Dictionaries | References अं अंगवणें Script: Devanagari See also: अंगविणें Meaning Related Words अंगवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. ( गो .) नवस करणें . आंगवणें पहा .उ.क्रि. प्राप्त होणें ; मिळणें ; होणे . ' तेणेंचि परब्रह्मा आंगविलें । जेणें जिंकिलें मनातें । ' - एभा २३ . ७०५ . ' देहो दिव्यस्त्रीचा आंगवला ॥ ' - मुसभा ६ . ३९ . २ अनुकुल असणें . ' गुरुचा उगाळु घ्यावया देख । मी होईल आंगवला सेवक ॥ ' - एभा १२ . ५५४ . ३ स्वाधीन होणें , करुन घेणें . ' देहत्वें कां आंगवता । मी म्हणोनि ॥ ' - परमा १० . २३ . तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥ ' - ज्ञा ३ . २६७ . ' ते आपुलेंनीचि बळें । आंगविलें जिहीं ॥ ' - ज्ञा १२ . ४५ .अ.क्रि. ( महानु .) गृहस्थाश्रमी होणेम ; स्त्रीपरिणय करणें . ( सं . अंग ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP