Dictionaries | References

कस्तुरीका

   
Script: Devanagari
See also:  कस्तुरी , कस्तूरी

कस्तुरीका

  स्त्री. १ एक अति सुंगधी द्रव्य . याचा रंग काळा असुन हें विशिष्ट मृगाच्या नाभींत सांपडतें कस्तुरींमृग नेपाळ तिबेट इ० हिमालयाच्या प्रदेशांत आढळतात . ' नेपाळश्वर भाळलग्न चिखला कस्तुरिका मानिती । ' - मराठी ४ थें पुस्तक पृ . २०७ . ( १९०६ ). ' एशरकस्तुरी लल्लाटी । कंठीं हार साजिरा । ' - भुपाळी गणाप्तीची . २ कपाळास लावावयाच्या तांबड्या गंधाच्या मधोमध जो काळा टिपका लावतात तो .
०एण   मृग - पु . ज्या हरिणाच्या बेंबींतल्या गांठींत कस्तुरी सांपडते तो हरिण ; एका जनावरापासून सरासरी एक औंस कस्तुरी मिळते . ' सिंहजसे प्रतिपर्वति नाहित कस्तुरी पण वनोवनिं कैचे । ' - वामनीग्रंथ , ४ बोधपर सवाया ८ . ' देहींच देव असतां करी भ्रमतोसि व्यर्थ तुं रार्नीं । नाभित सुंगधि असुनी कस्तुरिमृग जेंवि तो फिरें रानीं । '

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP