|
पु. जळाऊ लांकडांचा किंवा इमारती लांकडांचा ढीग , रास . अवट पहा . वि. १ साडेतीन . ' हें औट हात मोटकें। ' - ज्ञा १३ . १२ . ' औट हात तुझा जागा । येर सिणसी वाऊगा ॥ ' - तुगा २६९२ . २ ( योग ) साडेतीन मात्रा . ' तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । ' - ज्ञा ६ . २२३ . ' रत्नखचित सिंहासन शोभे औटपीठावर । ' - महिपती ( राजवाडे ९८ ). ( अर्धचतुर्थ - अद्धट्ट - अउठ्ठ - औट ; दे . आउट्टी = ३॥ ) न. १ बैलांना त्रास न देतां झालेलें दिवसाचें नांगरटीचें काम ; एक नांगरभर ; खुटणभर ( क्रि० नागरणें ); २ ( ल .) ( व .) एक शेत , वावर किंवा त्याची लांबी . ' तें गांव येथुन औटभर आहे . ( औत ) किवि . बाहेर ; बाद . ( इं .) ०डोअर वि. घराबाहेरचें ; फिरतें ; बैठेच्या उलट ( काम ). ०हाऊस - न . पडघर ; पडशाला ; चाकर लोकांसाठी बांधलेला स्वंतत्र सोपा . ( इं .) ०पद पीठ न . ( योग ) द्विदल अग्निचक्रावरील एक स्थान ; त्रिकूट , श्रीहट , गोल्हाट , औटपीठ हीं जीं महाकारणस्थानें आहेत त्यांपैकी एक . ' शोषुनि सहस्त्र दळाचे पाट । औटपीठ आणि गोल्हाट । क्रमोनिया श्रीहट । आली उद्भट ब्रह्मास्थाना । ' - प्रभा ६ . १२९ . २ कोखापूर ; तुळजापूर ; मातापूर हीं तीन व संप्तशृंग अर्धें , मिळुन देवीचीं साडेतीन स्थानें . ' नाना औटपीठें ओकारें दर्शना आलीं । ' - सप्र ५ . १८ . ०मात्रा स्त्री. ओंकार ; प्रणव . ०घटकांचा पु. ( साडेतीन घटकांचा म्हणजे ) अल्पकाळ टिकणारें सुख , आनंद ; क्षणभंगुर , सुख . आनंद पु. ( साडेतीन घटकांचा म्हणजे ) अल्पकाळ टिकणारें सुख , आनंद ; क्षणभंगुर , सुख . ०घटकांचें राज्य , घटींचें राज्य , ०घटकांचें चें राज्य -( किरीटी रामाराजानें आपल्या अबदागिर्याला साडेतीन घटका राज्य दिल्याच्या गोष्टीवरेउन अथवा शिराळशेटाच्या गोष्टीवरुन ) थोडा वेळ मिळणरा अधिकार , सुख ; पाण्यावरचा बुडबुडा ; शिराळशेटी राज्य पझा . औटकीं , औटकें - न . उजळणीचा प्रकार ; अवटकी ; साडेतीनचे पाढे व त्यांचें कोष्टक ; एकपासून शंभरपर्यंत संख्यांची साडेतीन पट देणारें कोष्टक . घडी चें राज्य -( किरीटी रामाराजानें आपल्या अबदागिर्याला साडेतीन घटका राज्य दिल्याच्या गोष्टीवरेउन अथवा शिराळशेटाच्या गोष्टीवरुन ) थोडा वेळ मिळणरा अधिकार , सुख ; पाण्यावरचा बुडबुडा ; शिराळशेटी राज्य पझा . औटकीं , औटकें - न . उजळणीचा प्रकार ; अवटकी ; साडेतीनचे पाढे व त्यांचें कोष्टक ; एकपासून शंभरपर्यंत संख्यांची साडेतीन पट देणारें कोष्टक .
|