|
अ.क्रि. १ खर असा आवाज होऊन घसरणें , निसरणें ; घसरत जाणें ; जोरानें खाली सरणें , जानें . ' झाडांवरुन त्याचा पाय खरकला .' मी खरकत तिकडे गेलों , पडलों .' २ ढुगणांनें सर कत जाणें , घसरत - घसरत जाणें ; खुरडणें . ३ खपाट्यानें व मोठ्या आवाजानें वाहात जाणें . ( नदी , पुर ); पाठीमागें जाणें ; कमी होणें ; ओहोटीस लागणें . ( समुद्र ); झटकन नाहीसें होणें ( वार्यानें ढग ); झडगे ( मांस , शरीर ); उतरणें ; म्लान होणें ; पडणें ( तोंड , चेहरा , माणुस ); एकदम दबणें ; खालीं बसणें ( सूज ); भिणें ; घाबरणें ; चरकणें ; धास्ती धरणें . ' चोर म्हणतांच राजश्री खरकले .' ( खर ) अ.क्रि. ( अहिराणी ) सरकणें पहा . - अहिराणी भाषा व संस्कृति .
|