळी । भिऊं नको वो वेल्हाळी । - एरूस्व ८ . ५६ . - र १२ .
-
f A wife or other beloved woman.
-
A term of endearment for a husband or other beloved man. 2 f A wife, mistress, or other beloved woman. 3 In reproof. A gadabout, gossiping female. 4 as a Dear, darling, tenderly loved or delighted in;--as a person, countenance, feature, member &c.
Site Search
Input language: