-
पु. १ ओल ; ओलसरपणा ; दमटपणा ; आर्द्रता . ' जीवनाचा झाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरीं मावळलं ॥ ' - तुगा ४०५५ . २ ( ल .) किफायत ; लाभ ; नफा . ३ फायद्याचा - यशाचा संभव , शक्यता ; आशादायित्व ; आशेला जागा ; उ० धनाचा अथवा पैक्याचा ओलावा . ४ अंतःकरणांत असलेली सद्यता ; द्यार्द्रता ; कनवाळुपणा ; जिव्हाळा , ' स्नेहाचा निजचित्तीं लेशहि येऊं न देचि ओलावा । ' - मोआदि ५ . १०५ . ' ममतेचा अथवा कृपेचा ओलावा .' ५ अप्रकट द्रव्यांश , तत्त्वांश , तत्त्व , सत्व . उ० बुद्धीचा , शहाणपणाचा ओलावा . ( ओला ) ओलाव्याचा - वि . १ भिजट ; दमट ; सर्द ; ओलसर . २ भरीव ; फायदेशीर इ० अर्थी ओला अर्थ ३ ते ५ पहा . उ० ओलाव्याचा व्यवहार - व्यापार - धंदा - रोजगार - चाकरी , ओलाव्याची ममता - प्रिति - मैत्री - बोलणें . याच्या उलट कोरडा .
-
ना. आर्द्रता , ओलसरपणा , दमटपणा ;
-
ना. आशादायित्व , पैशाचा ओलावा , फायद्याचा संभव ( व्यापार - धंद्यातील );
-
ना. करुणा , जिव्हाळा , दया , ममता ( अंत : करणातील ).
Site Search
Input language: