-
रामेठा कुल, थायमेलिएसी
-
रामेठा या वनस्पतीचा अंतर्भाव असलेले हे द्विदलिकित फुलझाडांचे कुल जंबुल गणात (मिर्टेलीझमध्ये) समाविष्ट केले आहे (एंग्लर). हचिन्सन यांनी रामेठा गणात (थालमेलेलिझमध्ये) अंतर्भूत केले आहे. प्रमुख लक्षणे- काष्ठयुक्त व साध्या, एकाआड एक किंवा समोरासमोर पानांच्या वनस्पती, बहुतेक सर्व वृक्ष किंवा झुडपे, क्वचित औषधी, द्विलिंगी अथवा एकलिंगी फुलात कधी पाकळ्यांचा अभाव, अक्ष नळी सारखा किंवा पेल्यासारखा, संदले ४-
-
बहुधा जुळलेली, पाकळ्या ४-१२, खवल्यासारख्या, केसरदले संदलाइतकी व त्यांशी एकाआड एक किंवा दुप्पट तर कधी दोन. बहुधआ बिम्ब असते. किंजदल एक, ऊर्ध्वस्थ, किंजपुटात एक किंवा दोन कप्पे, बीजके एक किंवा दोन. फळे विविध, पुष्पस्थलीने वेढलेली
-
myrtaceae.
Site Search
Input language: